सत्यजित

बॉसेस एक संतुलनीय अभ्यास

Submitted by सखा on 6 March, 2017 - 08:41

मित्र मैत्रिणींनो,
माझ्या अनेक वर्षाच्या सर्व्हिस नंतर आणि अनेक गोरे, काळे, कमी काळे, थोडे गोरे, देशी, विदेशी बॉसेस कोळून पिल्यावर माझे जगातील बॉसेसचे ढोबळ मानाने वर्गीकरण असे:
सदा त्रस्त: हे कायम चीड चीड करत असतात.
सदा व्यस्त: हे नेमके काय करतात हे गूढ आहे पण हे म्हणे नेहमी बिझी असतात.
सदा मस्त: हे खुश मिजाज असतात हे आणि यांच्या खालचे दोन्ही मजेत जगतात.
सदा भीतीग्रस्त: हे घाबरट असतात. भीतीने यांची कायम बोबडी वळलेली असते. हे आपल्या साहेबाला नाही म्हणूच शकत नाहीत.

शब्दखुणा: 

वळेसार

Submitted by सत्यजित on 28 December, 2014 - 15:20

पारिजात निवडुन घे
किंवा बकुळ घे वेचुन
अबोलीचा गजरा घाल
वा चाफा माळ खोचून

हळुवार वेणीशी खेळताना
तुटले केस वेचुन घे
नखाने जमिन उकरताना
अंगणभर नाचुन घे

डोळ्यांचा मनाशी
चालला असतो लपंडाव
धप्पा देत मन कधी
कधी मनावर येतो डाव

पदराच्या शेवाला कितीदा
भर भर पडतो पिळ
स्पंदनाच्या ताला वर
श्वासांची घुमते शीळ

मावळतीला कलता उन्हं
मोत्यांची नयनी धार
अलगद साजण येतो मागुन
श्वासात भिनतो वळेसार

- सत्यजित.

नाटक काय ? हम्म्म... (बालगीत)

Submitted by सत्यजित on 19 April, 2013 - 00:56

मुसूमुसू मुसूमुसू रडतंय कोण ?
हातांमागे दडतंय कोण
दोन बोंटाचा झाला कोन
गुपचुप बघतात डोळे दोन

कुठुनी आला राज कुमार
बोटां वरती होऊन स्वार
दुडुदुडु दुडुदुडु पळू लागता
खुदकन झाले रडू पसार

गुदुगुदु गुदुगुदु गुदगुल्या
खुदूखुदू खुदूखुदू खुदखुदल्या

नाटSSSक काय ? हम्म्म...

-सत्यजित.

Subscribe to RSS - सत्यजित