मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - स्वरुप

Submitted by स्वरुप on 6 September, 2022 - 16:18

अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रीत्यर्थ सगळे इतके गौरवपूर्ण वगैरे लिहित असताना हे जरा उगाच खुसपट काढल्यासारखे वाटेल. अर्थात ज्याचा अभिमान असायला पाहिजे त्याचा अभिमान आहेच पण प्रसंगी आत्मपरीक्षणही केले पाहिजे..... स्वताशीच थोडे प्रामाणिकपणे बोलले पाहिजे Happy

विषय: 

वेब डिझाइन शिकायला मदत हवी आहे

Submitted by on 29 August, 2022 - 21:53

मला थोडी मदत हवी आहे. मला Ruby on Rails, bootstrap, web design कुणी शिकवू शकेल का? आठवड्यात १ दा, साधारण अर्धा तास ऑनलाईन शिकवणी अशी अपेक्षा आहे. योग्य मोबदला देण्यात येईल.
भारतातील विविध NGO बद्दल पोर्टल बनवायचा माझा विचार आहे. कृपया संपर्क करावा.

शब्दखुणा: 

असाही घडलाय भारत!

Submitted by पराग१२२६३ on 14 August, 2022 - 13:55

स्वातंत्र्यानंतरची गेली 75 वर्षे भारतासाठी काही नकारात्मक आणि काही सकारात्मक घडामोडींची ठरली आहेत. माध्यमांचा तसेच समाजातील काही घटकांचा सातत्याने त्या नकारात्मक बाबींकडेच बोट दाखविण्यावर भर असतो. त्यातून आजचा भारत घडविण्यात महत्त्वाच्या ठरलेल्या सकारात्मक घटनाक्रमाकडे दुर्लक्ष होत राहते.

स्वप्नपूर्ती ...पुस्तक प्रकाशन ...मोहर

Submitted by मनीमोहोर on 10 August, 2022 - 11:43

जगातल्या अगदी प्रत्येक माणसाचे आपल्या मूळ गावावर अतोनात प्रेम असते. पण कोकणातल्या निसर्ग सौंदर्यामुळे, तिथल्या अनोख्या सणवार आणि उत्सवांमुळे, कोंड्याचा मांडा करण्याची जादू असलेल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे असेल पण फारशी आर्थिक सुबत्ता नसून ही कोकणातल्या माणसाचे आपल्या गावावर जरा काकणभर अधिकच प्रेम असत असं मला वाटत. कोकणातला माणूस पोटापाण्याच्या उद्योगासाठी जगाच्या पाठीवर कुठेही ही असला तरी मनाने तो कायम कोकणातच असतो.

मायबोलीकर मैत्रीणीशी भेट - (फोटोसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2022 - 10:30

अखेर, फायनली, आयुष्यात पहिल्यावहिल्यांदा ....
नुकतेच एका मायबोलीकर मैत्रीणीला भेटायचा योग आला Happy

विषय: 

राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा

Submitted by सॉक्स on 13 April, 2022 - 00:44

मायबोली वर राजकीय आणि सामाजिक विषयांवर उत्साहाने चर्चा होतात. त्या कधीकधी खूप माहितीपूर्ण असतात, आणि कधीकधी गोलाकार असतात, त्यांना ना सुरुवात असते ना अंत.

मला अशा चर्चांमध्यें सहभागी असलेल्या सदस्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, कधी मायबोली वरील चर्चेमुळे एखाद्या विषयावर मतपरिवर्तन झाले आहे का ?

जर मत बदलले असल्यास कोणत्या विषयावर बदलले आणि कशामुळे बदलले ?-

मायबोलीवर आव्वाज कुणाचा ? पुणेकर वि. मुबईकर कि कोथरूडकर वि. पार्लेकरांचा ?

Submitted by गारंबीचा शारूक on 25 March, 2022 - 09:45

एका धाग्यावर ऋन्मेष सरांनी त्यांचे सखोल निरीक्षण मांडले आहे कि
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं वर्चस्व होतं पण आता मुंबईचं आहे. तिथे त्यांनी सूचना केली कि यावर नवीन धागा काढा. पण त्यावर जे प्रतिसाद आले त्यामुळे वाद होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे. हा विषय तसा खेळीमेळीने घ्यायचा आहे.

विज्ञानकथा म्हणजे काय ?

Submitted by गारंबीचा शारूक on 20 March, 2022 - 11:35

एका कथेवर ऋन्मेष सरांचा खालील प्रतिसाद आहे.

"कित्येक संकल्पना विज्ञानाने सिद्ध झाल्या नाहीत तरी त्यावर लिहिलेल्या कथा विज्ञानकथा म्हणूनच धरल्या जातात असे मला वाटते. मग त्या परग्रहवासींबद्दल असोत वा टाईम ट्रॅव्हेलबद्दल. या कथेतील शरीर गायब होणे भूतखेतांसारखे न दाखवता मांडणी विज्ञानकथेसारखीच केली आहे असे या भागावरून वाटले म्हणून तसे म्हटले".

विषय: 
शब्दखुणा: 

या माणसाचे नाव काय असेल?

Submitted by सिम्बा on 16 March, 2022 - 11:47

हे मला WA वर प्राप्त झाले,
माबो वरच्या एका character बरोबर साम्य दिसल्याने, इकडे शेअर करायचा मोह आवरत नाहीये,
संबंधित लोकांनी हलके घ्यावे

आणि WA फॉरवर्ड आहे म्हणून उडवून टाकायचे असेल तर खुशाल उडवावावे, 2 तास करमणूक या पलीकडे याला काही अर्थ नाही.

*********
ते सध्या काय करतात???

मागच्या रविवारी आमचा शाळकरी ग्रुप एकत्र आला.
१९७२ सालचे मॅट्रिकचे विद्यार्थी..
एका मित्राने पुढाकार घेऊन सर्वांशी संपर्क केला आणि दोन दिवसांचे गेट टुगेदर अरेंज केले....

जरासे स्थिर होता

Submitted by Udage Mayuri Ra... on 9 March, 2022 - 07:02

जरासे स्थिर होता
कलह दाटुन येतो,
मनाने ठाव घेता जरा
कवाडच बंद होतं.

विसरून जाता सारे काही
सामोरी जसे उभा ठाकते,
दिशांचा शोध घेता
अंतरचं नाहिसे होते.

मौनातून बोलके होता
बोलणेच राहून जाते,
भेटता सुखाचा किनारा
कलंडूनी नाव जाते.

आस कुठूनशी जरा येता
मन हे अस्वस्थ होते,
सूर झंकारून येता
शब्द हरवून जातो.

Pages

Subscribe to RSS - मायबोली