अवांतर

तडका - हरभर्‍याचं झाड

Submitted by vishal maske on 24 March, 2015 - 12:03

हरभर्‍याचं झाड,...!

चढवणारे चढवत असतात
चढणारेही चढत असतात
चढता-चढता चढणारेही
धप्पदिशी पडत असतात

चढवणारांना अन् चढणारांना
अजुनही ना त्याची चाड आहे
मात्र या गोष्टीचा साक्षीदार
आजही हरभर्‍याचं झाड आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

महाराष्ट्र : इतर देशवासीयांच्या नजरेतून

Submitted by प्रकु on 24 March, 2015 - 07:09

बंगळूरू मध्ये राहायला आल्यावर, मला इथे विविधं प्रांतांतील अनेक लोक भेटले. दक्षिणेतल्या चार (आता पाच) राज्यांतील लोक तर होतेच शिवाय उत्तरेकडील पंजाब, UP; ईशान्येचा आसाम; पूर्वेकडील छत्तीसगड, बंगाल, झारखंड ते अतिपूर्वेकडील मणिपूर, इतक्या सगळ्या राज्यांतील लोकांशी मला सवांद साधण्याची संधी मिळाली. हे सगळे माझे मित्र साधारण २१ ते २५ वयोगटातील आहेत. त्यांच्या नजरेतून मला आपल्या महाराष्ट्राकडे पाहायला मिळालं. आणि मराठी असल्याचा मला अधिकच अभिमान वाटू लागला. हा एक छान अनुभव होता. तो तुमच्या बरोबर share करतोय.

विश्वासघात

Submitted by यतिन-जाधव on 24 March, 2015 - 02:11

फेसबुकवर नवीन नवीन मित्र शोधणे व त्यांच्याशी च्याटिंग करून मैत्री वाढवणे हा माझा बऱ्याच दिवसांपासुनचा छंद, असंच च्याटिंग करता करता माझी एका नव्या मित्राबरोबर ओळख झाली, धीरज त्याचं नाव, धीरज हा एक खूप हुशार मेहनती मुलगा, शिक्षणासाठी मुंबईत आलेला व होस्टेलवर राहून आपलं शिक्षण पूर्ण करणारा, त्याचं मुळ गाव उदयपुर, घरी आई वडील आणि एक लहान बहिण असं छान सुखवस्तु कुटुंब, धीरज देखील आर्ट कॉलेजचा विध्यार्थी असल्यामुळे आपल्याचं विषयाशी निगडीत व्यक्तींविषयी मला जर जास्तच जिव्हाळा वाटत असल्यामुळे त्याची आणि माझी लगेच मैत्री जुळली,

विषय: 

तडका - आरक्षणाचा विचार

Submitted by vishal maske on 23 March, 2015 - 22:50

आरक्षणाचा विचार,...

आरक्षणाच्या बाबतीत
हलगर्जीपणा नसावा
विकासाच्या वाटेवरून
कुणी सुध्दा उणा नसावा

उगीच विचार करू म्हणत
टाळा-टाळीचा प्रकार नसावा
आता आरक्षणाच्या मागणीचा
विचारपुर्वक विचार असावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - आरक्षणाचा एल्गार

Submitted by vishal maske on 23 March, 2015 - 11:18

आरक्षणाचा एल्गार

सरकार वरील रोषाची
अजुन भावना गेली नाही
दिल्या गेलेल्या शब्दाची
म्हणे पुर्तता झाली नाही

आता सरकार वरती असा
कठोर आरोपाचा मार आहे
धनगर समाज आरक्षणाचा
आंदोलनात्मक एल्गार आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका-ठाव मना-मनाचे

Submitted by vishal maske on 22 March, 2015 - 13:45

ठाव मना-मनाचे,...

कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो

जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

सेटिंग

Submitted by यतिन-जाधव on 22 March, 2015 - 01:21

मिलिंद, सुमती आणि राज एक छान छोटंसं कुटुंब, मिलिंद एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर काम करतो, खुप जबाबदारीचं काम असल्यामुळे कामानिमित्त मुंबई पेक्षा नासिक, पुणे, नागपूर या कंपनीच ब्रान्च ऑफिस असलेल्या शहरामध्येच त्याचं वास्तव्य अधिक असत, त्यामुळे मनात असूनही सुमती आणि राज यांना आपण फार वेळ देऊ शकत नसल्याची त्याला नेहमीच खंत वाटते, पण जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा तो फोनवरून संपर्कात असतोच, सुमतीही एका सरकारी बँकेत कामाला आहे, घरची परिस्थितीही आता बऱ्यापैकी सुधारलीय, राजचं शिक्षणही व्यवस्थित चाललंय, पण राजला शिक्षणासाठी पुण्यात रहाव लागत असल्यामुळे हल्ली तीला एकटीला घर खायला येतं, त्यामु

विषय: 

तडका - आरोप-प्रत्यारोप करताना

Submitted by vishal maske on 21 March, 2015 - 20:59

आरोप प्रत्यारोप करताना,...

समजु शकणार्‍या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत

प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

तडका - शुभ-अशुभ

Submitted by vishal maske on 21 March, 2015 - 10:59

शुभ-अशुभ

कुणासाठी गारवा असतात
तर कुणासाठी उब असतात
कुणासाठी शुभ तर कधी
कुणासाठी अशुभ असतात

वेग-वेगळ्या भावनेच्या
वेग-वेगळ्या दृष्टी असतात
वेग-वेगळ्या नजरेमधून
वेग-वेगळ्या गोष्टी असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

तडका - गुढी पाडवा

Submitted by vishal maske on 20 March, 2015 - 22:22

गुढी पाडवा

पारंपारिक असली जरी
नव्या-नव्याने थाटली जाते
नव-वर्षाच्या स्वागताला
रूढीची गुढी नटली जाते

मना-मनात आपुलकी अन्
आनंदाचा गोडवा असतो
मरठी माणसांचं नवं साल
असा हा गुढी-पाडवा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर