उद्योजक

माझा उद्योग

Submitted by विनिता.झक्कास on 8 June, 2021 - 13:56

माझा उद्योग...

नमस्कार मायबोलीकर,

माझा मागील धागा आमच्या स्पोर्टस ट्रेनिंग सेंटरचा होता, खूप उत्साहाने हे प्रोजेक्ट बनवलेले आहे, पण कोरोनाने मुले घरात, शाळा, ट्रेनिंग सेंटर बंद!
त्यामुळे आम्ही पण गप्प बसलो. पण हे गप्प बसणे पण झेपेना! काहीतरी करायला हवेच ना! काय करावे बरे?
मी विचारात होतेच....

आणि अचानक....

झाले असे, मला चिंच फार प्रिय...चिंच नाही मिळाली तर चिंचेचा पाला खाणारी मी! मधे सार बनवायला चिंच आणली. बघते तर चिंचेची सालं, रेशा, पाने सगळे त्याला चिकटलेले, तशीच ती दाबून पॅक केलेली.

पर्सिस्टन्ट सिस्टिम्स आणि सुशांत सिंग राजपूत बादरायण संबंध

Submitted by एकुलता एक डॉन on 5 June, 2021 - 12:51

१) आत्महत्या आणि आरोप
२००८ मध्ये संदीप शेळके नावाच्या IIT मधून पास झालेल्या सॉ इंजिनेर ने पर्सिस्टन्ट मधून उडी घेऊन आत्महत्या केली होती
नंतर जवळपास एक महिन्यात अजून एकाने नागपुरात राहत्या घरी गळफास घेतला होता ,बातमी आली नाही पण मुक्तपीठ मध्ये आले होते
तसेच एकाने आत्महत्याची चिट्ठी लिहिली होती
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/IIT-alumnus-jumps-to-death...

एफिलिएट मार्केटिंग काय आहे ?

Submitted by सुदर्शन दळवी on 28 May, 2021 - 06:51

Affiliate Marketing म्हणजे इतर लोकांच्या (किंवा कंपनीच्या) उत्पादनांना
प्रोत्साहन देऊन कमिशन मिळविण्याची प्रक्रिया. म्हणजे तुम्ही दुसर्यांचे उत्पादन
Promote करायचे. त्याबदल्यात ते तुम्हांला काही पैसे देतात.

समजा, तुम्ही Amazon च्या  Affiliate Programme मध्ये सामील झाले आणि Amazon चे एखादे उत्पादन प्रोत्साहित केले तर Amazon तुम्हांला काही कमिशन देते.

शब्दखुणा: 

इलेक्ट्रॉनिक्स लघुउद्योग क्षेत्रात हे काय चालले आहे?

Submitted by केअशु on 1 January, 2021 - 23:04

परदेशातून भारतात कमीत कमी खर्चात पैसे कसे पाठवावे?

Submitted by साधना on 31 October, 2020 - 11:38

माझी मुलगी ऑनलाईन जर्मन व मराठी भाषेचे वर्ग घेते. तिचे काही विद्यार्थी परदेशात आहेत.

यातल्या काही लोकांची तिथल्या भारतीय बँकेत खाती आहेत. ते फी खात्यातून ट्रान्सफर करतात तेव्हा मुलीच्या खात्यात एकही रुपया कट न होता सगळे पैसे येतात. बँकेचा जो एक्सचेंज रेट असतो त्याप्रमाणे पैसे मिळतात.

ज्यांची अशी खाती नाहीत त्यांच्याकडून मुलगी paypal ने फी घेते. इथे त्रास असा आहे की paypal स्वतःचा एक्सचेंज रेट वापरते जो बँकेपेक्षा कमी आहे आणि वर कमिशनही जास्त घेते. तिचा यामुळे दुहेरी तोटा होतो.

मला या संदर्भात खालील माहिती हवी:

उद्योजक व्हायचंय? इस्रोबरोबर व्यवसायाच्या संधी.

Submitted by एविता on 24 October, 2020 - 11:33

नमस्कार,
मायबोलीवर असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रीणीना विजयादशमी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही कामना.

मी मागे लिहिलं तसं आमच्या प्रोजेक्ट चे काम जोरात सुरू आहे. KRARERISS ची सर्व कागद पत्रे सरकारी कचेरीत जमा केलेली आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स लवकरच प्रमाणपत्र देईल हे ही नक्कीच.

शब्दखुणा: 

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

Submitted by ताजे प्रेत on 24 September, 2020 - 13:46

हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?

मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.

मिशन मंगळ

Submitted by एविता on 7 September, 2020 - 01:35

मिशन मंगळ

२० ऑगस्टला इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या 'अनलॉकिंग इंडियाज पोटेन्शिअल इन स्पेस सेक्टर' (Unlocking India's Potential in Space Sector) या वेबिनार मध्ये आम्ही भाग घेतला होता. इस्रोचे खाजगीकरण होणार आहे अशा चर्चा बऱ्याच काळ चालत होत्या परंतु तसे काहीच होणार नाही, पण खासगी कंपन्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं आणि त्यामुळे तंत्रज्ञान विकास आणि क्षमता विस्तार होऊ शकेल, असं इस्रो चेअरमन के सिवन म्हणाले. खासगी कंपन्या इस्रोसोबत अंतराळ मोहिमांत भाग घेतील परंतु मुख्य काम इस्रो आणि त्याचे वैज्ञानिकच करतील असं ही ते म्हणाले.

दाम देईल त्याचे काम

Submitted by सखा on 24 August, 2020 - 01:18

तुम्ही जर कार्पोरेट नोकरी करत असाल तरच या पुढे वाचा. हे माझे कॉर्पोरेट जगतातील तीस वर्षाचे अनुभव आहेत. लक्षात ठेवा कुठली ही कंपनी तुम्हाला नौकरी वर ठेवताना चॅरिटी म्हणून ठेवत नसते. तुम्ही जर नोकरी करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला इंडिव्हिज्युअल प्रॉफिट सेंटर समजले पाहिजे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उद्योजक