करिअर

शोध करिअरचा

Submitted by केअशु on 16 November, 2021 - 08:31

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या एका व्हिडिओचा हा सारांश आहे. सध्या १०/१२ वी ची मुले करिअरच्या दृष्टीने विविध कोर्सेसची माहिती घेत असतात. पण डॉ. बर्वे यांनी कोर्स शोधण्याआधी स्वत:ला शोधण्याच्या दिलेल्या या पायर्‍या

१) ज्ञान कसं साठवता ते शोधा.
Visual - पाहून लक्षात राहतं
Auditory - ऐकून लक्षात राहतं
Kinesthetic - कृतीतून लक्षात राहतं

२) काय चांगलं करता येतं ते शोधा
चांगलं गाता येणं, संगीत देता येणं,नृत्य करता येणं, सुसंवाद करता येणं असं जे उत्तम जमतं ते शोधून काढा.

आयुष्य आणि करिअर

Submitted by नानाकळा on 17 April, 2017 - 05:49

एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे.

दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात. जणू आयुष्यात पहिल्यांदाच कुठलाही अभ्यास न करता थेट दहावीचीच परिक्षा दिली असते. शाळेतल्या पूर्वपरिक्षेच्या निकालावरून साधारण अंदाज तर येतो ना? फारतर ५% अगदीच १०% फरक असू शकतो. पण 'शाळेत ९८-९५ मिळवत होता हो पण बोर्डात बघा फक्त ४५ मिळाले' असं तर नसतं ना?

शब्दखुणा: 

फिझिओथेरापिस्ट - भाग १

Submitted by आशयगुणे on 13 September, 2012 - 14:29

नवीन शहरात किंवा गावी गेलात तर तिथे जाऊन काय करायचे ह्याचे बरेच तोडगे आहेत. खादाडीचा शौक असलेल्यांना त्या शहराचे ( किंवा गावचे ) खाद्यपदार्थ अनुभवता येतात. काहींना ऐतिहासिक वास्तू पाहण्यात रस असतो तर काहींना फक्त खिडकी पलीकडील वस्तू न्याहाळण्यात! ( ह्या दुसऱ्या वर्गातील लोकांची मला भयंकर दया येते! अहो, दुकानात टांगलेला शर्ट घेण्यासाठी कुणी यात्रा करतं का? तसले शर्ट तर आपल्या गावी असतातच की! असो...) काही लोकांना तिथल्या मातीचा, दगडांचा संग्रह करायची हौस असते!

विषय: 
Subscribe to RSS - करिअर