कॉलेज

तडका-ठाव मना-मनाचे

Submitted by vishal maske on 22 March, 2015 - 13:45

ठाव मना-मनाचे,...

कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो

जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - आरोप-प्रत्यारोप करताना

Submitted by vishal maske on 21 March, 2015 - 20:59

आरोप प्रत्यारोप करताना,...

समजु शकणार्‍या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत

प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

तडका - शुभ-अशुभ

Submitted by vishal maske on 21 March, 2015 - 10:59

शुभ-अशुभ

कुणासाठी गारवा असतात
तर कुणासाठी उब असतात
कुणासाठी शुभ तर कधी
कुणासाठी अशुभ असतात

वेग-वेगळ्या भावनेच्या
वेग-वेगळ्या दृष्टी असतात
वेग-वेगळ्या नजरेमधून
वेग-वेगळ्या गोष्टी असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

तडका - गुढी पाडवा

Submitted by vishal maske on 20 March, 2015 - 22:22

गुढी पाडवा

पारंपारिक असली जरी
नव्या-नव्याने थाटली जाते
नव-वर्षाच्या स्वागताला
रूढीची गुढी नटली जाते

मना-मनात आपुलकी अन्
आनंदाचा गोडवा असतो
मरठी माणसांचं नवं साल
असा हा गुढी-पाडवा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

काका

Submitted by vishal maske on 19 March, 2015 - 13:02

काका,...

काका तुम्ही सोडून गेलात
याला मन संमत नाही
अन् श्रध्दांजली देण्याची
आमच्यामध्ये हिंमत नाही

गहिवरलं काळीज जरी
धरणी स्थिर राहिली नाही
आभाळाची भकास काया
अशी कधीच पाहिली नाही

कानात गुंजतो अजुनही
काका तुमचा आवाज
कसा विश्वास ठेवावा की
तुम्ही नाहित इथे आज

तुमच्या विचारानं विचार
समाजाचे बदलत आहेत
तुमचे उपदेशात्मक बोल
कानावरती आदळत आहेत

तुमचं हूबेहूब चित्रही
डोळ्यांपूढं साकारतं आहे
काका तुमच्या जाण्याला
मन आज नाकारतं आहे

शब्दखुणा: 

तडका - घेरलेलं बजेट

Submitted by vishal maske on 18 March, 2015 - 22:05

घेरलेलं बजेट,...

बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे

बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र

शब्दखुणा: 

तडका- सरकारचा विरोध,...!

Submitted by vishal maske on 17 March, 2015 - 21:04

सरकारचा विरोध,...!

कुणी अडलेले आहेत
कुणी नडलेले आहेत
भु-संपादन विधेयकावर
कुणी इथे चिडलेले आहेत

जन कल्याणाचीच भुमिका
राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी
सरकारचा विरोध होण्याची
वेळच कशाला यायला हवी,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१८/०३/२०१५ दै.प्रजापत्र

शब्दखुणा: 

तडका- अविश्वासी ठराव,...

Submitted by vishal maske on 16 March, 2015 - 21:51

अविश्वासी ठराव,...

कुणी जोडला जाऊ शकतो
कुणी तोडला जाऊ शकतो
विश्वासावर विश्वास ठेऊन
अविश्वास घडला जाऊ शकतो

आकड्यांच्या संख्ये भोवती
साट्या-लोट्यांचा घेराव असतो
अन् विश्वासावर घाला घालुन
कधी अविश्वासी ठराव असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१७/०३/२०१५ दै. प्रजापत्र

दैनंदिन जीवनात,...

Submitted by vishal maske on 16 March, 2015 - 08:58

कधी मनं खवळले जातात
कधी मनं कळवळू शकतात
कधी विरोध उफाळले जातात
कधी विरोध मावळू शकतात

परिस्थितीचा आढावा घेत
कधी शाब्दिक उधाण असावेत
तर बदलत्या परिस्थितीनुसार
कधी वाणीवर लगाम असावेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१६/०३/२०१५ दै. प्रजापत्र

शब्दखुणा: 

अमेरिकेतील युनिवर्सिटी सिलेक्शन बद्दल ..

Submitted by mansmi18 on 6 March, 2015 - 21:11

नमस्कार,

माझ्या परिचयातील एका विद्यार्थ्याला अमेरिकेतील विद्यापीठ्/कॉलेजांबद्दल (For MS - Computer Science) माहिती हवी आहे. मी नेटवरुन पाहुन माहिती गोळा केली आहे पण आपल्यापैकी कोणी अनुभवी असतील तर त्यांच्याकडुन फर्स्ट हँड माहिती मिळाली तर आवडेल.
त्याची अपेक्षा ३२०० पर्यंत स्कोर यायची आहे.(अ‍ॅवरेज). त्याने पुढील काही युनिवर्सिटी short list केल्या आहेत. त्यामधे
1.Quality of Education,
2.Safety (considering recent incidents I suggested him tri state area or california where there is significant desi population - Please correct me if I have wrong perception) and
3.campus placement

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कॉलेज