मनोरंजन

प्रतिसादामुळे गाजलेले धागे

Submitted by ढंपस टंपू on 26 August, 2023 - 00:08

धाग्याची प्रेरणा - बोकलत सरांचा आदेश

मायबोलीवर काही धागे लेख, कथेपेक्षा त्यावरच्या प्रतिसादामुळे गाजतात. अशा धाग्यांची इथे नोंद केल्यास ते शोधताना अडचण येणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

परफॉर्मन्स रिव्ह्यु

Submitted by सामो on 25 August, 2023 - 17:05

-----------------अन्यत्र पूर्वप्रकाशित--------------------------

दरवर्षी साधारण जानेवारीच्या मध्यात अन फेब्रुवारीच्या सुरवातीला, ऑफिसच्या रुक्ष वातावरणाचा एकदम कायापालट होतो. अगदी इतका की प्रकर्षाने जाणवू लागतो. म्हणजे Employee Orientation च्या काळात ऐकलेले, घोकलेले समस्त manners सर्वांचेच,एकदमच उफाळून येतात. अचानक सौहार्द (synergy) चे लोण, वणव्यासारखे पसरु लागते. सहकार्‍यांच्या संदर्भातील, etiquettes कडे विशेष लक्ष पुरविले जाते व सर्वजण एकदम गुण्या गोविंदाने नांदू लागतात. खरं तर ऑफिसमध्ये स्वर्गच अवतरतो.

विषय: 

कामिनीचे ४१ वे प्रकरण

Submitted by सामो on 25 August, 2023 - 16:19

----------------अन्यत्र पूर्वप्रकाशित-----------------------------------
तब्बल ४१ व्या वेळी तेच फेमस , नेहमीचं, पाचवीला पुजलेलं वाक्य ऐकून माझ्या पोटात ते ऐकल्यावर येतो तस्साच गोळा आला, काहीही फरक नाही. चहाचा एकेक घुटका सावकाश घेत आणि डोळ्यात तेच हरीणीचे भाव आणून कामिनी सांगत होती
"यावेळेस हटके आहे गं. मी यावेळेस १००% प्रेमात पडले आहे."
.
मला कळून चुकले होते की आता कमीत कमी १ तासाची तरी वाट लागलेली आहे आणि पुढील कदाचित एक महीना तरी याच विषयावर आपले कान किटणार आहेत.
खुर्चीचा आधार घेत मी यांत्रिकपणे म्हटलं - "वेगळं म्हणजे नक्की काय आहे?"

विषय: 

थेंबांत उन्हाच्या रेषा

Submitted by पुरंदरे शशांक on 25 August, 2023 - 00:29

थेंबांत उन्हाच्या रेषा

थेंबांत उन्हाच्या रेषा
पाचूत मिरवल्या वाटा
रंगाची उधळण होता
स्वप्नात बिलोरी लाटा

जरतारी हिरवी शिखरे
ठिबकता थेंब हळुवार
बिंबातून झळके सोने
मऊ वाटेवर अलवार

किणकिणती घंटा दूर
मंजूळ सुरावट रानी
वार्‍यावर हलके गीत
वेळूतून पाऊस गाणी

भवताल स्वप्नसे भासे
नंदनवन अवनी सारी
सुख मावेना ह्रदयात
आकाशी घेत भरारी

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन