आयसिंग

"मेल्टिंग मोमेंट" कुकीज (फोटोसहित)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुकी साठी:

२५० ग्रॅम बटर (रुम टेम्परेचर - मऊसर)
दीड कप मैदा
चिमुटभर बेकिंग पावडर
४ टेबल स्पून आयसिंग शुगर
४ तेबल स्पून कस्टर्ड पावडर

क्रिम साठी:

दीड कप आयसिंग शुगर
अडिच टेबलस्पून बटर
व्हॅनिला इसेन्स किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट

क्रमवार पाककृती: 

कूकी:

सर्वप्रथम ओव्हन १५० डि सेंटीग्रेड ला तापत ठेवा.
बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर ठेऊन तयार ठेवा.

१. बटर आणि आयसिंग शुगर एका काचेच्या बोलधे एकत्र करुन क्रिम्र्र आनि फ्लफी होईपर्यंत फेटा;
२. दुसर्‍या बोलमधे कस्टर्ड पावडर, मैदा आनि बेपा एकत्र चाळुन घ्या.
३. आता लो स्पीड्वर किंवा बीटर ने बटर बीट करत करत मैदा + कपा + बेपा मिश्रण २ -२ चमचे एका वेळेस अस घालत मिक्स करा.
४. आता सगळे मिश्रण नीट एकत्र करुन गोळा तयार करा. साधारण फुलक्याच्या कणकेची सॉफ्ट कन्सिस्ट्ंसी यायला हवी.
५. या गोळ्याचे साधारण २४ भाग करुन त्याचे छोटे गोळे बनवा.
६. हे गोळे ५-१० मिनीट फ्रिज मधे ठेवा. जास्त नको नाहीतर बटर कडक होइल.
७. गोळे बाहेर काढुन बेकिंग ट्रे वर अरेंज करा. प्रत्येक गोळ्याच्या मधे थोडी गॅप ठेवा.
८. आता फोर्क च्या मागच्या बाजुने प्रत्येक गोळा हलकेच दाबा. फार जोरात नको नाहीतर कुकी फ्लॅट होइल.

IMG_1886.JPG

९. या कुकीज साधारण १५ मिनीटे बेक करा. कूकीज खुप ब्राऊन होता कामा नयेत. साधारण बटरच्या रंगाच्याच दिसायला हव्यात.
१०. कुकीज बाहेर काधुन थंड होऊ द्यात.

IMG_1924.JPG

क्रिम / आयसिंग:

बटर, आयसिंग शुगर आणि व्हॅनिला हलके आनि फ्लफी होईपर्यंत फेटा. फेटल्यावर फार नरम असेल तर ५-१० मिनीटे फ्रिज मधे ठेवा.

कुकी अन क्रिम

- जेव्हढ्या कुकीज झाल्यात त्यातल्या अर्ध्या कुकीज च्या फ्लॅट बाजुवर क्रिम्/आयसिंग लावा आणि वरती दुसरी कुकी (फ्लॅट बाजु येइल अशी) ठेवा. हलकेच दाब द्या.

झाल्या मेल्टिंग मोमेंट कुकीज तयार स्मित

IMG_1928.JPG

वाढणी/प्रमाण: 
एक खाऊन कुणी थांबत नाही :)
अधिक टिपा: 

- या कुकीज खुप हलक्या आणि खुसखुषीत होतात.
- यात बटर ऐवजी मार्गरीन किंवा तत्सम अजिब्बात वापरु नये फिदीफिदी चवीची वाट लागते...
- क्रिम/आयसिंग मधे आवडत असल्यास लेमन्/ऑरेंज झेस्ट घालु शकता.
- क्रिम्/आयसिंग मधे चॉकलेट घालु शकता.

माहितीचा स्रोत: 
बेस्ट एव्हर बेकिंग

केक मेकिंग, बेकिंग आणि डेकोरेटिंग टिप्स आणि प्रश्नोत्तरे

0

केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ स्मित मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.

परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.

बेसिक बटर केक आणि बेसिक बटर आयसिंग

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसिक बटर केक:

१२५ ग्रॅम सॉफ्ट (रुमटेंपरेचर) बटर (शक्यतो अनसॉल्टेड),
३/४ कप बारीक साखर,
२ अंडी (हलकी फेटुन),
२ कप सेल्फ रेसिंग फ्लार,
१/२ कप दुध

बेसिक बटर आयसिंग:

१२५ ग्रॅम सॉफ्ट अनसॉल्टेड बटर,
१+१/२ कप आयसिंग शुगर,
१ चमचा दुध/पाणी

क्रमवार पाककृती: 

बेसिक बटर केक:

- सर्वप्रथम केक टीनला बटर लावुन त्यामधे आणि साइड्सना बेकिंग पेपर लावा.
- ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड ला तापत ठेवा.

१. रुम टेंपरेचरला मऊ झालेले बटर एका मोठ्या भांड्यात घेऊन इलेक्ट्रिक बिटर ने लो स्पिड वर फिरवा. यात हळुहळु साखर घाला व क्रिमी होईस्तोवर फेटा,
२. या मिश्रणात दुध आणि फेटलेल्या अंड्यातले अर्धे मिक्श्चर घाला ते नीट एकजीव होईपर्यंत हलकेच फेटा.
३. आता उरलेले अंड्याचे मिक्श्चर घालुन ते नीट एकजीव होईपर्यंत परत हलकेच फेटा.
४. सेल्फ रेसिंग फ्लार बरीक चाळणीने २-३ वेळा चाळुन घ्या.
४. आता हे फ्लार हलके हलके वरच्या बटर-अंडे मिश्रणात 'फोल्ड' करा.
५. एकजीव झालेले मिश्रण तयार केक भांड्यात ओतुन ३०-३५ मिनीटे बेक करा.

केक जाळीवर थंड होण्यासाठी काढुन ठेवा.

बेसिक बटर आयसिंग:

१. सॉफ्ट बटर इलेक्ट्रिक हँड मिक्सर ने क्रिमी होईपर्यंत फेटा.
२. त्यात हलके हलके आयसिंग शुगर मिसळा (एका वेळेस पाव कप).
३. त्यात थोडे थोडे दुध घालुन आयसिंग स्प्रेडेबल (पसरण्याच्या) कन्सिस्टंसी चे करा.

बटर केक थंड झाला की त्यावर बटर आयसिंग पसरा आणि खा स्मित

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे :)
अधिक टिपा: 

ह्या अगदी बेसिक रेसिपीज आहेत.
- या केकमधे आवडीप्रमाणे चॉकलेट, ड्रायफ्रुट्स वगैरे घालुन वेरिएशन्स करता येतिल.
- केक मधे काही लोक चवीला चिमुटभर मीठ घालतात.
- बेसिक आयसिंगमधे आवडी प्रमाणे रंग व इसेन्स घालु शकता.
- http://www.maayboli.com/node/17974 धाग्यावर इथे वापरलेल्या काही खास बेकिंग मधे वापरल्या जाणार्‍या शब्दांचे विश्लेषण आणि टीप्स पहा :

- अगदी घाई गडबडीत हा केक करायचा असेल, तर सगळे साहित्य एका बोल मधे मिक्स करा आणि हँड मिक्सर - बिटर ने लो स्पीड वर १ मिनीट आणि मग हाय स्पीडवर ३ मिनीट बीट करा.सगळे साहित्य नीट मिक्स झाले आणि केक चे बॅटर फुगलेले दिसले की मिश्रण केक टीन मधे काढुन नेहमी प्रमाणे बेक करावे.

माहितीचा स्रोत: 
ही मी नेहमी वापरणारी रेसिपी साखरेच्या एका पाकिटावर छापली होती :)