तत्त्वज्ञान

माज

Submitted by सिद्धेश्वर विला... on 25 June, 2021 - 08:14

स्वैर वारा खेळ खेळतो, लालबुंद मातीशी

कणकणास उंच उडवे, दूरवर आकाशी

रंग वेगळा धूलिकणांचा मिसळला नभांत

सूर्यागमनाने झाल्या दशदिशा मूर्तिमंत

डोकावे अधूनमधून कळस एका मंदिराचा

दावे जणू दिशा कुणा , जरी आसमंत धुरळ्याचा

स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले

रंग घेऊनि सोनेरी मात्र धूलिकण माजले

माज उतरला क्षणात आपटले धर्तीवरती

स्वैर वारा मंद झाला , परतली लाल माती

==================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 

"गर्भसंवाद!"

Submitted by चंद्रमा on 20 June, 2021 - 16:31

......... 'माया' आपल्या अंथरुणावर खिळली होती. तिच्या सुंदरश्या नाजूक चेहऱ्यावर एक मंदस्मित विलासित होते. कदाचित ती निद्रेत स्वप्नरंजनात गोड आठवणींना उजाळा देत असावी. वाऱ्याच्या झोताने खिडकीचा पडदा हेलकावे खात होता आणि अचानक 'आई!', 'आई!' असा आवाज आला. माया दचकून जागी झाली आणि आजूबाजूला बघू लागली पण कोणीच नव्हते. नंतर ती बिछान्यातून उठून खिडकीजवळ आली. खाली बघितले पण कोणीच दिसेना! एक गार वाऱ्याची झुळुक तिच्या मनाला स्पर्शून गेली. तिने घड्याळात बघितले रात्री बाराचे ठोके पडत होते.

"पती-पत्नीच्या नात्यातील पारदर्शकता!"

Submitted by चंद्रमा on 9 June, 2021 - 04:33

........नात्यांमध्ये पारदर्शकता असावी कारण पारदर्शक नातीच प्रदीर्घ काळ जिवंत राहतात. एकदा का त्या नात्यांमध्ये अस्पष्टता आली की ती नाती निर्जीव आणि निस्तेज होत जातात.

प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 June, 2021 - 06:32

प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ

आपली संयमी फलंदाजी

तिचे धारधार तेजतर्रार मादक यॉर्कर

गोलंदाजी नीट समजण्यास द्यावा लागणार वेळ

सर्व मुलींना समजत होतो पाटा खेळपट्टी

सुमार वाटल्या म्हणुनी चालू होती हातभट्टी

त्यातल्या त्यात बरी म्हणावी , शेजारी एक होती

कळलं असतं घरी तिच्या तर झाली असती माती

देउनी तिजला तिलांजली मी बनलो पुन्हा सेहवाग

तय्यार झालो बॅट परजुनी, ज्वानीची शोधण्या आग

ओढ लागली भेटीची , झालो दुखी कष्टी

एक अनामिक यॉर्कर आला आणि उडवली मधली यष्टी

भानावरती येऊनि तिजला डोळेभरून पाहिले

शब्दखुणा: 

मी बिचारा एक म्हातारा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 3 June, 2021 - 09:11

मी बिचारा एक म्हातारा

ती गेली देवाघरी

आज बैसलों हसत एकटा

या हास्यकट्ट्यावरी

माती सरत चालली होती

तरी जीव थकला नव्हता

आजही थरथरत्या हातांना

ओला स्पर्श हवा होता

रोज यायची नटून थटुनी

दिसायलाही होती बरी

म्हाताऱ्याला हात पुरे तो

कशाला हवी आता परी

मी देखील नित्यनेमाने

दात काढुनी हसायचो

तिला हसताना बघून मात्र

गुलाबी स्वप्नं बघायचो

कधी कुलू तर कधी मनाली

बेत ठरायचे मनात

हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या

सर्व बेत गेले मसनात

सोहळा...

Submitted by गणक on 29 May, 2021 - 05:21

सोहळा

तो आरसा सांगे मला तू एकटा नाही अता !
नसते कधी जग आपले तू ये तुझ्या कामी अता !

ते वारही झाले जुने पाठीत मी जे सोसले ,
जखमांतही नाविन्य दे दे वेदना ताजी अता !

फसवायचे जर का मला नुसतेच तू कर एवढे ,
ढाळून खोटी आसवे हासून घे गाली अता !

ते आपले होते कुठे ? सोडून जे गेले पुढे ,
माझा मला मी सोबती चालावया राजी अता !

चोरी, दरोडे, खंडणी खोटेच त्याचे बोलणे ,
साधासुधा ना राहिला नेताच तो भावी अता !

ही आठ चाकी पालखी ही राजगादी पांढरी ,
भोगायचा आहे मला हा "सोहळा" शाही अता !

मेरे साजन है उस पार...

Submitted by बाख on 14 May, 2021 - 00:26

बंगाली भाषेतले लेखक ' ताराशंकर बंदोपाध्याय ' यांची कादंबरी 'आरोग्य निकेतन ' मधील नायक जिबोन मोशाय नाडी वैद्य आहे. तो रुग्णांची नाडी पाहून आजार सांगत असतो. त्याला नाडीमध्ये मृत्यूचा आवाज ऐकू येतो. आपल्या स्वत:च्या मृत्यूच्या आवाजाबद्दल बोलतांना तो म्हणतो, " मृत्यूने पायात पैंजणं घातली आहेत, सध्या ती शेताच्या
बांधावरुन हळू-हळू चालत येत आहे, हळू-हळू पैंजणांचा
आवाज मोठा होत चालला आहे..... आता अचानक पैं जणांचा आवाज कमी झालाय, ती (मृत्यु) माझ्या उशाजवळ येऊन थांबली तर नाही...? मृत्यु निशब्द आहे, कदाचित ती मला आपल्या मिठीत सामावून घेणार आहे असं वाटतंय...."

अंतरंग - भगवद्गीता - अक्षरब्रह्मयोग

Submitted by शीतल उवाच on 9 May, 2021 - 08:55

भगवद्गीता - अध्याय आठवा - अक्षरब्रह्मयोग

'mental Health Day' रजा घेउन काढलेल्या नोटस

Submitted by सामो on 4 May, 2021 - 10:22

काल गिल्ट फ्री , मानसिक-आरोग्य दिवस रजा घेतली. म्हणजे अशी काही कॅटेगरी आमच्या ऑफिसात आहे असे नव्हे तर आपल्यालाच तशी कॅटेगरी स्वांताय सुखाय या हेतूस्तव बनवावी लागते. तर काल मी पहीले म्हणजे सकाळी तासभर चालून फिरुन आले. चालताना, आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी नित्यप्रज्ञा यांचे काही व्हिडीओज ऐकले. एकदम छान सुरुवात झाली दिवसाची. व्हिडीओ ऐकण्यात व्यतीत केलेला हा वेळ मला फार बहुमूल्य वाटला. घरी आल्यावरती मी ऐकलेल्या भागांच्या काही नोटस काढल्या. कॉलेजपासूनच नोट काढण्यात मास्टरी होती माझी. विषयाच्या सविस्तर आणि सारभूत नोटस काढायच्या, मराठीत टिपणे म्हणतात त्याला. ती टिपणे खाली शेअर करते आहे.

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान