कॉलेज

प्रेम कि मैत्री? भाग ६

Submitted by मनवेधी on 22 September, 2019 - 10:44

काही दिवसांनी श्रेया बरी झाली.... ती आता कॉलेज ला जायला लागली... रोज ती सार्थक ला पिक करायची व घरी एकत्र जायची.... ते आता तर जास्त वेळ एकत्र असायचे...
"सार्थ्या चल बाय....., उद्या लवकर आवर यार.... रोज तुझ्यामुळे फर्स्ट lecture चुकत..." श्रेया त्याला ड्रॉप करताना बोलली...
"हे काय.... लगेच चाललीस तू?... यार थांब ना थोडा वेळ... घरी जाऊन काय करणार आहेस...", सार्थक तिला थांबवत बोलला...
"इथं थांबून तरी काय करणार आहे", श्रेया बोलली
"ठीक आहे... जा...", सार्थक चिडून च बोलला...

विषय: 
शब्दखुणा: 

प्रेम कि मैत्री? भाग ५

Submitted by मनवेधी on 20 September, 2019 - 07:01

त्या दिवसानंतर सार्थक आणि श्रेयामधील मैत्री खूपच खुलत होती... ते नेहमी एकमेकांसोबत असत.... ते एकमेकांचे खूपच जवळचे मित्र बनले होते.... एकमेकांशी न बोलता त्यांना करमायचे नाही.... त्यांना प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगायची असायची... सोबत त्यांची भांडण देखील सुरूच असायची...भांडणाशिवाय मैत्री ती कसली???

विषय: 

प्रेम कि मैत्री? भाग ४

Submitted by मनवेधी on 20 September, 2019 - 01:14

तीचा तो राग पाहून सार्थक अवाक झाला.... व श्रेया च्या पाठीपाठी गेला.... श्रेया त्याच जिन्यावर जाऊन बसली जिथे अगोदर सार्थक बसला होता.... श्रेया बाहेरूंन कितीही strong असल्याचं भासवत असली तरीही ती खूपच हळवी होती... तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता....

"मला आता कळालं कि वेदांत असं का म्हणाला होता कि , हिच्यापासून जपून रहा...खूप danger आहेस तू. ..", सार्थक खाली मान घालत बोलला...

"गप्प रे सार्थ्या....", असं म्हणून ती थोडीशी हसली... सार्थक ने नीट पाहिल्यावर त्याला कळालं कि ती रडत होती...

विषय: 
शब्दखुणा: 

प्रेम कि मैत्री? भाग ३

Submitted by मनवेधी on 19 September, 2019 - 13:32

त्यानंतर देखील पूर्ण ग्रुप च चिडवणं चालूच होत ... सार्थक आणि स्वाती दिसतील तिथं सगळी त्यांना चिडवायची...बघता बघता हि गोष्ट पूर्ण कॉलेजमध्ये झाली ... सगळ्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी आहे असं वाटू लागलं.... पण श्रेया व तिचा ग्रुप फक्त गंमत म्हणून त्यांना चिडवायचा... त्यांना ह्या गोष्टीची कल्पनादेखील नव्हती...

"अगं श्रेया... सार्थक आणि स्वाती मध्ये खरच काही आहे का ग ?", श्रेयाच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं.

"कश्याबद्दल ग ??", श्रेयाने माहित नसल्यासारखे करून तीला विचारले....

"गप हा श्रेया ... तू त्या दोघांचीही मैत्रीण आहेस.. उगाच नाटक नको करू ", तिची मैत्रीण बोलली...

विषय: 
शब्दखुणा: 

प्रेम कि मैत्री? भाग २

Submitted by मनवेधी on 19 September, 2019 - 05:20

श्रेया च्या मनमोकळ्या स्वभावामुळे वेदांत आणि त्याच्या नवीन झालेल्या मित्रांमध्ये लगेच मैत्री झाली..  जसजसे दिवस जात होते, त्यांचा खूप छान ग्रुप बनत होता... सोबतच श्रेया आणि सार्थक चीही मैत्री फुलत होती... 
श्रेयाला वाटला होता तसा सार्थक अजिबात नव्हता... तो खूप समंजस, आणि साधा भोळा होता... दिसायला जरी जेमतेम असला तरी त्याच्या मध्ये एक charm होता...  पण श्रेया चा स्वभाव आणि सार्थक चा स्वभाव ह्यांच्यामध्ये जमीन असमान चा फरक होता...त्यामुळे त्यांच्याकध्ये तसे वारंवार खटके ही उडायचे... पण तेही हे सगळं enjoy करायचेत..  

विषय: 

प्रेम कि मैत्री? भाग १

Submitted by मनवेधी on 19 September, 2019 - 02:54

आज तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. का कुणा जाणे, छातीचे ठोके खूप वाढले होते. मन रमवावे म्हणून ती लॅपटॉप उघडून काहीतरी search करत होती. इतक्यात तिला कॉलेज फोटोज असा फोल्डर दिसला. अन उघडून ती काही फोटोज पाहू लागली. आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागला.. आणि आठवला तो.......

विषय: 
शब्दखुणा: 

प्रेमी - प्रेम मोठं की मित्र ( भाग २)

Submitted by Akash S Rewle on 19 November, 2018 - 11:14

टॉवेल मध्ये असलेली व्यक्ती जान्हवीच्या ओरडल्याने तो चांगलाच घाबरला होता . तो जाग्यावर थांबला आणि मागे मागे सरकू लागला . जान्हवीच्या आवाजाने आतल्या खोलीत असलेली प्रिया बाहेर येवून विचारू लागली.
" माफ करा आमच्या चुकीमुळे तुमची ही अवस्था झाली ??"
जान्हवी ने सुटकेचा श्वास सोडला व पाणी मागितले . पाणी पिऊन ती म्हणू लागली .
" मी आहे कुठे ?? माझे कपडे कोणी बदलले ?? काय झालं होत ?? "
प्रश्नाच्या उत्तरात प्रिया म्हणली  ...

शब्दखुणा: 

प्रेमी - प्रेम मोठं की मित्र ( भाग १ )

Submitted by Akash S Rewle on 19 November, 2018 - 05:24

" आपण घरच्यांना समजवून लग्न नाही करू शकत का ?" जान्हवी अविनाशला विचारू लागली .
" शक्य असतं तर पळून लग्न करायचा विचार सुद्धा केला नसता , माझ्या घरात समजल तर ... माझं लग्न माझ्या जातीतील कोणत्याही मुलीशी करतील ... पण मला माझं आयुष्य फक्त तुझ्याच सोबत घालवायच आहे " अविनाश रागात उत्तराला .
" ठीक आहे तर मी घरातून काही पैसे घेते उद्या कॉलेजच्या वेळेवर निघते पण घाई तर होत नाही ना ? " जान्हवी म्हणाली.
" आपल्या एका चुकीमुळे घाई होतेय , आणि ती चूक माहिती आहे तुला ..." असं म्हणत अविनशने जान्हवीला मिठीत घेतले आणि पुढे बोलू लागला .

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कॉलेज