राजकारण

विजयाचा खोटा डांगोरा काय पिटता।तीन राज्यात भाजपला एकुण जागा किती हेही सांगा।गा

Submitted by ashokkabade67@g... on 4 March, 2023 - 01:15

महाराष्ट्रात कुठल्याही न्युज चँनलने मेघालय ,त्रिपुरा, व नागालँड येथील निवडणुकीचे सखोल विश्लेषण केले नाही(बहुतेक वरून आदेश नसावा कारण मग विजयाचा डांगोरा किती खोटा आहे हे जनतेला कळले असते )पण भाजपने मात्र काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि भाजप विजयी झाला असे चित्र निर्माण करत खोट्या विजयाचा डांगोरा पिटला तसे या बाबतीत महाराष्ट्रात भाजप नेते पटाईत आहेतच म्हणा पण विजयाचा डांगोरा पिटतांना कोणत्या राज्यात भाजपला किती जागा मिळाल्या हे मात्र सोईस्कररीत्या सांगायला विसरले।
मेघालयमधे एकुण जागा 59 भाजपला जागा मिळाल्या 2.

भारतीय आकाशात अवतरला अजस्त्र पक्षी

Submitted by पराग१२२६३ on 22 February, 2023 - 13:28

अलीकडेच बेंगळुरूजवळच्या यलहंका हवाईतळावर पार पडलेल्या Aero India 2023 हवाई प्रदर्शनात अमेरिकेच्या बी-1बी या व्यूहात्मक बाँबफेकी (Strategic Bomber) विमानांनी अचानक लावलेली हजेरी आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या एफ-35 लाटनिंग-2 या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांनी त्यात घेतलेला सहभाग या विशेष लक्षवेधक घटना ठरल्या. याच प्रदर्शनात रशियाच्या United Aircraft Corporation नं असं जाहीर केलं की, या कंपनीनं आपल्या नव्या Tu-160M या व्यूहात्मक बाँबफेकी विमानाचे नामांतर तेरेश्कोव्हा/Tereshkova (रशियन नाव – Tерешкова, रशियन उच्चार – तिरिष्कोवा) असं केलं आहे.

भाजप आणि मनोरंजन फेब मार्च०२३०२३

Submitted by हस्तर on 15 February, 2023 - 08:51

सगळयात मोठा बॉम्ब ह्या वेळी हा आला कि फडणवीस ह्यांनी स्वतः कबुल केले कि पहाटेचा शपथ विधी पवार साहेबांनी स्पॉन्सर केला होता
हे मी आधी एका धाग्यावर टाकले होते
पण आता प्रश्न
१) आत्ताच का कबुली दिली >. माझ्या मते शिवसेना राष्ट्रवादीचे फाटावे म्हणून
२) अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत ?
माझ्या मते ३ दिवसाच्या सरकारने कोणत्या फाईल फिरवल्या आणि शपथविधी करून सरकार का स्थापन करता नाही आले

अजून काय असेल ?

विषय: 

अंतर्गत सीमावाद (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 24 December, 2022 - 12:26

ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद
स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्यांच्यात सीमावादाला सुरुवात झाली.

अंतर्गत सीमावाद (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 20 December, 2022 - 11:55

अलिकडेच महाराष्ट्रातील विविध सीमावर्ती भागांमधील गावांनी आपल्याला शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, असं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. स्वातंत्र्यानंतर भाषा-आधारित घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही घटकराज्यांमध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक असे वैविध्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पुढील काळात विविध कारणांनी देशातील प्रत्येक समुदायाकडून आपल्यासाठी स्वतंत्र घटकराज्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यामुळं भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याचे तत्व मागे पडले आहे.

भारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण!

Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55

सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!

मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्‍या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?

आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!

विषय: 
शब्दखुणा: 

मद्रासकथा-३

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 12 November, 2022 - 13:57

चित्रः- पेरियार रशियात.

दलितांचा खरा हितचिंतक कोण? आंबेडकर, गांधी की पेरियार? तिन्हीकी यापैकी कुणीही नाही? हा न संपणारा वाद आहे.

जातीचा प्रश्न येतोय म्हणून मी जातीपासून सुरुवात करतो. या तिघांपैकी फक्त एक दलित समाजात जन्माला आला होता आणि बाकीचे दोघे व्यापारी समाजातील होते. तिघांमध्ये एकही ब्राह्मण नव्हता.

विषय: 

मद्रासकथा-२

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 6 November, 2022 - 13:29

भारतातील पहिल्या महिला आमदार .

भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती. तेव्हा पेरियार यांची भूमिका काय होती?

विषय: 

पैचान कौन?

Submitted by हस्तर on 2 November, 2022 - 02:58

काही वर्षांपूर्वीचा आमच्या ऑफिस मध्ये घडलेला किस्सा.
आम्ही सारखाच अनुभव असणारे चार पाच समवयस्कर आणि आमचा एक मॅनेजर असे आम्ही सगळे एका टीमचा भाग होतो. अचानक आमच्या टीम मध्ये एक नवीन जॉईन झाला.
आम्ही मॅनेजर ला विचारलं ... "हा कोण".
मॅनेजरने सांगितलं ... "नवीन आहे ... सांभाळून घ्या त्याला".
'सांभाळून घ्या? ... म्हणजे आम्ही नक्की काय करायचं' आम्हालाच प्रश्न पडला.
आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
थोडे दिवस झाले. त्याला काहीच जमेना.
आम्ही मॅनेजरला सांगितलं ... "अरे ह्याला काहीच जमत नाही".

विषय: 

मिडल ईस्ट मधली तेलाची बदलती समीकरणे

Submitted by सखा on 1 November, 2022 - 02:54

काही आठवड्यापूर्वी जेव्हा ओपेक प्लस या पेट्रोल उत्पादकांच्या देशांनी (इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत, रशिया आणि इतर) आपण पेट्रोल उत्पादनामध्ये कपात करत आहोत असे जाहीर केले तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी सौदी अरेबियाला ठणकावले की याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अमेरिकेने सौदी अरेबियाला अशा पद्धतीची सरळ सरळ धमकी देणे ही फारच मोठी गंमतशीर गोष्ट आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण