चित्रपटगीत

छुपा लो युँ दिल में प्यार मेरा...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गाण्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस बरेच वेळा सकाळी उठतो तोच डोक्यात एखाद्या गाण्याची अोळ किंवा धुन घेऊन. उठता-उठता नेमकं तेच गाणं का? या प्रश्नावर विचार करत मी कित्येक तास घालवले असतील... आधल्या दिवशी घडलेल्या कशाशी त्याचा संबंध आहे का? रात्री पडलेल्या स्वप्नात कुठे त्याचा संदर्भ लागतो का? शेवटी नाद सोडला. आज सकाळी जाग आली ती 'ममता' चित्रपटातल्या 'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदीर में लौ दिये की' गुणगुणत. गाभाऱ्यात भरुन राहणारा अोंकार असावा तसा हेमंतकुमारचा आवाज आणि जोडीला मन व्याकुळ करणारा 'तिचा' आवाज.

प्रकार: 

मोहमद रफी - विसरलेले सोनेरी पान

Submitted by मनीषा- on 29 July, 2011 - 12:40

मोहमद रफी या नावाची महत्ता सांगायची खरे तर गरज नाही. पण तरीही....

सध्याचे टीवी वरचे संगीत विषयक कार्यक्रम, किंवा स्पर्धा, इंटरनेट व इतर माध्यमामदले चित्रपट संगीत विषयी लेख या सर्व मध्ये रफी साहेबांचा अनुल्लेख आढळून येतो.
इंटरनेट वरती शोध घेतला तर रफी साहेबांविषयीची माहिती , लेख अथवा कौतुक इतर गायक गायिकांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळते.

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

Submitted by पाषाणभेद on 2 October, 2010 - 14:01

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

हिरो:
तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब
तुझ्या डोईचे केस हाय लांब
तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग
तू कोनाची प्वार हाय सांग ||१||

हिरोईन:
तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब
वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब
माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम
माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२||

हिरो:
तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं

गुलमोहर: 

गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Subscribe to RSS - चित्रपटगीत