कचरा व्यवस्थापन

पुण्यातला कचरा

Submitted by बाळू पॅराजंपे on 18 March, 2015 - 11:40

पुण्यातल्या कच-याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. गेले काही महीने कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी साठलेले कच-याचे ओंगळवाणे ढीग पाहून आपण एका सांस्कृतिक राजधानीच्या शहरात राहतो हे खरे आहे का असे वाटू लागलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते कच-याच्या ढिगाने अडले आहेत. पाश्चात्य देशातले नागरीक आश्चर्याने कचरा व्यवस्थापनाकडे पाहतात. काही ठिकाणी कच-याला रात्री आग लावून दिली जाते. नागरी वस्तीत कचरा जाळायला मनाई आहे, कारण त्यामुळे घातक वायूंची निर्मिती होते. पण असा साठवून ठेवण्याने आरोग्याला धोका होतोच आहे.

कचरा व्यवस्थापन

Submitted by वेल on 14 November, 2013 - 07:05

ही माहिती माबोकर आरती यांनी दिलेली -
ह्या लिंकवर http://www.maayboli.com/node/5886
मला असे वाटले की ही माहिती घरची बाग ह्या पानावर सुद्धा असली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी वाचली पाहिजे म्हणून इथे पेस्ट केली, आरती ह्यांची परवानगी न घेता, त्या मला माफ करतील अशी आशा.

कचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.
आरती | 17 February, 2009 - 17:02
आपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे.

विषय: 

'अर्बन लीव्हज्' (Urban Leaves)च्या संस्थापिका प्रीती पाटील यांची मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 August, 2013 - 05:04

महानगरांमध्ये आपल्या घरात, बाल्कनीत, परसदारी किंवा टेरेसवर हौसेने बाग फुलविणार्‍यांची संख्या कमी नाही. ग्लोबल वॉर्मिंग, अन्न सुरक्षेसंबंधीच्या प्रश्नांच्या वातावरणात मुंबईसारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागांमध्ये अर्बन फार्मिंग (नागरी शेती) सामुदायिक स्वरूपात (कम्युनिटी फार्मिंग) यशस्वीपणे अंमलात आणणार्‍या प्रीती पाटील यांचा प्रवास स्फूर्तिदायक आहे. शाश्वत शेतीचे धडे देणारे त्यांचे कार्य व त्यांची संस्था अर्बन लीव्हज् (Urban Leaves) यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा योग आला. त्यांची ही मुलाखत खास मायबोलीकरांसाठी!

Subscribe to RSS - कचरा व्यवस्थापन