राजकारण

12थ फेल आणि राजकारण

Submitted by WallE on 13 January, 2024 - 02:37

मायबोली वर "१२थ फेल" या चिरत्रपटावर भरपूर चर्चा झाली. याच चित्रपटात एक सवांद आहे, ज्यात मनोज शर्मा मुलाखतीच्या वेळी एक वाक्य बोलतो कि जर लोक शिक्षित झाले तर राजकारणी लोकांना त्रास होईल आणि त्यांना राजकारण करता येणार नाही.
या अवस्थेचा काँग्रेस सारख्या मोठ्या राजनैतिक पक्षाने पुरेपूर उपयोग करून घेतला. विशेष म्हणजे काँग्रेस मधील सर्वोच्च नेत्यांनी शहरी भागातून निवडणूक न लढवता, ग्रामीण भागाला प्राधान्य दिले. त्यांना शक्य असून शहरी मतदार संघाची निवड न करता ग्रामीण मतदार संघाची निवड केली. त्यांनी असे का केले असावे.

विषय: 

महाराष्ट्रात खरोखर न्याय झाला का ?

Submitted by ashokkabade67@g... on 11 January, 2024 - 11:18

आमदार अपात्रतेचा चेंडु उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षाकडे टोलावला कारण घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून पण आधीच चार पक्ष फिरत शेवटी भाजपवासी झालेल्या नार्वेकरांनी बराच काळ तारीख पे तारीख देत सुनावणी लांबवत ठेवली सरते शेवटी न्यायालयाने तंबी देत निकालासाठी कालमर्यादा ठरवून दिल्यावर केवळ नाईलाजाने सुनावणी करणे अपरीहार्य झाल्याने सुनावणी सुरु केली ऐथेच निकाल काय लागणार हे जनतेला कळले त्यातच न्यायदानाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीने आरोपी वा फीर्यादीला भेटु नये हा महत्त्वाचा संकेत पायदळी तुडवत यांनी आरोपीसोबत बैठक घेत वजहापानाचा आस्वाद घेत संशयास्पद स्थिती निर्माण केली तेंव्हाच जनतेच्या मनात नि

विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय

Submitted by स्वरुपसुमित on 10 January, 2024 - 09:23

Breaking News
एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्या बाबत निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदें गट तसेच उद्धव ठाकरे गट अश्या दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र ठरले.
आता सरकार बदलणार नाही त्यामुळ राज्यसेवा/Combine/सरळसेवा भरतीसाठी जे प्रयत्न करणे सुरु आहे ते करत रहावे

टिप :- या निकाला बाबत कोणीही आपापसांत वाद घालु नका कारण हे राजकारणी कोणाचेच नसतात त्यामुळे आपल्याला अगोदर आपली हक्काची नोकरी मिळवणे महत्वाचे आहे**.**.

https://www.reddit.com/r/mipa/

विषय: 

भाजपा अजुनही महाराष्ट्रात स्वबळावर का येऊ नाही शकत ?

Submitted by स्वरुपसुमित on 6 January, 2024 - 03:51

२०१९ मधेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून उमेदवार आयात केले ,तरी फक्त १०५ झाले
आता निम्म्या शिवसेना ला तोडले
तरी पण मग राष्ट्रवादी तोडायची गरज भासली

जे मुळात भाजप मध्ये होते ते २०१४ पासूनचे बहुतेक लोक गायब झालेत
का भाजप मुळात हिमती वर लढू नाही शकत ?

बंगाल मध्ये काँग्रेस भाजपाची "B" टीम आहे का?

Submitted by WallE on 6 January, 2024 - 02:25

बंगाल मध्ये राशन घोटाळा (तांदूळ वरील हमीभाव मध्ये घोटाळा) ED च्या रडार वर आला आणि त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये धाड सत्र सुरु केले. धाडीसाठी गेलेल्या ED च्या ऑफिसर वर संदेशाखली या गावात हल्ला करण्यात आला आणि वाहनांची नासधूस करण्यात आली. ह्यावर भाजपा नेत्यांनी वक्तव्य दिलेच आहेत पण काँग्रेसचे पश्चिम बंगाल मधील प्रभारी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री अधीर रंजन चौधरी यांनी राज्यात (पश्चिम बंगाल) कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली नसल्याचे वक्तव्य दिले आणि सोबतच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सुद्धा केली.

विषय: 

सौ चुंहे खाकर बिल्ली हजको निकली .

Submitted by ashokkabade67@g... on 9 December, 2023 - 08:17

नबाब मलिकांनी विधानसभेत प्रवेश करताच आपली बसण्याची खुर्ची निवडली ती सत्तेत सामील असलेल्या अजीत पवार गटात आणि सत्ताधारी पक्षात एकच गोंधळ उडाला लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतांनाच भाजपवर हे सारे प्रकरण शेकणार हे लक्षात येताच फडणवीसांनी अजीत पवारांना पत्र लिहीले आणि ते मीडियावर झळकवले आणि आपण किती तत्ववादी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपने सुरु केला पण ज्या पवार घराण्यावर हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्वता पंतप्रधान मोदींनी केला त्याच अजीत पवारांना सत्तेत सामिल करुन घेत उपमुख्यमंत्री पद देणाऱ्या भाजप व फडणवीसांना हा ना तिक अधिकार आहे का हाच खरा प्रश्न आहे फडणवीसांचे हे पत्र

‘चक्र’ची प्रतीक्षा (नौदल दिन विशेष)

Submitted by पराग१२२६३ on 4 December, 2023 - 05:38

नव्या शतकात बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाला आपल्या ताफ्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहक अणुपाणबुड्यांबरोबरच (SSBN) हल्लेखोर अणुपाणबुड्यांचीही नितांत गरज भासत होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठी नेर्पा ही अकुला-2 वर्गातील हल्लेखोर अणुपाणबुडी भारतानं भाड्यानं घेतलेली होती. भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं ते एक महत्वाचं पाऊल होतं. वाजपेयी सरकारच्या काळात 2004 मध्ये भारत आणि रशियामध्ये या पाणबुडीसंबंधीचा करार झाला होता. त्यानुसार आधी रशियाकडून अकुला-2 वर्गातील दोन अणुपाणबुड्या 10 वर्षांसाठी भाड्यानं घेण्याचा निर्णय झाला होता.

सिल्क्यारा बोगदा कोसळण्याची घटना

Submitted by उदय on 26 November, 2023 - 22:25

चार-धाम परियोजने ( Chara Dham Project - CDP) अंतर्गत सिल्क्यारा, उत्तराखंड, येथे ४.५ कि मी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पहाटे ५:३० वाजता या बोगद्याचा काही भाग कोसळला . घटनेला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, आणि बोगद्याच्या आत मधे ४१ कामगार अडकले आहेत. CDP प्रकल्प ८९० किमी लांबीचा आहे आणि एकंदर प्रकल्पाचा खर्च १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बोगद्याच्या बांधकामामुळे यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग २५ किमी ने कमी होणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचा कंत्राट ( नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड कडे होता.

मालदिवमधली बदलती परिस्थिती

Submitted by पराग१२२६३ on 6 November, 2023 - 10:54

मालदिवजमध्ये अलीकडेच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत Progressive Party of Maldives चे मोहंमद मुईझ्झू विजयी झाले आहेत. मुईझ्झू यांचा कल चीनकडे झुकलेला असल्यामुळं त्यांच्या कार्यकाळात मालदिवजमध्ये चीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. निवडीनंतर लगेचच त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ते स्पष्ट होत आहे. मालदिवजमध्ये घडत असलेल्या या घडामोडींमुळं भारताची चिंता वाढणं स्वाभाविक आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीत अंदाज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये

Submitted by हस्तर on 4 November, 2023 - 18:45

तुम्हाला काय वाटते?
तसे पाह्ता भाजपा मुद्दाम सगळे राज्य जिन्कते एक सोडुन
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य?

Pages

Subscribe to RSS - राजकारण