मनोरंजन

शी शु पालकत्व

Submitted by विद्या भुतकर on 12 January, 2017 - 14:58

डिस्क्लेमर: प्रत्येकाची 'विनोदा'ची व्याख्या वेगळी असू शकते. त्यामुळे लेख 'विनोदी लेखनात' का दिलाय वगैरे प्रश्न विचारू नयेत.

विषय: 

फुल्ल प्रुफ पिलानः एक हसीन सपना

Submitted by नानाकळा on 11 January, 2017 - 08:08

म्येंरें प्यारँ द्येषवाषियों,

जनता की खास मांगपर, सतत की डीमांडपर, एटीएमकी रांगपर फुल्लपुरुफ प्ल्यान लाया हूं. बोलो जाहीर करुं के नं करुं.... बोलो करुं के नं करुं.... करुं के नं करुं.... लो कर दिया.....

--------------------------------------
नोटाबंदीच करायची असती तर कशी करता आली असती तर ही एक आयडीया. मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा. पण आता पर्यंतचे नोटाबंदीबद्दलचे सर्व वाचलेले विसरून वाचावे लागेल. लर्न टू अनलर्न! (पण हे अनलर्न लर्नलेले कसे अनलर्नलायचे??)
मुख्य व एकमेव उद्देशः नोटाबंदीने फक्त काळा पैसा 'नष्ट' करायचा आहे.

विषय: 

आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

विषय: 

दंगलच्या निमित्ताने...........

Submitted by मानव पृथ्वीकर on 9 January, 2017 - 12:55

दंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील?
जरा आपल्या स्मरणशक्तीवर जोर द्या! दृश्ये आठवा!
आणि दंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील ते सुचवा.

उदा:

१. दंगलच्या निमित्ताने ....मुलगा व्हावा म्हणुन:
(जे उपाय दंगल चित्रपटात दाखवल्या गेले, त्यांचे वर्णन, तुमचे याबाबत काय विचार आहेत?
आणि खाली पोलः)
१. मला फक्त मुलगेच आहेत, मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरील पैकी कोणताच उपाय केला नाही.
२. मला फक्त मुलगेच आहेत मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरिल पैकी किमान एक तरी उपाय केला आहे.
३. मला अद्याप अपत्य नाही आणि माझा किंवा माझ्या जीवनसाथीचा.......

विषय: 

टिंगलच्या निमित्ताने ......निरर्थक धागे विणण्याचा कंटाळा येत नाही का ?

Submitted by आईची_लेक on 9 January, 2017 - 05:27

टिंगलीच्या निमित्ताने हा माझा शेवटचा धागा .....पण सर्वात बिनकामाचा धागा

जे टिंगल करतात त्यांच्यासाठी शीर्षकच बोलके आहे , जे टिंगल करत नाहीत त्यांना मी समजावणार नाही ...

जेव्हा धागेश्वर (धाग्यावेताळ )यांना जाणवते की आपण अभ्यासपूर्ण धागे तर विणू मात्र चर्चेत समोरच्याशी बोलताना आणि योग्य प्रतिवाद करताना जे सामान्य ज्ञान लागते ते आपल्याकडे नाहीये आणि यासाठी एकाच उपाय म्हणजे निरर्थक धागे काढणे अर्थात हा उपाय देखील सोपा होता म्हणूनच त्याच्या डोक्यात आला कारण अर्थपूर्ण धागे काढणे त्याला जमणारे नव्हते . अगदी वेगळे डू आयडी काढून त्यानी स्वतः धागे विणले आणि वाचकांना पिडले

विषय: 

४) गुप्तहेर बबन बोंडे - तेरा  बाप चोर है

Submitted by सखा on 2 January, 2017 - 01:44

(>>>अपेक्षे प्रमाणे तिचा तोल गेला आणि बबनने तिला अलगद catch केले. बबनचा जीव  वजनाने कळवळला पण ते त्याने चेहऱ्यावर दाखवले नाही. अर्थात हा अनेक वर्षांच्या ट्रेनिंग चा परिणाम. 
बबन ला पाहून ती मुलगी त्याच्या गळ्यात हात टाकून लटकेच लाजत म्हणाली <<<)

"हाय मी स्वप्न  तर पाहत नाहीये? चक्क आंतरराष्ट्रीय गुप्तहेर मायनस १०१ यांनी माझा कॅच घेतला."
"राष्ट्रीय सौंदर्य जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे मिस…"
"किती उदात्त  विचार आहेत तुमचे ...  बनचुकी .. मिस शीला बनचुकी नुकतीच मी इथे लागले आहे"
"फळं नेहमी झाडालाच लागतात"
"हं??"
"काही नाही असु देत"

वर्ष आले,वर्ष गेले..हे खरे...

Submitted by सत्यजित... on 30 December, 2016 - 17:59

हे बरे झाले तुझेही फावले...
ग्लास वेटरने तुझेही लावले!

टेबलावर स्नॅक्स होते फार पण...
नाव ओठांनी तिचे मी चावले!

फार नाही घेत मी थोडीच दे...
ओठ तृष्णेला अता लल्हावले!

मी जरासा झिंगलेला पाहुनी...
केवढे कुत्रे उरावर धावले!

वर्ष आले,वर्ष गेले..हे खरे...
'त्या' क्षणाच्या आत सारे मावले!

—सत्यजित

३) गुप्तहेर बबन बोंडे - मेरा बटू

Submitted by सखा on 30 December, 2016 - 10:32

>>>दोनच मिनिटात विमानाचा स्फोट झाला आणि त्याची वेताळ पंचविशीत कवटीची असतात तशी  पंचवीस हजार शकले होवून आभाळाच्या पायाशी लोळू लागली<<<

(चार दिवस आधी - दिल्ली)

आता जरा आपण चार दिवस मागे जावून घटनाक्रम बघूया.

२) गुप्तहेर बबन बोंडे - सदा सर्वदा योग तुझा असावा!

Submitted by सखा on 29 December, 2016 - 21:16

(ज्याच्या बद्दल आपण हे बोलतो आहोत तो लोकनायक, दिल का बादशाह,यारो का यार,कुदरती चमत्कार  मायनस १०१ आत्ता नेमका आहे तरी कुठे? ढ्याण टे ढ्याण!!!!)

(आकाशात कुठे तरी)

उत्तम प्रदेशीक चित्रपट सुचवा..!!

Submitted by morpankhis on 29 December, 2016 - 14:09

काहि दिवसांपुर्वी कन्नड चित्रपट "Thithi" पाहीला, खुप छान सिनेमा आहे..
त्या अगोदर "Ulidavaru Kandanthe" हा काहिसा Neo-noir प्रकारचा सिनेमा पाहिलेला.. तो पण खुपच आवडला..त्यातील "Gatiya Ilidu" गाण तर अप्रतीम ( सुरवातीला ५० वेळा तरी ऐकल / पाहिल ते गाण )...

Ozhivudivasathe Kali हा मल्याळम सिनेमा पण छान वाटला...

आपल्याकडे प्रदेशीक भाषेत उत्तम चित्रपट बनतात..पण माहिती नसल्यामुळे आपल्या पर्यंत पोहचत नाहीत.
तुम्हाला काही उत्तम प्रदेशीक चित्रपट माहीत असल्यास इथे सुचवावे..

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन