लेखन

सुदूर अंतस्थ

Submitted by ज्येष्ठागौरी on 22 December, 2023 - 23:16

सुदूर अंतस्थ
एका वर्षात चार बहिणींना भेटायचा योग येणं ही केवळ किमया आहे.
आत्तापर्यंत ह्या चारही बहिणींबद्दल फक्त ऐकलं होतं पण त्या प्रत्यक्षात भेटतील इतक्या लवकर असं वाटलं नव्हतं..ह्या वर्षात ते दान पदरात पडलं हे विलक्षणच म्हणायचं..

विषय: 

असा मी, तसा मी, नक्की कसा मी ?

Submitted by विक्रम मोहिते on 21 December, 2023 - 01:15

मनाच्या पेटार्यात बराच वेळ काहीतरी शोधत असलेल्या तिसऱ्या 'मी'ला पाहून पहिल्या 'मी'ने दुसऱ्या 'मी'ला विचारलं, "काय रे, नक्की काय शोधतोय हा?" दुसरा मी म्हणाला," काही नाही रे, त्याला वाटतं आपण सगळे 'मी' आहोत ना, ते खोटे आहोत, खरा 'मी' कुठेतरी हरवलाय खूप आधी, आणि आपण फक्त थोडेफार त्याच्यासारखे आहोत, तो 'मी' नाही" पहिला 'मी' खो खो हसत म्हणालं," अरे वेडा आहे का हा, पहिला 'मी' राहिला नाही म्हणून तर आपण आलो ना, आधी मी वाला 'मी', मग तू वाला मी, नंतर हा वाला 'मी', आधी मला पण असं वाटायचं, पण त्या खऱ्या 'मी' ला शोधायचा कमी प्रयत्न केला का आपण?

विषय: 

आवेग

Submitted by श्वेतपर्ण on 19 December, 2023 - 02:05

का लाट होऊन धावले
तुझ्याकडे खड्का ?
पाहण्या का कोरल्या
जुन्या लाटांच्या जखमा ?

सांधण्या अंतर प्रेरित मला
क्षणोक्षणी तुझे आवेग,
पाहताच तुला कोसळले
हृदयी चे सगळे संवेग.

ना आवरले मला घट्ट
तुला मिठी मी मारली,
सांगत होती काया तुझी
अशी ना मी पाहिली.

बरेच झाले भेटले
मला पाण्याचे सर्वांग,
नको दिसाया आसवे,
अन् जानवाया हृदयभंग.

मीच खिन्न आता
या किनारी पसरले,
होऊन पाणी ,आवेग
सारे पाण्यातच विरले.

विषय: 

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

Submitted by पराग१२२६३ on 17 December, 2023 - 00:37

प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं. साडेनऊ होऊन गेले तरी ‘वंदे’ काही आली नव्हती. त्यातच display board वर वंदे भारतप्रमाणे बऱ्याच गाड्यांचे फलाटही दर्शवले जात नव्हते. थोड्याथोड्या वेळानं या वेळा सतत बदलत जाऊन शेवटी दाखवलं गेलं की ‘हैदराबाद’ 3 नंबरवर आणि ती गेल्यानंतर वंदे भारत तिथं येईल.

केलं उसनवार, सगळं मुसळ केरात....

Submitted by ASHOK BHEKE on 13 December, 2023 - 10:43

केलं उसनवार, सगळं मुसळ केरात.... अशोक भेके

विषय: 

मोनालिसा

Submitted by अवल on 12 December, 2023 - 06:34

(कोणत्याच कलेचे मी व्यावसायिक परिपूर्ण शिक्षण घेतलेले नाही. अगदी क्रोशा विणकामाचेही नाही. बघून बघून प्रयोग करत शिकणे ही माझी पद्धत. चित्रकलेबद्दलही हेच. त्यामुळे जे लिहितेय ते चित्रकलेची एक सामान्य प्रेक्षक म्हणूनच असेल; तज्ज्ञ म्हणून नाही. त्यातून अनेक लेख, पुस्तके वाचत बघत आले; त्यांचा जरूर मोठा प्रभाव आहे. प्रामुख्याने या विषयावर लिहिताना काहींचा आधीच उल्लेख करणे योग्य वाटते.

फुकटचे सल्ले!

Submitted by चिमण on 7 December, 2023 - 05:17

शाळा कॉलेजात असताना अनेकांनी येता-जाता मला "सरळ" वळण लावण्याच्या नावाखाली केलेल्या फुकटच्या उपदेशांनी माझं पित्तं फार खवळायचं! कधी (म्हणजे बर्‍याचवेळेला) मी मारलेल्या बंडला उघडकीस आल्या तर 'खोटं बोलू नकोस, खोटं बोलल्यानं पाप लागतं'. कधी रविवारी सकाळी जरा उशीरा पर्यंत लोळलो तर लगेच 'उठा आता, नुस्ते लोळत पडू नका. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती आरोग्य लाभे! समजलेत काय चिमणराव?' अशी हजामत! असलं काही सतत ऐकल्यावर कुठल्याही कुणाचंही डोकं फिरेल, मग माझ्यासारख्या टीनेजराची काय कथा?

विषय: 
शब्दखुणा: 

सत्यभयकथा - स्वप्नकल्लोळ

Submitted by झम्पू दामलू on 6 December, 2023 - 15:06

माझा मित्र अनिल. दापोलीला महाविद्यालयीन शिक्षणावेळचा माझा वर्गमित्र. तेंव्हा पासूनच तो काहीसा अबोल आणि अतीसंवेदनशील वगैरे. चार मित्रांच्या घोळक्यात फार न बोलता कडेला उभा राहून विनोदांची मजा घेणारा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला ठाण्याला एका स्थानिक वृत्तपत्रात नोकरी मिळाली.

Pages

Subscribe to RSS - लेखन