आरोग्य

Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे?

Submitted by गुलबकावली on 27 November, 2016 - 23:53

नमस्कार, मला Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत.

माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

पाच किलोमीटर आणि बरंच काही…. भाग १

Submitted by विद्या भुतकर on 27 November, 2016 - 23:33

ही गोष्ट आहे माझ्या पहिल्या वहिल्या हाफ मॅरॅथॉन ची. आता इतके लोक इतक्या शर्यती पळतात. त्यात माझी विशेष अशी काही नाही. पण माझ्यासाठी खासंच ती. कारण त्याची सुरुवातच झाली ती माझ्या तिशीनंतर. माझं खूप काही वय वगैरे झालं नाहीये पण वयाच्या तीस वर्षापर्यंत अभ्यास, कॉलेज, नोकरी, मुलं, इ जे काही सर्व लोक करतात तसं करून झालं. थोडं- फार इकडे तिकडे. कधीही खेळात, कुठल्या शर्यतीत भाग घेतला नाही शाळेत. त्यामुळे पहिली हाफ मॅरॅथॉन माझ्यासाठी खासच होती. तिची सुरुवात मात्र एका ५ किमी अंतराच्या रेसने झाली. आजची पोस्ट त्याच्याबद्दलच.

मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही ,मी काय करावे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 November, 2016 - 10:50

नमस्कार मायबोलीकरांनो ,मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.

विषय: 

antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका.

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 November, 2016 - 03:25

ॲन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला हे अनेकांना ज्ञात असेलच.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर बॅक्टेरीअल इन्फेक्शन ट्रिट करणे सोपे झाले .त्यानंतर अनेक प्रकारची प्रतिजैविके शोधली गेली.यातून बॅक्टेरीयल एन्फेक्शनने होणारे मृत्यु वा इतर कॉम्प्लीकेशन टाळता येऊ लागली.साहजिकच जगाचे आयुर्मान त्यामुळे वाढले.

विषय: 

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरविषयी

Submitted by मंजूडी on 17 November, 2016 - 23:22

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी, सौंदर्यवृद्धीसाठी बहुपयोगी आहे अशी माहिती वाचनात आली आहे. केस आणि त्वचेचा पोत सुधारणे याबरोबरच वजन कमी करणे, ब्लड प्रेशर आणि डायबेटिस नियंत्रणात ठेवणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी अत्यंत गुणकारी आहे अशी केवळ माहिती मिळाली आहे, तज्ज्ञांचा सल्ला मिळालेला नाही.

तर, अ‍ॅपल सायडर व्हिनेगरच्या वापराची माहिती, अनुभव, उपलब्धता, परीणाम, दुष्परीणाम यांबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 

तू माझा सूर्यप्रकाश आहेस (यू आर माय सनशाईन)

Submitted by विद्या भुतकर on 15 November, 2016 - 23:21

उगाच कुणी मराठीमध्ये शीर्षक का दिले नाही म्हणून विचारणार त्यापेक्षा आपलं दिलेलं बरं. बरोबर ना? असो. Happy

मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.

विषय: 

अमेरिका -इंटरनॅशनल मेडिकल ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by दिविजा on 1 November, 2016 - 14:57

इंटरनॅशनल मेडिकल ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल माहिती हवी आहे. मी माझ्या आई बाबांसाठी अमेरिकेत येताना हा इन्शुरन्स घेतलाय. आईला इथे असताना अचानक दुखापत झाली आहे .ती सध्या हास्पिटल मध्ये आहे . इन्शुरन्स क्लेम करताना काय माहिती असावी ह्या बद्दल प्लिज माहिती द्या .

स्टॅपेडोक्टॉमी - परत एकदा !

Submitted by दिनेश. on 20 October, 2016 - 23:05

पंधरा वर्षांपुर्वी माझे कानाचे छोटेसे ऑपरेशन झाले होते त्याबद्दल मी एक लेख इथेच लिहिला होता.
आपल्या कानामधे जी तीन हाडांची साखळी असते त्यापैकी एक म्हणजे स्टेप.. काही कारणाने ते काम करेनासे होते. ( त्याला नेमके असे कारण नाही, झपाट्याने वजन कमी होणे, अंगातील चरबी कमी होणे.. हि काही कारणे ) आणि
ते बदलण्यासाठी जी शस्त्रक्रिया करतात ती स्टॅपेडोक्टॉमी !

पंधरा वर्षांपुर्वी ही शस्त्रक्रिया डॉ. रविंद्र जुवेकर यांनी केली होती आणि यावेळेस ती त्यांचे सुपुत्र डॉ. मीनेश जुवेकर यांनी केली. ( डॉ. मीनेश यांच्या मातोश्री म्हणजे सुप्रसिद्ध गायिका नीलाक्षी जुवेकर )

गरज विरुद्ध हौस

Submitted by अपरिचित on 12 October, 2016 - 04:36

मागच्याच रविवारला गर्लफ्रेंडला घेऊन आर-सिटी मॉल मध्ये गेलेलो. भटकंती करत असताना (खरे तर मी एकट्यानेच खाल्लेला जड पनीर पराठा पचवण्यासाठी) पायपीट करत होतो.
तर चालता चालता एका दुकानात बरीच "हिरवळ" बघून तिकडे वळालो. दुकान कसले आहे ते बघितलेच नाही. हिरवळ आहे म्हणजेच दुकान छानच असणार हे गृहीत होते (पण महागडेसुद्धा असणार हे मात्र लक्ष्यात आलेच नाही). तर "हिरवळी" वरून नजर फिरवत असताना मध्येच "पिवळे" काहीतरी दिसले. आणि ते बघून मग डोक्यात ट्यूब लाईटच्या पांढऱ्या प्रकाशा ऐवजी बल्बचा पिवळा प्रकाश पडला......

Pages

Subscribe to RSS - आरोग्य