साहित्य

लिखाण असे घडले

Submitted by SharmilaR on 28 February, 2024 - 01:30

लिखाण असे घडले

खरंतर लेखन कसे घडले/घडते ह्या सांगण्याचा मला काहीच अधिकार नाहीय. कारण माझी ‘लेखनसंपदा’ ती कित्ती.. तर चार-सहा कथा अन् तितपतच कविता! पण कुणीसं काहीतरी म्हटलंय नं, ‘हंसाचे चालणे.. म्हणोनी कोणी..’

तर मला लहानपणापासून वाचनाची आत्यंतिक आवड. म्हणजे आठवतंय तेव्हापासून वाचतेच आहे. अक्षरओळख केव्हा झाली, ते सुद्धा आठवत नाही, पण अगदी लहान असल्यापासून, बाबांचं बोट धरून रस्त्याने चालतांना माझं लक्ष मात्र दुकानांवरच्या पाट्यांकडे असायचं.

विषय: 
शब्दखुणा: 

थरांवर थर

Submitted by SharmilaR on 20 February, 2024 - 01:57

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

थरांवर थर

सुमा रिक्षेतून उतरली, तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. कशी बशी रिक्षेतून तिने तिची अवजड लोखंडी ट्रंक एकटीनेच खाली काढली. थंडीचे दिवस होते, तरी एवढा वेळ सायकल रिक्शा चालवल्याने, घामाघूम झालेला रिक्षेवाला घाम पुसत होता. तिने दुसरी छोटी बॅग काढून ट्रंकेवर ठेवली. पर्स मधून पैसे काढून त्याला दिले, अन् त्याने रिक्शा वळवली, तशी ती कुंपणाचं लाकडी फाटक उघडायला वळली.

फाटक उघडतांना तिचं लक्ष आता घराकडे गेलं. सगळी कडे अंधार होता. रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात दिसलं, घराच्या दाराला कुलूप होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

उतरणीच्या भेटी

Submitted by anudon on 30 January, 2024 - 18:50

दुपारचं जेवण झालं. बाईंनी मागचं टेबल आवरलं, भांडी विसळून ती जागेवर लावून ठेवली. आणि त्या, “पुढचं दार लावून घ्या. मी येते संध्याकाळी येते” म्हणून गेल्या. रामरावांनी अंगणातली खुर्ची थोडसंच उन्ह अंगावर येईल अशा बेतानं ठेवली आणि सकाळच्या पेपरमधलं शब्दकोडं सोडवायला घेतलं. मन तसं निवांत होतं, कुठे जायचं नव्हतं आणि कुणी येणारही नव्हतं. मुलं परदेशात आपापल्या ठिकाणी, त्यांचे फोन आले तरी रात्री नाहीतर सकाळीच. त्यांची बायको निर्मलाला जाऊनही आता पाच वर्ष होत होती. ती गेल्यापासून त्यांचा दिनक्रम असाच असायचा. नशिबानं बाई चांगली मिळाली होती, म्हातारपणाच्या काळ्या छायेचं अस्तित्व त्यांना जाणवतं तर होतंच.

विषय: 
शब्दखुणा: 

कुलवधु

Submitted by nimita on 10 January, 2024 - 05:12

संध्यासमयीच्या विझत्या सोनेरी किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दिवसभर तळपणारे रविराजही आता श्रांत, क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेनी मार्गक्रमण करत होते. तसं पाहता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. या अहोरात्र चालणाऱ्या प्रवासाची त्यांना सवय होती. रोज संध्यासमयी या सृष्टीचा निरोप घेताना मनात एक ओढ असायची - दुसऱ्या दिवशी पुन्हा परतून येण्याची… आपल्या सहस्त्ररश्मी पुन्हा एकदा धरतीवर विखुरण्याची ! पण आज मात्र रविराजाचं मन जणू छिन्न-विच्छिन्न होत होतं ; आक्रंदून स्वतःलाच विचारत होतं…'आता उद्यापासून कोणासाठी परतून यायचं ? आपलं हे ओजस्वी अस्तित्व कोणाला दाखवायचं ?

कुलवधु

Submitted by nimita on 10 January, 2024 - 05:12

संध्यासमयीच्या विझत्या सोनेरी किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दिवसभर तळपणारे रविराजही आता श्रांत, क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेनी मार्गक्रमण करत होते. तसं पाहता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. या अहोरात्र चालणाऱ्या प्रवासाची त्यांना सवय होती. रोज संध्यासमयी या सृष्टीचा निरोप घेताना मनात एक ओढ असायची - दुसऱ्या दिवशी पुन्हा परतून येण्याची… आपल्या सहस्त्ररश्मी पुन्हा एकदा धरतीवर विखुरण्याची ! पण आज मात्र रविराजाचं मन जणू छिन्न-विच्छिन्न होत होतं ; आक्रंदून स्वतःलाच विचारत होतं…'आता उद्यापासून कोणासाठी परतून यायचं ? आपलं हे ओजस्वी अस्तित्व कोणाला दाखवायचं ?

आमचे धोत्रे गुरुजी (भाग ६)

Submitted by मिरिंडा on 8 January, 2024 - 02:58

      मी , आधीच चिठ्ठी सापडत नव्हती म्हणून अस्वस्थ होतोच त्यात, इन्स्पेक्टर म्हणाले होते, आरोपी सापडलाय. एवढ्या लवकर यांना आरोपी कसा सापडला ? माझ्या मनात असं आलं म्हणून गैरसमज करून घेऊ नका. एवढं सगळं तुम्हाला सांगितल्यावर ,माझा या घटनेशी काहीच संबंध नव्हता हे पटलं असेलच .निदान तुम्ही तरी नक्कीच विश्वास ठेवाल.......मग मला अचानक वाटलं, पोलिसांनी हा गुगली तर टाकला नव्हता. पण मी ती शक्यता झटकून टाकली ,कारण माझा अजून तरी पोलिसांवर थोडा विश्वास होता. बघता बघता,गाडी पो. स्टेशनच्या आवारात शिरली. मी घाईघाईने इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिनमधे शिरलो. ते वाट पाहातच होते. त्यांनी बसण्याची खूण केली.

लढाई

Submitted by पराग र. लोणकर on 5 January, 2024 - 09:59

*लढाई*

नेहमीप्रमाणे अपेक्षित टार्गेट पूर्ण न झाल्याने बॉसचे फायरिंग ऐकून जड पावलाने बँकेबाहेर पडलो. रोजचंच होतं हे.

शब्दखुणा: 

तथास्तू

Submitted by Saalam Akhtar Dalwai on 28 December, 2023 - 06:17

“अगं किती वेळ व्हरांड्यात होतीस? तुझ्यासाठी आलोय ना मी?” मी आई वर चिडलो.
“अरे नाही रे. ती खूप वर्षांनी आली म्हणून,” आईने चक्क स्पष्टीकरण कसे दिले हा प्रश्न पडला.
“काय गं एवढी खूश दिसतेस, कोण आलं होतं?”
“अरे ती भिकारीण.”
“काय? एवढा वेळ भिकारणीशी बोलत होतीस? असं कोणाबरोबर ही काय गप्पा मारतेस? थोडं ‘स्टॅंडर्ड’ वागत जा,”
मी तिच्यावर डाफरत असतानाच ती चिडली, “ए तुझे तोंड बंद कर आधी. तू मला शिकवायचे नाही. आवाज खाली!”
“अगं पण ही लोकं खोटं बोलतात. आपण कष्ट करून खातो मग ह्यांना कामं करायला काय होतं?”

विषय: 

एम टी आयवा मारू

Submitted by संप्रति१ on 24 December, 2023 - 00:51

'एम टी आयवा मारू' हे एका व्यापारी जहाजाचं नाव आहे. हे जहाज स्वतःचे कर्मचारी स्वतः निवडतं. जो एकदा आयवा मारू वर काम करतो, त्याला त्या जहाजाचं आकर्षण खेचून आणतं. असा साधारण प्लॉट.

कादंबरीच्या निवेदकाचं नावही अनंत सामंत असंच आहे. हे निवेदन वाचकांना समोर ठेवून केलेलं नाही. डायरी फॉर्मॅटमध्ये केलेलं हे लिखाण आहे.. 'चला, आता मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगतो', असलं काही नाही.
निवेदक जिथं कुठं असतो, तो भवताल, इमारती, रस्ते, थंडी, ऊन, आभाळ, मनस्थिती सगळं चित्रासारखं आपल्यापुढं उभं करतो. पार्श्वभूमी शब्दांतून उभी करतो. सामंतांना हे चांगलं जमतं, असं मला वाटतं.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य