१ सिमला मिरची मोठे तुकडे चिरून
१ मोठा कांदा जाड चिरून
६ मोठे टोमॅटो चिरून / ३ कॅन diced टोमॅटोचे कॅन
३ वाट्या राजमा रात्रभर भिजवून वाफवून / २ कॅन Dark Red Beans
१ छोटा कॅन Bush चिली स्टार्टर बीन / १ पाकिट चिली McCormick मसाला
४ लवंगा
४ तमालपत्रे
२ पॅटी Boca burger / 2 slabs Tofu
दालचिनी तुकडा चवीपुरता
वरून घालायला
किसलेले चीज
सावर क्रीम/लोणी
कॅन राजमा वापरणार असल्यास चिली आयत्यावेळेसही करता येते. एका मोठ्या भांड्यात थोडे तेल घालून जरासे तापले की लवंगा, तमालपत्र आणि दालचिनी परतून घ्यावे. कांदा फोडी टाकून परतून मग सिमला मिरचीचे तुकडे टाकावे व २-३ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून वाफवावे.
चिरलेले टोमेटो घालून आच वाढवावी. जरा खदखदायला लागल्यावर बोका बर्गर वा टोफू घालावे व झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. चिली स्टार्टर व राजमाचे दाणे घालून आच कमी करून १०-१५ मिनिटे शिजवावे.
खायला घेताना किसलेले चीज व सावर क्रीम वरून आवडीप्रमाणे पेरावे. चिलीबरोबर टॉर्टिया चिप्स खातात, किंवा नुसते सूपसारखेही खायची पद्धत आहे.
चिली स्टार्टर मधे Mild/Medium/Hot मसाले मिळतात. आपापल्या कुवतीप्रमाणे तिखट वापरावे. माझी मुले बर्यापैकी तिखट खात असल्याने मी Medilum वापरते. मुले डब्यातही चिली न्यायला तयार असतात (थंड झाली तरी). मी नेहमीच वरील प्रमाणात बनवून उरलेली फ्रीज करते. त्याने ती जास्त मुरते. जितकी जास्त मुरते, तितकी अधिक चांगली लागते. Superbowl पार्टीच्या वेळेस ही हमखास लागतेच.
मांसाहारी करायची असल्यास बोका बर्गर वा टोफूच्या ऐवजी बीफ वा तत्सम काही घालतात.

