मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

Submitted by amol_koli on 1 July, 2009 - 10:35

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं,
खेळायचयं हसायचयं आणि त्याना बीलगायचयं.
मनं कितीही उदास असले तरी मला हसयचयं,
जरी भरलं पोट तरीही पुन्हा ते भरायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

ऊन आले की वाटते बाबा मला सावली करतील,
ठेच लागली की वाटते बाबा माझा हात धरतील.
गर्दीमध्ये बाजारात पुन्हा फिरायचयं,
आज मात्र बाबाचा हात धरायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

मी वाट पाहतोय त्या दिवसाची,
मागणी घालतोय देवा मी नवसाची.
डोळे भरुन त्याना पुन्हा पहायचयं,
मांडीवर डोके ठेऊन मनं भरुन रडायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

तो एक दिवस देशील का देवा?
देईन तुला हवे ते मागशील तेव्हा,
त्याच्या तोंडून मला माझ नाव ऐकाचयं,
आणि त्या हाकेला मला एकदा हो म्हनायचयं,

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

या लेकराची हाक ऐक ना बाबा,
आई आणि बारकू साठी तरी ये ना बाबा.
मला पुन्हा एकदा अ ब क ड शिकायचयं,
तुम्ही रागवाल म्हणून मला पूर्ण आभ्यास करायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

मी आता तुम्हाला खाऊ नाही मागनार,
नाही रडनार आणि दुध सांडनार.
आई समोर एकदा मला तुम्हाला आणायचयं,
बारकु आणि मला तुमच्या समेत खेळायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

जाताना मला सांगुन का नाही गेलात?
वाट पाहिली किती मी तुम्ही परत नाही आलात.
आज तुम्हाला हे परत विचारयचयं,
आतुर आहे मी उत्तर तुम्ही द्यायचयं,

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

मला आहे विश्वास तुम्ही नाही येनार,
मग सांगा बाबा आम्हाकडे कोन बघनार?
ठरवले आहे तुम्ही आम्हाला फक्त वरुन बघायचयं,
कसे जगतो तुमच्या शिवाय हे देवाला सांगायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

निघतो आता मी आई वाट पाहत आहे,
तुमच्यासाठी आणलेला हार मी वाहत आहे.
पण मला पुन्हा एकदा विचारायचयं,
आपली भेट कधी होईल हे ठरवायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....!

गुलमोहर: 

छान. लहान मुलाच्या भावना छान मांडल्या आहेत.

अमोल,
उत्कट भाव खूप चांगले व्यक्त केले आहेत. शुद्धलेखनाकडे थोडे अधिक लक्ष द्या.

मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com

.

कवितेतील भावना जशी च्या तशी मनात उतरली .

सही. एकटे पालक बा. फ. साठी एकदम योग्य. तिथे पण पोस्ट करा ना. ह्या साइट्वर मनोरंजनाला प्राधान्य आहे हे मान्य पण त्यातूनच एक नेट्वर्क बनविता आले तर चांगले ना? तू सकाळी सकाळी रड्वलस पण.

भावना सच्ची आहे यार

सकाळी सकाळी रड्वलस >>>>>>>>>> खरचं

सकाळी सकाळी रड्वलस >>>>>>>>>> खरचं

सकाळी सकाळी रड्वलस >>>>>>>>>> खरचं

मला पण माझ्या बाबां ना भेटायचय........

रडवलस मित्रा....

बाबा॑ची आठवण आली रे..
खुपच छान...

काय लिहू? अगदीच सुन्न वाटले.
कविता छान चित्रिली आहे.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

मन खिन्न केले या कवितेने...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

डोळ्यात पाणी आणलेस....
----------------------------------------------------------------------
"जन्मभर सेवा, तुझ्या पावलांची"

Sad
***************
अबीर गुलाल उधळीत रंग | नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ||

Sad

तुमच्या मनाची अवस्था जाणली, भिडली. आज मला लिहितांना खुपच अस्पष्ट का दिसते आहे?

खूप छान, दुर्दैवाने माझे वडील कुठल्याच अंगानं चांगले वडील नाहीत, पण ह्या सर्व भावना मी माझ्या आईशी लावुन अनुभवल्या, अप्रतीम!

अमोल"truly यार 'ग्रेस' यांची त्यांच्या आई वर लिहलेली कविता "ती गेली तेव्हा रिमझीम पाउस निनादत होता मेघात अड्कली किरणे हा सुर्य सोडवीत होता" आठवली
खुपच true feeling ......................................................!

अतिशय सुन्दर कविता. भावना मनाला भिडली.

मनाला खा॓लवर भिडलेली एक कविता!
खरच, भूतकाळात गेल्यावरच कित्येक साध्या गा॓ष्टीच खर मा॓ल कळ्त!!!

अभिनन्दन!!!!!

अमोल, नको रे रडवुस! खरच कवितेतल्यासारखी अवस्था आहे आम्हां भावंडांची! माझ्या वडिलांना २ महिने झाले जाऊन! Sad

सर्वांचे अगदी मनापासुन धन्यवाद.......
तुमचा प्रतिसाद मिळाला आणि मला कळाले की मी एकटा नाही....

मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आभारी आहे

Pages