इतिहास

तमिळनाडूचा इतिहास भाग- २

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 1 September, 2022 - 08:40

पहिल्या भागाची लिंक

https://www.maayboli.com/node/82174

ओस्लोच्या एका दुकानातील “पन्नास टक्के सवलतीत” विभागात मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकाच्या आवरनावर एक विशाल हत्ती होता, त्याच्या डोक्यावर जाळीदार कवच आणी पाठीवर मशाली बांधल्या होत्या. ही वयोवृध्द थ्रिलर लेखक विल्बर स्मिथ ह्यांची “घोस्ट फायर” कादंबरी होती. त्यातील गोष्ट त्या काळखंडापासून आणी त्या जागेवरून सुरू होते जिथून मी ही ईतिहासकथा सुरू करतोय.

विषय: 

तमिळनाडूचा इतिहास. - भाग १

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 31 August, 2022 - 14:59

उत्तर भारतीय अनेक कारणांनी तमिळनाडूत जातात. तीर्थयात्रेला, चेन्नईतील एखाद्या संगणक कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी. कोणत्याही सरकारी पदावर. शिवकाशीच्या फटाका उद्योगात नोकरीला, कोईम्बतूर येथील गुजराती आणि मारवाड्यांच्या कारखान्यात. सालेमच्या कारखान्यात.
तिरुपूरमध्ये मी बिहारच्या एका माणसाला विचारलं, “तू इथे कसा आलास?”, गावातील एका भावाने त्याला नोकरी लावल्याचे त्यांनी सांगितले.
मी विचारले, "तुला इंग्रजी येते का?
तो म्हणाला, “इंग्रजी अवघड आहे. त्यामुळे मी तमिळ शिकलो.”

विषय: 

बलशाली भारत होवो .... !

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2022 - 10:02

राष्ट्रगीताची धून ऐकू आली कि अंगावर काटा येतो, छाती अभिमानाने भरून येते. वंदे मातरम सुरु होताच कान टवकारतातच , पण तन-मन आर्त होत, कुठेतरी खेचलं जातं. जगाच्या काना कोपऱ्यात कुठेही असलेल्या ( बहुतांशी) सर्व भारतीयांचं असचं होत असावं.
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यानिमित्ताने खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जातायत, 'हर घर तिरंगा' ह्या पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन घराघरात तिरंगा फडकतोय, तिरंग्याचे पावित्र्य आणि सन्मान राखला जातोय ना ह्याचीही दक्षता घेतली जाईलच (ही अपेक्षा), सगळंच खूप सुखावणारं आहे.

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन

Submitted by उपाशी बोका on 14 August, 2022 - 14:05

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा होणार आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांना शुभेच्छा.

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.

विषय: 

श्री तुळजाभवानी मंदीर परीसर

Submitted by अभि_नव on 28 July, 2022 - 23:00

श्री तुळजाभवानी मंदीर परीसर, धाराशीव येशील पावसाळ्यातल्या संध्याकाळी काढलेले छायाचित्र

किशोर रामचंद्र मुंढे...आपण पुढील लेख कधी टाकणार?

Submitted by फलक से जुदा on 1 July, 2022 - 07:53

मागील लेख क्रमशः वाचुन प्रतीक्षेत असणारा तुमचा एक चाहता.

"आफ्रिकन आरोपीला त्यांचे केस कापायला सांगून त्यांचे जेवण, गादी, पांघरूण ई व्यवस्था कोठे करायची याची चाचपणी करू लागला. हॉलच्या बाहेर ज्या ठिकाणी केस कापण्याचा कार्यक्रम सुरू होता तिकडे नविन आरोपींना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. ------ किशोर रामचंद्र मुंढे, अजमान. क्रमशः"

विंबल्डनचे सेंटर कोर्ट

Submitted by पराग१२२६३ on 25 June, 2022 - 10:21

टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी.

शब्दखुणा: 

राष्ट्रपती भवन, अम्मा जी आणि सर जी

Submitted by अनिंद्य on 14 June, 2022 - 02:56

भारताचे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. (लेख त्याबद्दल नाही) लवकरच सध्याचे राष्ट्रपती दिल्लीतील भव्य राष्ट्रपती भवनातून दुसरीकडे राहायला जातील आणि नूतन निर्वाचित राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय रायसीना हिलवरच्या ब्रिटिश राजवटीने बांधलेल्या व्हॉईसरॉय हाऊस उर्फ आताचे राष्ट्रपती भवन नामक राजेशाही प्रासादात राहायला येतील.

अपरिचित पोलो

Submitted by पराग१२२६३ on 20 May, 2022 - 23:36

भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत.

शब्दखुणा: 

50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

Submitted by पराग१२२६३ on 15 May, 2022 - 04:59

मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत.

Pages

Subscribe to RSS - इतिहास