उद्योजक

मत्स्यपालन व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by सप्रस on 15 June, 2019 - 06:18

नमस्कार मायबोलीकर, वडील पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना आमच्या गावी कोकणात मत्स्यपालन व्यवसाय सुरु करायचा आहे जेणेकरून दोन पैसे मिळतील आणि वेळही मजेत जाईल. तर कोणाला हा व्यवसाय कसा सुरु करायचा याबद्दल काही माहिती आहे का? काही शॉर्ट टर्म कोर्सेस वैगरे आहेत का मुबंईत?

विषय: 

घरगुती कपड़्याचा व्यवसाय कसा वाढवावा

Submitted by Cuty on 19 April, 2019 - 06:30

घरगुती व्यवसाय आहे. लेडीज कपड़याची विक्री करते. नुकतीच सुरूवात केली आहे. विक्री वाढण्यासाठी काय करावे?

म्हाडा लॉटरी मधील नाव बदल करण्यास कोणी मदत करेल का?

Submitted by मया on 19 January, 2019 - 01:25

माझ्या बायकोला लग्नापूर्वी म्हाडा लॉटरी मध्ये फ्लॅट लागला होता त्याचे आता सर्व हौसिंग लोन पूर्णपणे संपलेलं आहे परंतु आता माझ्या बायकोला तीच नाव बदल करून घ्यायचं आहे (लग्नानंतरच). त्यासाठी काय करावे लागेल जेणे करून ते नावात बदल करून मिळेल तिच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत.
१)आधार कार्ड २) पॅन कार्ड ३)Marriage सर्टिफिकेट ४)रेशन कार्ड वर देखील नाव आहे

म्हाडा मधील नाव बदल करून घेण्यास काय करावे लागेल त्या बदल कोणी माहिती देऊ शकेल का.

महिला सक्षमीकरण म्हणजे काय बरे????

Submitted by Mi Patil aahe. on 15 January, 2019 - 06:09

काल "मिटक्वान इ स्कूल" चे उद्घाटनप्रसंगी आलेले राजकीय (आमदार वगैरे...) इंडस्ट्रियल मान्यवर (अर्थात सर्व पुरुष) महिला सक्षमीकरण वर जास्त भर देत होते.जे ते सर्व ऐकून ऐकून गुळगुळीत झालेले शब्द,वाक्य पुन्हा आपल्या तोंडून प्रेक्षकांच्या कानाला ऐकवत होते, खरंतर मला अशा औपचारिक कार्यक्रमांत सहभागी व्हायला फारसं मनाला रूचत नाही,पण नाईलाजाने का होईना मी हजेरी लावल्याने हे सारे माझ्या कानात शिरत होते, अन् प्रश्र्नांची मालिका सुरू झाली.त्यातलाच हा एक प्रश्र्न तसा तोही जुनाच पुन्हा नव्याने माझ्या मनातून बाहेर डोकावून पाहू लागलाय बघाss बाहेर---"महिला सक्षमीकरण म्हणजे काय बरे???????"

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

हृदयस्पर्शी माधवबाग

Submitted by किरण भिडे on 9 August, 2018 - 09:19

माझ्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात १९९९ साली झाली. मी, माझा भाऊ श्री अतुल भिडे आणि सुप्रसिद्ध वैद्य कै. माधव साने( त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा डॉ रोहित साने ) अशी तिघांनी मिळून 'वैद्य साने आयुर्वेद लॅब.' नावाची कंपनी सुरु केली. आयुर्वेदिक औषधनिर्मिती हा हेतू असणारी कंपनी नंतर 'माधवबाग' या आज हृदयरोगनिवारणाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमवून असणाऱ्या नाममुद्रेकडे कशी वळली?, काही औषधं ते सव्वाशेहून अधिक क्लिनिक्स आणि दोन हॉस्पिटल्स चा पसारा कसा उभा राहिला ? या सगळ्यावर एक पुस्तक लिहावं असं खूप जणांनी सुचवलं होतं. आणि तो योग प्रत्यक्षात आला २०१६ साली.

हॉटेल चालवणे 'खायचे काम' नाही...

Submitted by किरण भिडे on 1 August, 2018 - 02:06

'मेतकुट जमलं!' हा लेख हॉटेल सुरु करतानाचे अनुभव आणि सुरु झाल्यावर पहिल्या काही दिवसांमधले अनुभव यावर आधारित होता. 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक श्री भानू काळे यांनी हा प्रवास जवळून पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या आग्रहाने तो लेख मी 'अंतर्नाद' साठी लिहिला होता. खालील लेख लोकसत्ता च्या आरती कदम यांनी हॉटेल सुरु झाल्यावर साधारण दोन वर्षांनी माझ्याकडून लिहून घेतला. चतुरंग पुरवणीत हा लेख यापूर्वी म्हणजे २०१७ जानेवारीत येऊन गेलाय. 'मायबोली' च्या वाचकांसाठी पुनश्च देत आहे...

मेतकुट जमलं !!

Submitted by किरण भिडे on 26 July, 2018 - 01:33

’’आई, अगं केवढ्या पुरणपोळ्या केल्या आहेस या ?अख्ख्या बिल्डिंगला वाटायच्यात की काय ?’’

‘‘गप रे! समोरच्या मेनन काकूंकडे द्यायच्यात यातल्या दहा. त्यांचा मुलगा सूनपण येणारेत आज त्यांच्याकडे. उद्या चार शाळेत पण घेऊन जाईन. स्टाफरूममध्ये परवाच विचारत होते, भिडे मॅडम बर्‍याच दिवसात पुरणपोळ्या नाही खाल्ल्या तुमच्या हातच्या.‘‘

‘‘आई अगं तुला लोक चढवतात हरभर्‍याच्या झाडावर आणि तू पण किलो किलोच्या पुरणपोळ्यांचा घाट घातलास.  धन्य आहे तुझी.  आपल्या पुरत्या करायच्या तर.....’’

माझं वाक्य अर्ध तोडत, ’’असू दे रे. तेवढ्याच चार जणांच्या तोंडी लागतात.’’ असं म्हणून आईने विषय संपवला.

बिझनेस आईडिया हवी आहे

Submitted by गरम मसाला on 20 March, 2018 - 16:38

२-३ लाख रुपये गुंतवणुक करून बरा - चांगला मोबदला देणारा एखादा बिझनेस सुचवा.

शहर: कोल्हापूर

DBK Academy, Ahmednagar

Submitted by चंपक on 16 October, 2017 - 08:32

डीबीके अ‍ॅकॅडेमी, अहमदनगर
(देसरडा-भंडारी-करडक अ‍ॅकॅडेमी, उर्फ डॉ. भारत करडक अ‍ॅकॅडेमी!)

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरु केलेला हा नवा उपक्रम. महेश ट्युटोरिअल्स ची फ्रँचाईजी! नगर शहरातील दोन ठिकाणी व पाथर्डी या तालुक्याच्या ठिकाणी असे तीन ठिकाणी उत्तमरित्या चालु आहे.
इ. ८-९-१० ला शहरात उत्तम प्रतिसाद आहे.
इ. ११-१२ ला पाथर्डी मध्ये उत्तम प्रतिसाद आहे. नगर शहरात एप्रिल २०१८ ला इ ११ वी नव्याने लाँच करित आहोत!

धन्यवाद!

शिक्षण पद्धतीतील क्रांतीकारी बदलासाठी नगरकरांनो व्हा सज्ज !!!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - उद्योजक