भाजपा

एन डी ए (मोदी) सरकार ची ५ वर्षे: २०१४-१९: आकडेवारी

Submitted by योग on 12 February, 2019 - 06:40

मोदी वि. ईतर... भाजपा वि. ईतर... गांधी कुटुंब वि. ईतर.. अशा अनेक वाद विवादांतून, चर्चा, प्रसंगी वैयक्तीक टीकांतून एक बाब प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या गेल्या ७ दशकात, विशेषतः गेल्या दशकात आपली मते, भूमिका, विचारसारणी ही बर्यापैकी 'ठाम' असते. यात संस्कार, शिक्षण, मिडीया सर्वांचाच मोठा वाटा असतो. त्यामूळे व्यक्तीसापेक्षतेच्या कसोटीवर चूक व बरोबर, फायद्याचे का तोट्याचे याचे नेमकी ऊत्तर सापडणे मुश्कील असते. त्यातही भारता सारख्या महाकाय लोकशाही मधील प्रांत, भाषा, संस्क्रुती, ई.

विषय: 

मायबोलीवरील चकमकींकरता हुकमी आखाडा!!

Submitted by कांदापोहे on 9 September, 2015 - 01:12

मायबोलीवरील धडाडीचे व हमखास यशस्वी मल्लांना जाहीर आमंत्रण. विषय कुठलाही असला तरी बिनधास्त कुस्ती खेळा, शिवीगाळ करा, झिंज्या उपटा. मल्लांसोबत, सुमो पण चालतील. कुस्ती लिंगनिरपेक्ष आहे. समोरच्या मल्लाचा अनादर केल्यास १०० मार्क. चुकुनही समोरच्या पार्टीच्या पोष्टला चांगले म्हणालात तर तो फाऊल समजला जाईल.

भाजपा काँग्रेस, हिंदु-मुस्लिम, जात पात, स्त्रीपुरुष, ब्राम्हण, मराठा, जैन, शिवाजी, औरंगजेब, दारु, मोदी-गांधी, ब्रिगेडी वगैरे सगळे मुद्दे आलेत याची खात्री करा. धागा धागा अखंड विणुया!!

विषय: 

आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन

Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13

१ ले चर्चा सत्र :

विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५

१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.

२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्‍यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.

कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2014 - 13:48

"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"

आता धागा सुरू करूया,

१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.

विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 16:33

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.

विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?

१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्‍याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?

विषय: 
Subscribe to RSS - भाजपा