श्री. आनंद मोडक

अकोल्यातले दिवस - श्री. आनंद मोडक

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

शाळेत तिसरीचौथीत असताना एका कुठल्याश्या बुधवारी का गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर गादीवर मी लोळत पडलेलो असताना आईनं टीव्ही लावला. म्हणाली, ’आता सुरू होणार आहे तो कार्यक्रम नीट ऐक. पु. ल. देशपांड्यांचा कार्यक्रम आहे. आपल्या घरी त्यांची पुस्तकं आहेत. तुला कार्यक्रम आवडला तर लायब्ररीतून तुला त्यांची अजून पुस्तकं आणून देईन.’ कार्यक्रमाचं नाव होतं ’निवडक पु.ल.’. कार्यक्रम सुरू झाला आणि संपला. आई, आजी खदखदून हसत होत्या. टीव्हीतले पुलंसमोरचे प्रेक्षकही खोखो हसत होते. मला फारसं काही कळलं नाही. पण तरीही पुढच्या आठवड्यात आईनं सांगण्याआधी मी टीव्ही सुरू केला.

प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - श्री. आनंद मोडक