धर्म

कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील स्थान, भूमिका

Submitted by सामो on 8 November, 2019 - 14:18

हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल , शंकर, ब्रह्मदेव अशा कालापरत्वे आता मुख्य असलेल्या देवता आहेतच पण पूर्वेची देवता इंद्र, पश्चिमेची वरुण, दक्षिण - यम, उत्तर - कुबेर, वगैरे दिकपालही आहेत. अनेक देवी आहेत, काही देवींचे पुत्र जसे पार्वतीचा स्कंद व गजानन वगैरे वगैरे. कुलदेवता तर निराळ्याच - एकविरा, शांतादुर्गा, जोतिबा वगैरे.
नक्की कोणाची उपासना करायची व का? त्याचेही ढोबळ नियम आहेत.
उदाहरणार्थ - लक्ष्मीची समृद्धीसाठी, नरसिंहाची ऋणमुक्तीकरता (ऋणमोचन स्तोत्र घ्या ना), गणपतीची बुद्धीसाठी वगैरे.
.

विषय: 

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

Submitted by पाषाणभेद on 17 October, 2019 - 01:14

मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं
सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

हाती धरली कावड
गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१||

गड झाला हिरवा
साथ दिली पावसानं ||२||

घर माझं भरलं
धन धान्याच्या राशीनं ||३||

जगण्याची रीत दावली
देवी सप्तशॄंगीनं ||४||

नवसाला पावली आई
आशीर्वाद दिला तिनं ||५||

पुजा करून ओटी भरीन
कुंकू लावीन हातानं ||६||

सगे सोयरे झाले सोबती
पायी चालती आनंदानं ||७||

दर्शनाची आस लागली
घाईनं उचलते पाऊलं ||८||

कृपा असू द्यावी भक्तांवरी
विनवणी करी पाषाण ||९||

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४३

Submitted by मी मधुरा on 12 October, 2019 - 05:25

फुलांच्या, सोन्याच्या माळांनी भरलेल्या चहूबाजू आणि मखमली गालिचे टाकलेले भव्य सभागृह! अत्यंत सुंदर कलाकुसरीचे सुशोभीकरण त्याला शोभून दिसत होते. मध्यभागी एक सुंदर गोलाकार पात्र होते.... नितळ पाण्याचे! कडेच्या तबकात विशाल आणि सुबक धनुष्य काही बाणांसोबत विराजमान होतं.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४२

Submitted by मी मधुरा on 10 October, 2019 - 02:13

"भीम, तुझ्या बंधुंना सांग की बाहेरून लाकडे आणू नका सध्यातरी. तू काल आणलेली चार झाडे अजून पडली आहेत पडवीत. ती पुरतील अनेक दिवस."

भीम ओसरीवर बसला होता. त्याच्या हातातल्या तृणपात्याकडे नजर लावून एकाग्रपणे बघत होता. बहुदा कुंतीचे शब्दही त्याच्या कानापर्यंत पोचले नसावेत. त्याची तंद्री भंग करायला हे पुरेसे नसावे.

कुंती मात्र दुपारच्या भोजनाची तयारी करण्यात व्यस्त होती. पुत्रांनी धान्य आणले की ते शिजवण्याकरता आणि अन्न स्वादिष्ट बनवण्याकरता बाकीची तयारी असायला हवी, म्हणून तिची लगबग सुरु होती आणि शक्तीचे काम म्हणल्यावर भीम शिवाय पान हलत नसे. तिने पुन्हा भीमला हाक मारली.

देव्युपासना-बंगाली कविता-ओळख

Submitted by सामो on 6 October, 2019 - 13:28

चित्रे जालावरुन साभार. जरी माझ्याकडे पुस्तक असले तरी, कविता गूगल करुन शोधुन टाकलेल्या आहेत.
.

ग्रंथ साहीब - ३ लेख

Submitted by सामो on 1 October, 2019 - 07:38

नोकरीनिमित्ताने, टेक्सासच्या सॅन अँटॉनिओ या शहरात माझे जवळ्जवळ ३-३.५ वर्षे वास्तव्य होते. वाणी व दिपीका या माझ्या दक्षिण भारतिय रुममेटस होत्या. आम्ही एकत्र प्रचंड मजा करायचो ज्याची रेंज - रिव्हरवॉकवर भटकणे ते आर्ट्फुल वस्तू एकत्र बनविणे, स्वयंपाक करणे इतकी होती. तीळगुळाच्या वड्या मी त्यांना बनवायला शिकविल्या (स्माईल). त्यांच्याकडून बिर्याणी बनवायला शिकले. शॉपिंग व भटकणे हे मजा तर आम्ही सर्रास करत असू. एक मात्र होतं, तीघींना देवळात जाण्याची इच्छा होइ अन जाता येत नसे कारण ३५/४५ मैलांवर हिंदू टेंपल होते.

विषय: 

नवरात्र : जागर स्त्रीशक्तीचा की दैवी शक्तीचा ¿

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 30 September, 2019 - 02:41

नमस्कार मंडळी। स्त्री शक्तीचा जागर अशा आशयाच्या काही मंडळींच्या फेसबुकवर पोस्ट्स आणि कॉमेंट्स पाहिल्या। आणि वर्तमानपत्रात सुद्धा आता अशाच आशयाचे लेख येणं सुरू होईल। आदिम संस्कृती आणि तेव्हाच्या स्त्री पूजक संस्कृती, मग तेव्हाच्या स्त्रियांनी निसर्गाशी झगडत कसं साम्राज्य उभं केलं, मग ती कशी कशी आणि कुठे कुठे, कोणाकोणाशी लढली वगैरे लेख सुरू होतील। मग आत्ता घरात स्वयंपाक, नवरा, मुलं, संसार सांभाळत नोकरी करून स्वतःचे छंद जपणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल तथाकथित बुद्धिमान लोक शाई संपेपर्यंत ( त्यांच्या पेनातली सॉरी प्रिंटर मधली आणि वर्तमानपत्रातल्या छापखान्यातली सुद्धा ) अशाच "भूमिकेतून" ( काही विशि

विषय: 

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४०

Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 03:10

गुरु द्रोणांनी केलेला अपमान आणि अर्जुनाचे बाण द्रुपद राजाचे मन घायाळ करून गेले होते. जखम काही केल्या भरत नव्हती. अर्ध राज्य गेल्याचे जितके दु:ख त्याला नव्हते तितके दु:ख अपमानाचे वाटत होते. त्याने यज्ञकुंडातील लाकडांच्या काटक्यांवर आग पेटवली..... त्याच्या हृदयात आधीपासून लागलेली! आणि अखंड यज्ञ सुरू केला. अग्निच्या ज्वाळा त्याच्या अपमानाइतक्या तिव्र झाल्या.
'याच! अश्याच धगधगत्या ज्वाळांमध्ये द्रोणाला जळताना पाहायचे आहे मला.....'

एका फूलवेलीचे मनोगत

Submitted by सामो on 19 September, 2019 - 12:58


............................................................................................................................
निबिड या व‌नी तुवा, कृपेची आस‌ म‌न्म‌ना,तुझ्या च‌र‌णी वाह‌ते हृद‌य‌सुम‌न‌ ही उमा
उघ‌डी न‌य‌न‌ श‌ंक‌रा, प्र‌स‌न्न‌ व्हावे ईश्व‌रा
च‌राच‌रात फुल‌त‌से व‌स‌ंत‌ आज‌ साजिरा.
.
त‌पोनिधी नि:स‌ंग‌ तू ज‌री असे मी जाण‌ते, त‌व‌ च‌र‌णी ईश्व‌रा धुळीचे स्थान माग‌ते
क‌ळे ज‌री म‌ला तुझी अप्राप्य‌ताही मोह‌वे

Pages

Subscribe to RSS - धर्म