मनोरंजन

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ५

Submitted by Mayur Mahendra ... on 9 February, 2017 - 12:45

अचानक जँकची नजर तेथील एका मोठ्या झाडाकडे गेली.
त्याला आठवलं.
ते झाड त्याने याआधीही पाहीलं होतं.
" पण त्यात काय एवढं विशेष कधीकधी दोन झांड एकसारखी तर दिसू शकतातच ना. "
स्वतःशीच पूटपूटत तो पूढे निघाला.
अखेर कंटाळल्यामूळे त्या तिघांनीही पून्हा गप्पा मारण्यास सूरूवात केली.
" तूम्ही कूठे राहता "
ज्युलीने वेबला सहजच विचारलं.
" मी ईथेच......डोगंराच्या पायथ्याशी रोरीस्टर अपार्टमेटंमध्ये राहतो,
आणी तूम्ही "
" आम्ही, आम्ही एरीझोना सोसायटीत "
" तिघंही "
" हो तिघंही " ज्युली

शब्दखुणा: 

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ४

Submitted by Mayur Mahendra ... on 8 February, 2017 - 09:24

लवकर झोपल्यामूळे रॉनला दूपारी कधी जाग आली कळलंच नाही.
मग थोड्या वेळाने भानावर येत त्याने चहा ठेवला.
हॉलमधील मोठ्या स्लाईड विडोंपाशी बसून ते दोघंही त्या तजेलदार चहाचा आस्वाद घेत सर्वाच्यांच नजरेत भरणाऱ्या हिरव्यागार डोगरांला न्याहाळत बसले होते. दाट झाडीने व्यापलेलं ते विशाल डोंगर पाहून नेहमीच त्याचं कैतूक करावसं वाटत असे. खंरच खूप सूदंर होतं ते.
ईतकं की पाहताक्षणी कोणालाही त्या डोगंरावर जाण्याचा मोह आवरता आला नसता. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जँकने कधीही कोणालाच त्या डोगंरावर गेल्याचं पाहीलं नव्हतं.

शब्दखुणा: 

तो आणि ती

Submitted by अक्षय. on 8 February, 2017 - 07:14

तो आणि ती
( आज ते दोघे भेटणार होते. तसे ते प्रत्येक विकेंडला भेटतात पण आज थोडं विशेष होतं. त्याला player of the tournament भेटलेलं.दोघेही excited होते. तो तिला काय भेटलं ते दाखवायला आणि ती Congrts करायला. रोजच्या कामा मधून वेळात वेळ काढून विकेंडला भेटणा-या प्रत्येकासाठी तो आणि ती )

शब्दखुणा: 

तो आणि ती

Submitted by अक्षय. on 8 February, 2017 - 07:14

एक्साईटमेंट मुळे जास्त वेळा पोस्ट झालीय अॕडमिन ना रिक्व,ंंट आहे त्यांनी जास्ती झालेले धागे डिलीट करावे.

शब्दखुणा: 

शेअरिंग: एक आवडता उद्योग

Submitted by विद्या भुतकर on 7 February, 2017 - 22:41

आपल्याला आयुष्यात नसते उद्योग करायला लै जोर असतो. शेअरिंग म्हणजे तर आवडता उद्योग. Happy अगदी पोराच्या 'डायपर रॅश' क्रीमबद्दलचं आपलं मतही एकदम उत्साहाने देणार. आधी कधी इतकं लक्षात आलं नव्हतं, पण एकूणच मी मला एखादी गोष्ट आवडली असेल किंवा नसेल तर त्याबददलचं मत लगेच मित्र-मैत्रिणींना वगैरे सांगून टाकते. म्हणजे मला आवडलंय तर बाकीच्यांना ते समजलं पाहिजे ना? आणि नसेल तर त्यांचा तरी त्यांचाही त्रास वाचेल असं माझं स्पष्ट मत असतं. तर अशीच 'स्पष्टं' मी ऊठसूट देत असते.

विषय: 

सूपरबोल - रामायण आणी महाभारत

Submitted by फेरफटका on 6 February, 2017 - 12:27

काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अ‍ॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला.

अंजलीची गोष्ट - उत्तर

Submitted by आनन्दिनी on 6 February, 2017 - 05:59

आता निघालं पाहिजे म्हणजे थोडा वेळ फ्रेश होऊन नाईटसाठी येता येईल" मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून तिच्या मनात विचार आला. नेहेमीप्रमाणे वॉर्डमधल्या नर्सला सगळ्या सूचना देऊन ती निघाली. गाडी तिने ए ऐवजी बी विंगकडे वळवली. आशिषचं असं झाल्यानंतर अंजलीचे आईवडील तिच्याच सोसायटीमध्ये राहायला आले होते. अंजलीच्या मुलीची, रियाची सगळी काळजी ते घेत होते. रियालाही आजी आजोबांबरोबर राहायला आवडत होतं. सगळं सोयीचं असलं तरीही मुलीकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही आहोत या विचाराने अंजलीला फार अपराधी वाटत असे. आशिषचं दुःख विसरण्यासाठी तिने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. आणि तिचा पेशाही तसाच होता.

शब्दखुणा: 

सो...... सी यू.....अगेन?

Submitted by विद्या भुतकर on 6 February, 2017 - 00:08

ती मैत्रिणीसोबत आली. छातीत अजूनही धडधड होतंच होतं. आपण योग्य करतोय का? उगाच नसत्या उत्सुकतेपोटी चुकीच्या ठिकाणी तर जात नाहीये ना? बरं नुसती उत्सुकता नव्हती आज तर मैत्रिणीने, मिहिकाने जबरदस्तीच केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून मिहिका तिची जवळची मैत्रीण झाली होती. खरंतर मिहिकाचे वागणे, दिसणे, बोलणे पाहून 'आपण अशा मुलींशी मैत्री करतंच नाही' असं पक्कं मत तिने बनवलं होतं. पण हॉस्टेल वरच्या त्यांच्या सहा महिन्याच्या सहवासात मैत्री कधी झाली तिलाही कळले नव्हते.

"हे बघ तू उगाच सॅटरडे नाईटला अशी आंटी सारखी रूमवर बसू नकोस हा.", मिहिकाने तिला डिवचले.

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन