अनुमती

मनात घर करणारा चित्रपट : 'अनुमती'

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 June, 2013 - 07:55

डोळ्यांना सुखावणारं आल्हाददायी निसर्गचित्रण, श्रवणेंद्रियांना शांत करणारं मधुर पार्श्वसंगीत, मनाची पकड घेणारी व गुंतवून टाकणारी पटकथा आणि आपल्या कसदार, विलक्षण ताकदीच्या अभिनयाने हा सारा पट जिवंत करणारे, मनावर ठसा उमटवून जाणारे अभिनेते.... 'अनुमती' चित्रपटात ह्या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात! एक संपन्न, समृद्ध अनुभव देताना तुमच्या-आमच्या मनात ही 'अनुमती' घर करून जाते हे निश्चितच!

'अनुमती' - एका निर्णयाचा प्रवास

Submitted by आशूडी on 15 June, 2013 - 03:04

गजेंद्र अहिरे या नावासोबत अनेक गोष्टी आपसूक येतात. मुख्य म्हणजे अस्सल दर्जेदार कथाबीज. एखादी कथा जेव्हा आपण सहज 'रिलेट' करु शकतो तेव्हा लेखकावर अधिक जबाबदारी येते ती वाचकाला गुंतवून ठेवण्याची. काही घटना, प्रसंग इतके सहज, रोज घडत असतात की त्यावर लिहीणं महाकठीण होऊन बसतं. म्हणूनच जगणं चिमटीत पकडून त्याचं बिनचूक निरीक्षण मांडणारे लेखक-कवी कायमच वाचकांच्या मनात स्थान मिळवतात. अहिरेंच्या कथा अशाच असतात. दीर्घकाळ मनात रेंगाळणार्‍या. परिस्थितीचं भान जपणार्‍या. त्यातून कोणता संदेश, तात्पर्य वगैरे मिळत नसतं. या कथा असतात माणसांच्या.

विषय: 
शब्दखुणा: 

आपल्या जोडीदारासह पहावा असा 'अनुमती' (चित्रपट)

Submitted by केदार जाधव on 14 June, 2013 - 15:16

सर्वात आधी मी चित्रपटाच्या प्रिमिअरला जाण्याची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे
आभार मानतो . माझ्या ओळखीच तस कुणीच या क्षेत्रात नसल्याने अस काही घडेल असा मी
कधी विचारही केला नव्हता .त्यामुळे आधीच सगळीकडे मी "हवा" करून ठेवलेली होतीच .
पण सुखद धक्का बसला तो ह्या लोकांचा साधेपणा पाहून .
विक्रम गोखले काय किंवा दिलीप प्रभावळकर काय, आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांच्या
मानाने कितीतरी मोठी माणसं . पण त्यांच्या वागण्यात , बोलण्यात त्याचा लवलेश
ही नव्हता .
नंतर झालेला छोटेखानी स्वागत समारंभ ही छान .
प्रिमिअर बद्द्ल अजून कितीतरी लिहिता येईल पण जस हॉटेल कितीही छान असेल ,

विषय: 
शब्दखुणा: 

'अनुमती'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 12 June, 2013 - 12:36

'अनुमती' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ शुक्रवार, १४ जून, २०१३ रोजी पुण्याच्या सिटिप्राइड कोथरूड चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'अनुमती'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

या खेळाची काही तिकिटं आपल्याकडे आहेत.

'अनुमती'च्या निमित्ताने गप्पा अभिनेत्री रिमा यांच्याशी

Submitted by पूनम on 11 June, 2013 - 01:08

एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. १९८० सालच्या ’आक्रोश’, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो'मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे.

विषय: 

सहजीवनाचा अर्थ सांगणारा 'अनुमती'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 April, 2013 - 13:25

सहजीवन म्हणजे नेमकं काय, हे सांगणारा नवा चित्रपट - 'अनुमती'.

तरुण, प्रयोगशील दिग्दर्शक व लेखक श्री. गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट ३ मे, २०१३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ कालावधीनंतर प्रख्यात छायालेखक श्री. गोविंद निहलाणी यांनी मराठी चित्रपटासाठी छायालेखन केलं आहे. यापूर्वी 'शांतता! कोर्ट चालू आहे' आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या 'झाकोळ' या दोन चित्रपटांचं छायालेखन त्यांनी केलं होतं. 'अनुमती' हा श्री. निहलाणी यांचा तिसरा मराठी चित्रपट.

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये 'अनुमती'नं प्रेक्षकांची व समीक्षकांची वाहवा मिळवली आहे.

विषय: 

साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांचं वर्चस्व

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 March, 2013 - 14:40

आज जाहीर झालेल्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपटपुरस्कारांत मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

'अनुमती' या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटासाठी श्री. विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

IMG_7884.JPG

'संहिता' या सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटातील संगीतासाठी श्री. शैलेंद्र बर्वे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

Subscribe to RSS - अनुमती