प्रवास

कूर्ग - १/२

Submitted by विशाखा-वावे on 30 October, 2023 - 10:56

बंगळूरला रहायला येऊन इतकी वर्षं झाली पण अजून कूर्गला गेलो नव्हतो. यावेळी नवरात्रीच्या सुट्टीत जायचं ठरवलं. कूर्गबद्दल खूप ऐकून होतो, इतक्या वर्षांमध्ये अनेक कूर्गी लोक ओळखीचे झाले आहेत. ही माणसं कणखर, लढवय्यी असतात, अशी त्यांची ख्याती आहे. सैन्यात भरती होण्याचं प्रमाणही इथे खूप आहे. हा प्रदेशही तसाच रांगडा आहे, कोकणासारखा. ’सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी’ Happy कूर्गमध्ये फिरताना कावेरी नदीचं प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अस्तित्वही सतत जाणवत राहतं.

विषय: 
शब्दखुणा: 

बाली पास - पुढचे दिवस

Submitted by धनश्री. on 26 October, 2023 - 04:40

ट्रेकचा दुसरा दिवस - मुक्काम देवसु बुग्याल.

७००० वरुन १०,२०० फूट. अंतर साधारण ८/९ किमी. वेळ ५/६ तास.

आज आम्हाला हॉट लंच होतं. एव्हाना हॉट लंच म्हणजे जास्त चालायचं नाहीये हे लक्षात आलेलं होतं. बरोबर ८ वाजता निघालो.

निघाल्या निघाल्या आमच्या रस्त्यावरचं शेवटचं दुकान लागलं. आणि पाऊसही सुरु झाला म्हणून आम्हाला थोडा वेळ आडोश्याला ऊभं रहायला सांगीतलं आजचाही रस्ता कालसारखाच. फक्त जरा जास्त दाट झाडी लागत होती. बाजूला कालचेच लाल तुरे होतेच. बरोबर खळाळत वाहणारी नदी होतीच. ती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.

कंकणाकृती सूर्यग्रहण २०२३

Submitted by manya on 23 October, 2023 - 02:44
solar eclipse 2023

लहानपणी रात्री टेरेस वर झोपून तारे बघताना त्या अनंत अवकाशाची आवड निर्माण झाली. जयंत नारळीकरांची पुस्तक,लेख वाचायला अवडायचे.
चंद्राच्या कला, मंगळ, गुरू, शुक्र, शनी, सप्तर्षि, मृग नक्षत्र अगदी शहरातील झगमगाटातही उठून दिसतात. ही रोजची मंडळी बघायला कधीही बर वाटत. पण ग्रहण हा काही औरच नजारा असतो.
ही कधीतरी घडणारी किमया नेहमीच मला भुरळ घालते. खग्रास चंद्रग्रहणात दिसणारा तो लालसर नारंगी रंगाचा Blood Moon किती मोहक वाटतो. आजपर्यंत दोनदा ते मोहक दृश्य बघण्याचा योग आला, रात्र जगवली त्यासाठी पण सार्थक झालं.
प्रचि०१-अ - चंद्र -शुक्र-मंगळ

देखणं चेन्नई सेंट्रल

Submitted by पराग१२२६३ on 13 October, 2023 - 05:07

पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते. अशातीलच एक, वसाहतकाळात चेन्नईमध्ये उभारण्यात आलेली अतिशय देखणी वास्तू म्हणजे चेन्नईतील मुख्य रेल्वेस्थानकाची म्हणजे चेन्नई सेंट्रलची इमारत. आज या स्थानकाचं अधिकृत नाव पुरट्चि तलैवर डॉ. एम. जी. रामचंद्रन चेन्नई सेंट्रल असं आहे. आज हे स्थानक चेन्नई शहराला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडते.

प्रवासगाणी

Submitted by धाग्या on 2 October, 2023 - 21:52

कोणत्याही प्रकारच्या प्रवासाशी संबंधित गाणी इथे लिहा.

उदा.
(जीप) मेरे सपनोंकी रानी

(ट्रेन) हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट

(मोटरसायकल) रोते हुए आते हैं सब

(सायकल) डाकिया डाक लाया

(होडी) गोमू माहेराला जाते हो नाखवा

(विमान) ओ चांद जहाँ वो जाये

(जहाज) माय हार्ट विल गो ऑन

व्हा तर सुरू...

उपक्रम २ - दुर्लक्ष - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 19 September, 2023 - 22:56

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
तिचे निस्तेज डोळे अजूनही उघडेच होते. आजवर ज्यांच्यासाठी ती राबली, त्यांनी आज टिपं गाळण्यापलिकडे काहीही केलं नव्हतं. पण त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती. त्याला हे बघवेना. जाऊ दे, म्हणून त्याने पाठ फिरवली.

भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग १० : बस्तर आर्ट व रायपूर (अंतिम)

Submitted by मनिम्याऊ on 12 August, 2023 - 08:03

माझी अमेरिका डायरी - माऊन्ट रेनिअर!

Submitted by छन्दिफन्दि on 12 August, 2023 - 02:38

सिएटलच्या साधारण दक्षिणेला माऊंट रेनिअर ही साधारण १४,४७० फूट उंच पर्वत रांग आहे. ती माऊंट रेनिअर नॅशनल पार्क मध्ये आहे. आम्ही फक्त एकच दिवस हाताशी असल्याने पॅराडाईज पॉईंट जवळची काही स्थळे बघितली, जस Myrtle फॉल्स, Reflection लेक, आणि थोडंफार हायकिंग केलं.

शब्दखुणा: 

Tour du Mont Blanc भाग १० - सातवा दिवस आणि अखेर

Submitted by वाट्टेल ते on 10 August, 2023 - 09:46

आज finale त्यामुळे फ्रेडलाच प्रचंड घाई होती. रोज आम्हाला वारंवार ब्रेक देणाऱ्या त्याने आज जराही विश्रांती न देता घोड्यावर बसवले. ७:३० ७:४० ला वगैरेच निघालो. आधी बराचसा चढ आणि त्यात आम्ही निवडलेला रस्ता म्हणजे अक्षरश: गायींची सकाळची किंवा एकूणच दिवसभरात कधीही आन्हिके करण्याची जागा होती. कालच्या चीज फॅक्टरीला टेकाडावरून ज्या गायी उतरत होत्या, त्याच्या मागच्या बाजूला हा रस्ता असावा असे वाटते. दगड माती बर्फ पाणी गवत फुले सिमेंट डांबर लाकूड लोखंड एवढ्या सगळ्या गोष्टींवरून ७ दिवस चाललो होतो. आज शेणावरून चालणे झाले, काही राहिले म्हणून नाही.

शब्दखुणा: 

भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ९ : शुभ्र काही देखणे...

Submitted by मनिम्याऊ on 10 August, 2023 - 05:13

Pages

Subscribe to RSS - प्रवास