दुर्गा भागवत

कर्‍हाडच्या साहित्य संमेलनातलं श्रीमती दुर्गा भागवत यांचं अध्यक्षीय भाषण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

राष्ट्र म्हणजे व्यक्तींचा समूह नव्हे. व्यक्तिमत्त्व असलेल्यांचा समूह म्हणजे राष्ट्र. अखंड विचारप्रवाहानं हे व्यक्तिमत्त्व घडतं. म्हणून विचाराच्या अभिव्यक्तीवरची बंधनं रद्द होणं आवश्यक आहे. या मुक्त विचारासाठी आपण जर उभे राहिलो नाही, तर भीतीचं राज्य निर्माण होईल. - दुर्गा भागवत

आज १० फेब्रुवारी. आयुष्यभर विचारस्वातंत्र्याच्या, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूनं लढणार्‍या दुर्गाबाईंची जयंती.

१९७५ साली जेव्हा या देशात मुक्त विचारांवर बंदी घालण्यात आली, तेव्हा दुर्गाबाई पेटून उठल्या. आपल्या प्रत्येक भाषणात, प्रत्येक लेखात त्यांनी विचारस्वातंत्र्यावरच्या बंदीचा निषेध केला.

प्रकार: 
Subscribe to RSS - दुर्गा भागवत