लेखन

फ्रेंच फ्राईझ २ - डेमो

Submitted by मकरंद गोडबोले on 9 January, 2019 - 00:35

फ्रेंच फ्राईजच्या ग्राउंड फ्लोअरवर, हाफचड्ड्या आणि टी शर्टांचा सुकाळ होता. हे आपले फुल्ली ड्रेस्ड कलपकाकांचे मत. अर्थात शॅंटीआॅंटिला ते कायमच ओव्हरड्रेस्ड वाटायचे. सोसायटिची तर मीटिंग, त्याला कशाला प्यांट आणि शर्ट? कलपकाकांना तरी सगळ्या बायकांनी साड्या घालून यावे असे मनापासून वाटायचे. पण ते फक्त त्यांनाच. त्यामुळे आजही, फक्त कलपकाका फुल्ली ओव्हरड्रेस्ड होते. बाकि सगळे हाफ्प्यांटी आणि टीशर्ट, अगदी साळकाया माळकाया पण. सुट्टिच्या दिवशी केली ना मीटिंग. टिनाच्या आईचे ठाम मत होते, की मीटिंग ही सुट्टिच्या दिवशी असता कामाच नये. त्यामुळे तावरेकाकांनी मग ती एकदा मंगळवारी ठरवली.

विषय: 
शब्दखुणा: 

ऐ दिल ए नादान ....

Submitted by असुफ on 8 January, 2019 - 10:55

हे गाणं ऐकताना समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा मतितार्थ उर्दू भाषेत ऐकतोय अस वाटतं.
मनाची व्यथा, सततची हालचाल, अस्थैर्य, काहीतरी हवं आहे आणि यात गोंधळून गेलेले आपण की काय हवंय, का हवंय, काही कळेनासं झालेलं.
जे आहे ते सोडून किंवा त्याचा विसर पडून जे नाहीये त्यामागे धावणं आणि त्यासाठी दुःख करणं आणि त्यामुळे नसलेल्या समस्या निर्माण करणं, त्रास ओढवून घेणं आणि मग या आपणच ओढवून घेतलेल्या दुःखात असमाधानी असणं.
आपण घायाळ होतो, स्वतःला हानी पोहचवत राहतो, माझा दुःख किती मोठं, मी किती त्रासात आहे असा विचार करणं

विषय: 

फ्रॉक

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 8 January, 2019 - 05:42

फ्रॉक

“आई मी अज्जीबात घालणार नाहीये तो काकीने दिलेला फ्रॉक... "असं पोरीने सांगितलेलं, तरीही पुन्हा तिने “एकदा तरी घाल राजा” असं लाडीगोडीत तिला समजावून पाहिलं... पण पोरगी जराही स्व विचारांत बदललेली दिसली नाही....तिने फ्रॉक घेतला अन कपाटाबाहेर ठेऊन म्हणाली , "नाही... फेकून दे "

विषय: 
शब्दखुणा: 

"ती" तुम्ही तर नाहीत ना? नाही तर मग कोण आहे,ती व्यक्ती?

Submitted by Mi Patil aahe. on 6 January, 2019 - 05:56

ती व्यक्ती म्हणजे स्त्री, बाई, महिला,नारी,मादा,स्त्रीलिंगी
तो व्यक्ती म्हणजे पुरुष, बाबा,गडी,नर,पुल्लिंगी
तर "ती व्यक्ती"- सामान्यतः माणूस, मानवप्राणी मधील स्त्रीलिंगी मानली जाते---- व्याकरणदृष्ट्या,विज्ञानानुसार,अध्यात्मानुसार, सामाजिक मानसिकतेनुसार!
निसर्गाने तिला निर्माण केले,असे विज्ञान सांगते.
ब्रम्हदेवाने/परमात्म्याने/ईश्वराने तिला निर्माण केले असे अध्यात्म सांगते.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कसं सांगू मी तुला

Submitted by किल्ली on 4 January, 2019 - 04:39

ही कथा मायबोली गणेशोस्तव २०१८ मध्ये कथासाखळी उपक्रमासाठी दिली होती. तिथे कथा पुर्ण करून देणार्‍या सर्वांचे आभार.
लिन्कः https://www.maayboli.com/node/67504
किरणुद्दिन ह्यांच्या प्रतिसादाचा समावेश करून, थोडीशी बदलून, लघुकथेच्या स्वरूपात लिहिली आहे. कशी वाटली जरूर सांगा.
आणि हो, अजूनही सूत कातायला वाव असेल तर "कतिया करू, कतिया करू" होउन जाउ द्या ... Happy

विषय: 

तफावत

Submitted by mrunal walimbe on 4 January, 2019 - 00:02

दोन दिवसापूर्वी दळण आणायला गेले होते.अर्थातच दळण गिरणीत ठेवून परत आणायला जायचा फारसा उत्साह नव्हता म्हणून तेथेच थांबले. तेवढ्यात एक शाळकरी मुलगा आला मला वाटले आई बहीण कोणीतरी दळण ठेवून गेले असेल अन् तो घ्यायला आला असेल पण तसे नव्हतेच . गिरणीवाल्या दादांनी त्याला नीट चाळून घ्यायला सांग रे घरी म्हणल्यावर मी कान टवकारले माझी थोडी उत्सुकताही चाळवली गेली. मग मी विचारले दादांना काय प्रकार आहे. त्यांनी जे सांगितले ते ऐकून पोटात गलबले.

विषय: 

topi

Submitted by ashविन on 2 January, 2019 - 07:17

गणेश चतुर्थीची लगबग सगळीकडं सुरु आहे.कुठं मांडव बांधणं तर कुठं जमलेली वर्गणी आणि होणारा खर्च याचा ताळमेळ घालणं सुरु आहे.मुंबईतलं एक मंडळ नाव:विघ्नहर्ता गणेश मंडळपण याच कामात मग्न आहे.मंडळ म्हणजे नावाचा बोर्ड आणि एक लाकडी बाक.गणेश चतुर्थीच्या वेळी या बाकाला फार महत्व असतं,बाकी दिवस तिथे कोणी नसतं.
मंडळ तसं छोटे आहे.दरवर्षी १०दिवस गणपती असतो तसा याही वर्षी आहे.रोज सकाळ संध्याकाळ आरती,प्रसाद न चुकता होतो.एका मंत्र्याच्या आशिर्वादावर मंडळातील कारभार चालु आहे.

विषय: 

मला काहीच आठवत नाहीये भाग ४ - भेट!

Submitted by अज्ञातवासी on 1 January, 2019 - 13:12

क्षमाप्रार्थी

Submitted by ashokkabade67@g... on 30 December, 2018 - 08:48

मित्रांनो गतवर्षात माझ्या लिखाणामुळे कुणाला दुख झाले असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला क्षमा करा. तसेच येणाऱ्या नववर्षाच्या मायबोलीवर असणाऱ्या प्रत्येकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा .नववर्ष आपणास सुखसमरुद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना?

विषय: 

रोमँटिक नवरा

Submitted by mrunal walimbe on 29 December, 2018 - 11:11

आज खूप दिवसांनी तिचा नवरा फारचं रोमँटिक झाला होता. सकाळी उठल्यापासून चं त्यानं 'बाईसाहेब आपली काय सेवा करु 'असेचं डायलॉग चालू केले होते. ती पार गोंधळून गेली होती. सकाळी तर त्याने चक्क मुलांचं आवरायला मदत केली आणि सर्वात क्लायमॅक्स म्हणजे त्याच्या नावडीचं कामं म्हणजे मुलांना शाळेच्या बसमध्ये ही बसवून आला होता तो. तिला काही चं कळत नव्हते. आज याचा मूड इतका कसा कायं छानं...
तिने आठवायला सुरवात केली आज सासरच्या जवळच्या नात्यातल्या कोणाचा वाढदिवस आहे का की कोणी येणारं आहे का त्याच्यांपैकी जेणेकरून त्याला ते आपल्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तरं नाही ना!...

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन