महिला दिन २०१३

महिला दिन २०१३

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2013 - 12:39

mahiladin2.jpg८ मार्च २०१३ ... आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे संयुक्ताचे हे चौथे वर्ष! स्त्रीबाबत समाजाच्या मानसिकतेचा विकास होणे ही फक्त काळाची गरज राहिली नसून स्त्री-स्वास्थ्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे प्रत्येकाची गरज झाली आहे. त्याच दिशेने मार्गक्रमणा करताना, वाटेतल्या अडसरांना ओलांडून पुढे जात असताना जे प्रश्न आपल्या मानसिकतेचा व वर्तनाचा पुनश्च विचार करायला लावतात अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा व त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वर्षीच्या महिला दिन उपक्रमात केला आहे.

विषय: 

नात्यातील भुतांचा बंदोबस्त

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:23

natyatil_bhute_3.png“A promise is a promise : Time for action to end violence against women"
ही आहे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेली, इ.स. २०१३ची 'आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम!

विषय: 

'घर दोघांचं'

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:17

ghar doghaanche2_0.jpg

चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्‍याने आवरायचं
'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं
' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.

विषय: 
Subscribe to RSS - महिला दिन २०१३