गोधडी

क्विल्ट अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर

Submitted by मनीमोहोर on 23 April, 2017 - 14:12

क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर ह्यात मला खुप रस आहे. कापडाचे छोटे छोटे तुकडे जोडुन केलेली निरनिराळी डिझाईन्स पाहिली की मी थक्क होऊन जाते. मला वाटतं ह्या कलेचा शोध गरजेतुन लागला असेल कारण पूर्वीच्या काळी जेव्हा तयार कापडाची एवढी मुबलकता नव्ह्ती तेव्हा कापडाचा एखादा लहानसा तुकडा ही फेकुन देववत नसेल . कापडाची चिंधी न चिंधी वाचवण्याच्या उद्देशानेच ह्या कलेचा जन्म झाला असेल.

विषय: 

आजीची कलात्मक गोधडी

Submitted by मंजूताई on 19 September, 2013 - 05:30

'गोधडी' शब्द उच्चारला की तो 'आजी' ह्या विशेषणाविना अधुरा वाटतो नाही का? प्रेमळ मायेची ऊबदार गोधडी ही आजीचीच! कोणे एकेकाळी(?) नऊवारीतली अन पांढऱ्या केसांची बाई म्हणजे आजी हे समीकरण होतं आता हे इतिहासजमा झालंय. आजच्या पिढीला आज्या ह्या सलवार कमीजमधल्या किंवा फार झालं तर साडीतल्या! त्यामुळे आजीच्या गोधडी प्रश्नच नाही. गोधडी हा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जुन्या कपड्यांना टाकून न देता त्याला कलात्मक नवीन रूप देऊन त्याचे 'रिसायकलिंग' (पुर्नरवापर) करणे. त्यापाठीमागे आर्थिक कारण जास्त असावीत किंवा वाया जाऊ न देणे हे तत्त्व असावे पर्यावरण पूरकतेपेक्षा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गोधडी