१८.१०.२०१० या दिवशी जेव्हा संध्याकाळी पाउस चालु झाला आणि वीजा चमकायला लागल्या. मग मला कल्पना आली की आपण कॅमेरात वीज पकडायची आणि मी कॅमेरा घेउन गॅलेरीत गेलो . बसायला खुर्ची नव्ह्ती ( घरात आहेत गॅलेरीत नव्ह्ती) मग मी तीथे असलेली बादली उपडी करुन त्यावर बसलो वीज पकडायला. पण मी कॅमेरा उजवीकडे पकडला की वीज डावीकडे चमकायची आणि डावीकडे पकडला की उजवीकडे. काही वेळाने अस लक्ष्यात आल की डावीकडे जास्त प्रमाण आहे . मग मी तीथे कॅमेरा रोखुन बसलो. एक वीज चमकुन गेल्यावर दुसरी चमकायला कमीत कमी ५ ते १० मीनिट लागायची.


