धर्म

तोच तो ब्राह्मण

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 March, 2020 - 13:49

तोच तो ब्राह्मण
************

ब्रह्म जाणतो जो
तोच तो ब्राह्मण
बाकी तुम्ही आम्ही
सारे ते समान ॥

आम्हाला बुद्ध ही
गमतो ब्राह्मण
आम्हाला तैसाची
महाविर जैन ॥

चोखा तुका नाम्या
अवघे ब्राह्मण
स्वरूपी राहिले
स्वरूप होऊन ॥

तयाच्या हातात
ब्रम्ह दीप्तीमान
तयाच्या प्रकाशी
चालतात जन ॥

पाप योनीची ती
जुनाट कल्पना
म्हणो कुणी किती
न पटते मना

जन्माने नसते
कुणीच महान
वैश्य कृषी क्षत्रि
पोटाची साधन

हिंदू धर्म संकटात आहे काय?

Submitted by आर्यन वाळुंज on 2 March, 2020 - 10:44

डोळे उघडून जगाच्या नकाशावर नजर टाकली तर कित्येक राष्ट्रं मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माची आहेत. कम्युनिस्ट देशांनी धर्म काही वर्षे बंदिवासात टाकला होता पण अलिकडे तिकडे धर्म परत जागा होत आहे.
जगात हिंदू राष्ट्र एकच शिल्लक आहे पण त्याला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही कारण का तर शेक्यूलिरीझम. भारतात ढळढळीत हिंदू धर्म बहुसंख्यांकांचा आहे तरी नीच लोकांनी निधर्मी राष्ट्र ठरवलं आहे. या हिंदू राष्ट्राचे फाळणीच्या रुपाने लचके तोडून समाधान झाले नाही तर जाणीव पुर्वक धर्मांतरं घडवून हिंदू धर्म संपवण्याचा घाट घातलेला दिसून येतो.

विषय: 

इंदोरीकर महाराज नवा वाद

Submitted by आर्यन वाळुंज on 16 February, 2020 - 10:14

इंदोरीकर देशमुख महाराज हे किर्तनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मला तरी हा माणूस किर्तनकार कधीच वाटला नाही. माझ्या बालपणापासून मी हरिनाम सप्ताहात किर्तन, प्रवचन ऐकत आलो आहे. मला घडवण्यात या किर्तनांचा मोठा वाटा आहे.
बाबामहाराज असोत किंवा खेड्यातील प्रसिध्दी न मिळालेले किर्तनकार असोत. या पंथाची एक डिग्निटी सांभाळली होती या लोकांनी.
हा इंदोरीकर महाराज सासू सून भांडण, बेवडे, पोरींची लफडी याच्याशिवाय काही बोलतच नाही. किर्तनकारानं आपल्या प्रगल्भ आणि अहंकार रहित आचरणातून समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.

विषय: 

नवीन गुरुजी कोण आहेत?

Submitted by राजदीप on 14 January, 2020 - 10:38

https://www.facebook.com/100020146696320/posts/473592983322254/
या ठिकाणी एक नवीन ( माझ्यासाठी) गुरुजी दिसत आहेत. एक्केचाळीश्शे रुपये भरून यांच्या लोणावळा येथील शिबिरात सहभागी होण्याची बातमी फेबूवर पाहिली होती.
मला पडलेले प्रश्न
यांची ओळख काय?
माबोवरील कोणी यांना ओळखते काय?
मला फोटो टाकता येत नाही म्हणून लिंक जोडली आहे.

विषय: 

एकटीच @ North-East India दिवस - ९

Submitted by सुप्रिया राज जोशी on 12 January, 2020 - 23:50

14th फेब्रुवारी 2019

माझी मनीमाऊ,

Wish you a very happy birthday dagadi

साऱ्यांसाठी आज Valentine's day असेल. आमच्यासाठी तुझ्या वाढदिवसाहून मोठे काहीच नाही.

मी आज सिक्कीम हून आसामला आले. आजच्या दिवशी दुसऱ्या कोणाला पत्र लिहावंसं वाटत नाही. आणि दगडी तू मोठं पत्र वाचणार पण नाहीस म्हणून तुझ्यासाठी goodbye Sikkim असा व्हिडीओच तयार केला.

इथे गोहाटी स्टेशन वर बसून तुझ्यासाठी हा व्हिडीओ बनवायचे उपद्व्याप चालू आहेत. इथे पुढची तारीख उजाडली तरी तिथे कालची तारीख संपायच्या आधी पत्र तुला मिळेलच.

नीट रहा. गुणी आहेसच. तशीच रहा. Love you
मम्मा

रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

आंतरजातीय विवाह... लोक काय म्हणतील!!!

Submitted by आरुश्री on 17 December, 2019 - 12:49

"जब लडका लडकी राजी तो क्या करेगा काजी"
हे वाक्य तर तुम्ही ऐकलं असेलच, पण जेव्हा ही गोष्ट "आंतरजातीय विवाह" यावर येते तेव्हा मध्ये येतो तो सर्वात मोठा शत्रू म्हणजे "समाज".

शब्दखुणा: 

हिंदू धर्म आणि विश्वाची कालगणना

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 December, 2019 - 22:24

आपल्या पुरातन कालगणनेचे गणित, विश्वाच्या आधुनिक कालमापनाशी किती जुळते ? सर्वसाधारणत: पंचागात या कालमापनेचे गणित दिलेले असते. अनेकांना हे गणित माहीत आहे, पण या लेखात आवश्यक वाटले म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती करत आहे.
(इथे एकम, दशम, शत, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, मध्य, अंत्य, जलधि, परार्ध ही अंकगणना विचारात घेतली आहे.)

Pages

Subscribe to RSS - धर्म