मनोरंजन

आयुष्यावर बोलू काही....

Submitted by पोलेकर प्रसन्न on 4 March, 2017 - 05:04

आयुष्यावर बोलू काही....
प्रश्न क्र....१) आयुष्यात काय व्हायला आवडलं असत..?झालो तर ?
उत्तर --साधारण १०वीत असताना पहिलं प्रेम झालेलं ..आणि तिने होकार हि दिला.जेमतेम दीड वर्षाचं relation मग घरच्यांचं विरोधामुळे break-up.नंतर खूप प्रयत्न केला तरी जुळवता नाही आलं...

मला आवडलेले मराठी नाटक - सही रे सही

Submitted by अक्षय. on 3 March, 2017 - 15:06

मला आवडलेले मराठी नाटक - सही रे सही

मराठीलं रंगमंचावर सादर झालेलं पहिल नाटक म्हणजे 'सीता स्वयंवर' विष्णूदास भावे दिग्दर्शित हे नाटक म्हणजे रामायणातला एक भाग. यानंतर मराठी रंगमंचाने कधी मागे वळून पाहिलेच नाही. विजय तेंडूलकर, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे या लेखकांनी, त्यावेळेसच्या कलाकारांनी मराठी नाट्यभूमी गाजवली. हीच परंपरा पुढे टिकवण्याचे आव्हान हे आजच्या पिढीपुढे होती आणि ती उत्तम रित्या पार पाडली ती केदार शिंदे आणि भरत जाधव ह्या जोडगोळीने. केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित ''सही रे सही" हे विनोदी आणि कौटुंबिक नाटक आहे.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १०

Submitted by Mayur Mahendra ... on 1 March, 2017 - 11:28

जँकला आता चांगलीच झोप येत होती. नकळत त्याच्या डोक्यात एक तीव्र सनक येऊन गेली. तरीही डोळे न ऊघडताच त्याने झोपण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला. परंतू त्याला पून्हा शांतपणे झोपताच आलं नाही. कारण अचानकच
सूss सूss सूsss सारखा कसलातरी मोठा आवाज झाला होता. आणी त्या आवाजाने जँकचं लक्ष वेधून घेतलं होतं. मग तो आवाज क्षणाक्षणाला खूपच वाढू लागला. ईतका की त्याचे डोळे आपसूकच आकस्मीतरीत्या ऊघडले गेले. मग हळूहळू पापणीची ऊघडझाप करून तो एकाएकी स्वतःशीच पूटपूटू लागला.
" ही काय कीरकीर आहे रे, आणी हा न थांबणारा एवढा मोठा आवाज तरी कसला ?
मी नक्की आहे तरी कूठे ? "

शब्दखुणा: 

फुले फुलतात देठावर!

Submitted by सत्यजित... on 28 February, 2017 - 14:53

कुठे असतात भानावर...
फुले फुलतात देठावर!

मनाची काहिली होते...
तुझा शिमगा जरा आवर!

जरासा तोल जाऊ दे...
भले नंतर मला सावर!

तुझे येणे कुठे लपवू?
जसा गजरा..तुझा वावर!

जळाले आजही काजळ...
तुझ्या लालीच ओठावर!

—सत्यजित

अंजलीची गोष्ट - रिप्लाय

Submitted by आनन्दिनी on 28 February, 2017 - 02:18

"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं.
"हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली
"हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती.
"ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली.
"हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं.

शब्दखुणा: 

प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....

Submitted by विद्या भुतकर on 27 February, 2017 - 23:40

डिस्क्लेमर: खालील प्रसंगातील पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा माझ्याशी कणभरही संबंध नाहीये. तसे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि असलाच कुणाशी संबंध तर तो तुमच्याशी असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे पोस्ट वाचून झाल्यावर एकदा स्वतःला आरशात जरूर पाहून घ्या.

वेळ: अमेरिकेतील रविवार सकाळ , भारतातील रविवार संध्याकाळ

कल्पनाने कॉन्फरन्स कॉल सुरु केला. कॉल सुरू होतानाच पुन्हा एकदा तिने ऐकले, 'प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....'

सगळं जग त्या म्यूटवरच चालू होतं....

कल्पना: 'हाय, धिस इज कल्पना. एनिवन देअर?'

स्वप्नाळू : भाग ४ (अंतिम )

Submitted by विद्या भुतकर on 24 February, 2017 - 10:22

पुढचे अनेक दिवस असेच सरले. कुणीच कुणाचा रुसवा काढायला आलं नाही की गेलं नाही. मुक्ताने एक दोनदा मेसेज केले होते केदार आणि नितिनलाही पण त्याच्यावर कुणाचंच उत्तर आलं नव्हतं. ज्याला त्याला विचार करायला वेळ दिला पाहिजे आणि आपणही घेतला पाहिजे हे मुक्ताला कळत होतंच. ऑफिस तर चालूच होतं.

असेच एक दिवस जेवताना पूनमने तिला विचारलं,"काय गं किती दिवस अशी गप्प राहणार आहेस? काही सांगत पण नाहीस. "

ती बोलत असतानाच मुक्ताने आपल्या डब्यातली भाजी पूनमला वाढली. ते पाहून पूनम पुढे म्हणाली,"हे बघ मला नुसतं असं खायला घालून मी शांत होणार नाहीये. तुझं काय चाललंय ते सांगशील का?"

स्वप्नाळू : भाग ३

Submitted by विद्या भुतकर on 23 February, 2017 - 22:05

ती रात्र वगळता मुक्ता पुन्हा तिच्या विश्वात रमली होती. एके दिवशी सकाळ सकाळी फोन चेक करताना मुक्ताला एक मेसेज दिसला, नितीनचा. तिने उघडून पहिले तर त्यात फोटो होता वालाच्या शेंगाचा त्याच्या रोपट्यासहित. धुक्यातल्या त्या सकाळच्या फोटोमध्ये शेंगांवरचं दव खुलून दिसत होतं. त्या वाफ्यात भरभरून आलेल्या शेंगा पाहून तिला आनंद झाला. तिने हसून त्याच्या मेसेजला 'गुड मॉर्निंग' असं उत्तर पाठवलं. दिवस सरताना तिने अजून एक मेसेज त्याला केला, एक फोटो. ती आठवणीने वालाच्या शेंगा बाजारातून घेऊन आली होती. तिने त्याची वाफवून भाजी केली, कारळ्याची चटणी, बाजरीची तीळ पेरून भाकरी केली.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ९

Submitted by Mayur Mahendra ... on 23 February, 2017 - 02:34

" म्हणजे जँक तो बाईकवाला ईसमही तूला पकडण्यासाठीच तूझ्यावर नजर ठेऊन होता तर " रॉन
" कदाचीत "
जाऊदे या विषयावर आपण नंतरच निवांत चर्चा केलेली बरी. ईथे आपल्याला आता जास्त वेळ थांबायला नको. अगदी कोणत्याही क्षणी ती माणसं आपला माग काढत ईथेही पोहोचतील. " रॉनच्या बोलण्याने ते तीघंही पून्हा सावध झाले.
" चल रॉकी आपल्याला आत्ताच या गूहेतून बाहेर पडायला हवं " ज्युलीची जीवघेणी घाई पाहून तो ताबडतोब रॉनचा आधार घेत ऊभा राहीला.
" तूला आठवतयं रॉकी ती माणसं तूला या गूहेत कूठून घेऊन आली होती ते.
म्हणजे आपल्याला ईथून बाहेर पडायला बंर झालं असतं ना ?" जँक

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन