राजकारण

पारावरल्या गझाली

Submitted by ashokkabade67@g... on 30 October, 2022 - 05:20

तस म्हनल त आमच गाव काय लय मोठ्ठ नाय ईनमिन चार गल्लयांच गाव शेती ह्योच एकुलता एक उद्योग चारसा महिन धावाधाव केली की बाकी मंग फुरसतच फुरसतच फुरसत भलेही आमच्या गावामंधी समद्या गोष्टींची कमतरता आसल पर एक गोठ मातुर भरमसाठ हाय नी ती म्हंजी येळ पर व्हत काय की येळ लय मुबलक असल्यान त्यो घालवावा कसा हीच समद्या गावकऱ्यांची पंचाईत व्हती,तस समद्या बाबतीत गाव मागासलेल आस्ल तरीभी राजकारनात मातूर लयच पुढ हाय चार गल्ल्या पर भेदभाव आसा नाय समद्या राजकीय पक्षाले आमच्या इथ थारा हाय काँग्रेस राष्ट्रवादी ची एक गल्ली एक गल्ली शिवसेनेची चार घर भाजपची नी मंग उरलेल्या घरांत दोन चार अपक्ष नी बाकिचे पक्ष येळ आसल्यान

विषय: 

समरकंदचं संमेलन आणि शांघाय संघटना

Submitted by पराग१२२६३ on 24 September, 2022 - 03:00

उझबेकिस्तानमधल्या समरकंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची (Shanghai Cooperation Organisation) 22 वी शिखर परिषद 15-16 सप्टेंबर 2022 ला पार पडली. या परिषदेला 14 देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. सध्या SCO मध्ये निरीक्षक असलेल्या इराणने समरकंद परिषदेत पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.

समरकंद शिखर परिषद-2022
SCO सदस्य देशांमध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय समरकंद-2022 मध्ये घेण्यात आला आहे. त्यासाठी वाराणसी शहराची 2022-23 साठीची SCO ची पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 3 September, 2022 - 17:26

तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली.

मी विचारलं- “आणी ब्राह्मण?”

तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत. सगळे तमीळ एका बाजूला नी तैम्ब्रेम एका बाजूला.”

“परंतू, ऊत्तर भारतात सवर्णांत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य सगळे येतात”

उजाळा आठवणींचा ।।

Submitted by ashokkabade67@g... on 12 August, 2022 - 09:44

तस तर जनतेची स्मृती अल्पजीवीच असते अस प्रत्येक पक्षातील नेत्याला वाटत असत आणि म्हणून च ते एखाद्या प्रश्नावर आपण मागे काय मत मांडले आणि आता आपण काय बोलतोय किती विरोधी बोलतोय हे विसरून जातात ्खरतर मायबोलीच्या संचालक मंडळाला मला एक फुकटचा सल्ला द्यावासा वाटतोय आणि तो म्हणजे त्यांनी आठवते कानेत्यांनो या नावाच एक नवच सदर सुरु कराव आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याच एखाद्या घटनेवर मत परिवर्तन झाल की त्या नेत्याला त्यानेच केलेल्या गतकाळातील वक्तव्याची आठवण करून द्यावी भक्त असोत की गुलाम या सदराला प्चंड प्रतिसाद देतील ।

विषय: 

ईरोधी पक्षाच्या नेत्यायले येड म्हनाव की खुळ

Submitted by ashokkabade67@g... on 8 August, 2022 - 04:50

आजच म्या मीडियावर ऐकलकी ब्वा त्ये भाजपच्या वळघनीले जाउन बसलेल्या अब्दुल सत्तारची पोर पोरीभी त्या टिईटी घोटाळ्यात घावल म्हने आसा कुनीतरी आरोप केला आते याले काय म्हनाव आर बाबांनो सत्तार सायेब शिंदे सायबासोबत भाजपच्या वळचनीले जाऊन बसले पयले त सत्तार सायबाले भावना गवळीले जेलमधी धाडीन आशी किरकिर करनार त्ये बिचार किरीट सोमय्या ह्ये भाजपच्या वळचंनीले जाताच कोमात गेल त्ये कावून त यायले भाजप न आपल्या पवित्र वाशिंग पावडरन क्लिनचिट वाशिंगमशिन मधन धूधू धूवून काढल नी पवित्र केल तवा अशा भाजपत जाताच पवित्र व्हनाऱ्या आमदार खासदारांवर कायबाय आरोप करन बर हाय का आता भावानाताईसकट समदेच म्हनत्यात की ईडीची कटकठ

तैवान

Submitted by पराग१२२६३ on 7 August, 2022 - 03:14

अमेरिकेन काँग्रेसच्या प्रतिनिधी गृहाच्या (House of Representatives) अध्यक्षा नॅंसी पेलोसी यांनी आपल्या आशिया-प्रशांत दौऱ्यात 2 ऑगस्ट 2022 ला तैवानला दिलेल्या भेटीमुळे चीन आणि अमेरिकेदरम्यान तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तैवानला अमेरिकेने कायमच पाठिंबा दिलेला आहे. त्याची पुन:ग्वाही पेलोसी यांनी आपल्या दौऱ्याच्यावेळी दिलेली आहे.

मोदीजी है तो मुमकिन है।

Submitted by ashokkabade67@g... on 21 July, 2022 - 04:18

आमच्या गावातला गन्या म्हंजी ईपीत्तर च हाय पर करनार काय लंगोटीयार हाय आमचा त्यो ,सक्काळी सकाळी म्या चायच पित व्हतो तवर घरी आला म्या अर्धी कप त्याले देतच व्हतो तवर त्यो म्हनला नग तू आवर घाल कपडे आपल्याले जील्ह्याले जायच हाय ,माले जरा नवलच वाटल काम ना धाम ना येळ ना काळ नी ह्यो म्हंनतोय जील्ह्याले जायच बर पाऊसभी मनमन तसा झोडपतोय पर म्हनल आसल कुनीतरी आजारी बिजारी म्हनून त्याले ईचारल गन्या बाची तब्येत बरी हाय ना का बैलबिल घेतोय तसा तुहा एक बैल थकलायच म्हना ,नाय रे भावड्या म्हातार धडधाकड हाय नी बैलभी धकलच या सालाले आता काय नांगरनी ,पेरनीभी झालीच की वखरनीले चाललच की पाहु पुढल्या हंगामात त्यो म्हनला

विषय: 

पक्षफुटीनंतर एखाद्या गटाला मान्यता देण्याआधी पक्षकार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावित काय?

Submitted by ashokkabade67@g... on 13 July, 2022 - 03:06

खरतर कुठल्याही पक्षाचे नगरसेवकांपासून ते आमदार खासदारा पावेतो सारेच निवडून येतात ते कार्यकर्त्यांच्या जीवावर पण प्रत्येक पक्षातील हेच निवडून आलेले लोक पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत पक्षत्याग करतात खरतर असे हे नेते यांना कुठल्याही तत्वांशी काहीही बांधिलकी नसते असते ती फक्त सत्ता आणि स्वस्वार्थाशी हेलोक खरतर गद्दार च असतात नैतिकता पहाता खरतर यांनी पदाचा राजीनामा देऊन मग पक्षांतर करायला हवे कारण हे फक्त पक्षाशीच नव्हे तर यांना निवडून आणनाऱ्या कार्यकर्ते व यांनामत देणाऱ्या मतदारांशी गद्दारी करत असतात पण राज्यपाल असो की निवडणूक आयोग फक्त संख्या पहातात आणि मान्यता देतात ।यात सत्तेचा

शिव सेना व शिंदे सेने पुढील आवाहने

Submitted by हस्तर on 9 July, 2022 - 10:34

काही आव्हाने सारखी
आहेत

१)
२०१४ मध्ये भाजप विरोधी प्रचार केला होता ,२०१९ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध
आता शिंदे सेने माविआ विरुद्ध आहेच पण औरंगाबाद चे नामांतर वगैरे करून ठाकरे साहेब पण काँग्रेस विरुद्ध झाले

निदान निवडणुकीत तरी जुने मुद्दे परत लोक आठवणाराच

२) निवडणूक चिन्ह
हे जरी शिव सेने लाच राहणार तरी आयोग गोठवु शकते
दोन्ही पक्ष नवीन चिन्ह तोपर्यँत चालवतील

३) पक्ष निधी
हा प्रॉब्लेम फक्त शिव सेनेलाच असणार

४) लोकांचा पाठिंबा
जुने लोक ठाकरे सेनेलाच पाठिंबा देणार

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण