बेसिक बटर केक:
१२५ ग्रॅम सॉफ्ट (रुमटेंपरेचर) बटर (शक्यतो अनसॉल्टेड),
३/४ कप बारीक साखर,
२ अंडी (हलकी फेटुन),
२ कप सेल्फ रेसिंग फ्लार,
१/२ कप दुध
बेसिक बटर आयसिंग:
१२५ ग्रॅम सॉफ्ट अनसॉल्टेड बटर,
१+१/२ कप आयसिंग शुगर,
१ चमचा दुध/पाणी
बेसिक बटर केक:
- सर्वप्रथम केक टीनला बटर लावुन त्यामधे आणि साइड्सना बेकिंग पेपर लावा.
- ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड ला तापत ठेवा.
१. रुम टेंपरेचरला मऊ झालेले बटर एका मोठ्या भांड्यात घेऊन इलेक्ट्रिक बिटर ने लो स्पिड वर फिरवा. यात हळुहळु साखर घाला व क्रिमी होईस्तोवर फेटा,
२. या मिश्रणात दुध आणि फेटलेल्या अंड्यातले अर्धे मिक्श्चर घाला ते नीट एकजीव होईपर्यंत हलकेच फेटा.
३. आता उरलेले अंड्याचे मिक्श्चर घालुन ते नीट एकजीव होईपर्यंत परत हलकेच फेटा.
४. सेल्फ रेसिंग फ्लार बरीक चाळणीने २-३ वेळा चाळुन घ्या.
४. आता हे फ्लार हलके हलके वरच्या बटर-अंडे मिश्रणात 'फोल्ड' करा.
५. एकजीव झालेले मिश्रण तयार केक भांड्यात ओतुन ३०-३५ मिनीटे बेक करा.
केक जाळीवर थंड होण्यासाठी काढुन ठेवा.
बेसिक बटर आयसिंग:
१. सॉफ्ट बटर इलेक्ट्रिक हँड मिक्सर ने क्रिमी होईपर्यंत फेटा.
२. त्यात हलके हलके आयसिंग शुगर मिसळा (एका वेळेस पाव कप).
३. त्यात थोडे थोडे दुध घालुन आयसिंग स्प्रेडेबल (पसरण्याच्या) कन्सिस्टंसी चे करा.
बटर केक थंड झाला की त्यावर बटर आयसिंग पसरा आणि खा 
ह्या अगदी बेसिक रेसिपीज आहेत.
- या केकमधे आवडीप्रमाणे चॉकलेट, ड्रायफ्रुट्स वगैरे घालुन वेरिएशन्स करता येतिल.
- केक मधे काही लोक चवीला चिमुटभर मीठ घालतात.
- बेसिक आयसिंगमधे आवडी प्रमाणे रंग व इसेन्स घालु शकता.
- http://www.maayboli.com/node/17974 धाग्यावर इथे वापरलेल्या काही खास बेकिंग मधे वापरल्या जाणार्या शब्दांचे विश्लेषण आणि टीप्स पहा :
- अगदी घाई गडबडीत हा केक करायचा असेल, तर सगळे साहित्य एका बोल मधे मिक्स करा आणि हँड मिक्सर - बिटर ने लो स्पीड वर १ मिनीट आणि मग हाय स्पीडवर ३ मिनीट बीट करा.सगळे साहित्य नीट मिक्स झाले आणि केक चे बॅटर फुगलेले दिसले की मिश्रण केक टीन मधे काढुन नेहमी प्रमाणे बेक करावे.

