कुमार गंधर्व

'सह-गान' (विदुषी वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली)

... 'चैत्या, अरे तुम्ही चेन्नईत असून किती रे भाग्यवान?' अशा वाक्याने बंगलोरमधली एक मैत्रीण मला पुढे एकही अक्षर उच्चारू न देता फोनवर सुरू झाली ! मागच्याच आठवड्यात शुभा मुद्गलांचं गाणं ऐकायला गेल्याचं मी तिला सांगितलं होतं. आणि तिने मला या आठवड्यात चेन्नईत होणार्या श्रीमती वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली यांच्या 'सह-गान' बद्दल सांगायला फोन केला होता.
माझ्या पत्रिकेत त्या दोन आठवड्यात 'संगीत-घबाड' योग असणार खास ! (संगीत-घबाड हा शब्द माधव यांच्याकडून साभार स्मित)

हिरना... समझ-बूझ बन चरना

कुमारांचं निर्गुणी भजन ऐकत होतो.
कुमारांनी ते शब्द इतक्या आर्ततेने आळवलेत की काही केल्या ते शब्द विसरेनात. पण त्याचा अर्थ मात्र तितकासा कळला नाही.

शब्द असे आहेत -

हिरना...
समझ बूझ बन चरना
एक बन चरना
दूजे बन चरना
तीजे बन पग नही धरना

तीजे बन में पाँच पारधी
उन के नजर नही पडना
पाँच हिरना पच्चीस हिरनी
उन में एक चतुर ना

तोए मार तेरे मास विकावे
तेरे खाल का करेंगे बिछोना

कहे कबीरा जो सुन भइ साधो
गुरू के चरन चित धरना

इथून थोडा-फार अर्थ कळला. http://kabir-bani.blogspot.com/2009/10/5-hirana.html

हे हरिणा, या अरण्यात समजून-उमजून चर. अतिशय सावधगिरीने वावर.

कुमार माझा सखा! - डॉ. चंद्रशेखर रेळे

0

पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वेगळंच वळण दिलं हे सर्वश्रुतच आहे. विष्णु दिगंबर आणि त्यांच्या गांधर्व महाविद्यालयानं अनेक गायक व शिक्षक तयार केले. त्यांपैकीच एक प्रो. बी. आर. देवधर. विष्णु दिगंबरांनी ज्यांना गायनाबरोबरच शालेय शिक्षणाचीही परवानगी दिली, असे देवधर हे एकमेव विद्यार्थी. कलाशाखेची पदवी मिळवलेले देवधर मास्तर हे त्या काळी एकमेव शिक्षित असे गायक होते. विष्णु दिगंबरांच्या परवानगीने त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवले होते.