१) पाव वाटी तांदूळ
२) अर्धी-पाव वाटी चन्याची डाळ - भिजवलेली
३) एक चमच मोहरी
४) मोहरी फोडणी द्यायला तूप
५) मीठ
६) कढीपत्त्याची पाने
७) चार ग्लास ताक
१) आधी पाव वाटी तांदळाचा भात करुन घ्यायचा.
२) कढईत मोहरी आणि कढीपत्त्याची पाने तूपात फोडणी द्यायची.
३) वरतून चार ग्लास ताक ओतायचे.
४) ताकाला एक उकळी आली की त्यात भिजवलेली चना डाळ घालायची
५) लगेच भात घालायचा आणि संथपणे ढवळायचे.
ताक भात तयार. तमिळ लोकांमधे हा भात उपासाला चालतो. तुम्ही उपास नसेल तेंव्हा करा.
आज झाले काय की मला वरीची गोड खीर करायची होती उपास होता म्हणून. पण सकाळी तेवढा वेळ मिळालाचं नाही. ऑफीसजवळ एक तमिळ मंदीर आहे. तिथे दुपारी गेलो पण ते बंद झाले होते. मग संध्याकाळी गेलो त्यावेळी महाशिवरात्रीनिमित्त तिथे बरीच गर्दी होती. मी लगेच पुजा आटोपून पायरीवर बसलो. कुणीतरी मला एका ग्लासात हा ताक भात आणून दिला. मी आजूबाजूला पाहिले तर एक पुजारी सर्वांना पेल्यात हा वाफाळता ताक भात देत होता. मी एक पेला ताक भात पिऊन तृत्प झालो. चवीला तो एकदम खंग्री झाला होता. तशी त्यांना कृती विचारायची गरज नव्हतीचं कारण खाताना हा पदार्थ कसा बनवला असेल याबद्दल कधीकधी आपसूकचं कळते. तरी मी त्यांना विचारले व त्यांनी अशीच कृती सांगितली.
ताक पातळ असावे आणि भात नावापुरताच असावा.

