मूळ पाककृति इथे आहे लालूच्या सूचनेप्रमाणे इथे आणतोय. आता फोटो द्यायची सोय आहे, म्हणून फोटोही देतोय.
१) अर्धा किलो राजमा, रात्रभर भिजवून पाणी फेकून धुवून घेणे.
२) तीन/चार मोठे कांदे, अगदी बारिक चिरून.
३) तीन/चार मोठे टोमॅटो, अगदी बारिक चिरून
४) एक मध्यम बटाटा
५) एक कप सायीसकट दूध
६) तीन ते चार टिस्पून लाल तिखट
७) एक टिस्पून गरम मसाला (त्यापेक्षा, शहाजिरे, मसाला वेलचीचे दाणे, एखादीच लवंग व दालचिनी यांची ताजी भरड पूड वापरली तर जास्त चांगले.)
८) दोन तीन हिरव्या वेलच्या, सात आठ मिरी दाणे
९) साजूक तूप वा लोणी
१०) मीठ
११) हवे असतील तर लसणाचे तूकडे आणि आल्याचे लांबट तूकडे
१) भिजवलेला राजमा पुरेसे पाणी घालून कूकरमधे शिजवून घ्यावा, त्यातच बटाटा पण शिजवून घ्यावा.
२) तूप वा लोणी तापवून अगदी मंद आचेवर कांदा परतून घ्यावा. जितक्या मंद आचेवर कांदा परताल तितकी छान चव येते.
३) कांदा परतून झाला की त्यात कापलेला टोमॅटो टाका. आता गॅस मोठा केला तरी चालेल पण सतत परतत रहा. त्यातच वेलचीचे दाणे व मिरिदाणे टाका. वापरत असाल तर आले लसणाचे तूकडे टाका.
४) टोमॅटो शिजून तूप सुटू लागले कि त्यात शिजलेला राजमा टाका.
५) थोडा राजमा व बटाटा कुस्करुन घ्या. व त्यात मिसळा, पुरेसे पाणी टाका
६) त्यात तिखट, मीठ व दूध घाला, व नीट ढवळून घ्या.
७) जरावेळ उकळू द्या पण खाली लागू देऊ नका.
८) थोडे तूप तापवून, त्यात गरम मसाल्याची पूड टाका आणि ते राजम्यात ओता.
९) जिरा राईस किंवा पराठ्याबरोबर खा.
यासाठी कांदा परतणे फार महत्वाचे आहे. ते जमवले तर मस्त चव येते. आपल्याकडे कधीकधी राजम्याला रंग लावलेला असतो, त्यामूळे राजमा भिजत घातलेले पाणी फेकणे चांगले. ते तसे एरवीही फेकावेच.
मी राजम्याच्या जागी ताजे कोको बीन्स वापरलेत. ते जास्त चवदार असतात, आमच्याकडे असे सोललेलेच मिळतात आणि पटकन शिजतात.
तयार पदार्थ असा. सोबतीला यीस्ट वापरून केलेला घरगुति नान, आणि लिंबाचे लोणचे..
एन्जॉय..



म्हणून मी घरी होता तोच किंचित पांढुरका राजमा वापरला. तुम्ही कोणी प्रयोग केला तर नेहमीचा टपोरा काळा राजमा (काला मोती? 