माझे प्रेमगीत

Submitted by लसावि on 1 July, 2009 - 02:20

पाडगावकरांनी तुमचं आमचं प्रेम सेमच असतं असा दावा केला असला तरी प्रत्येकाच्या प्रेमाची कथा कुठे ना कुठे वेगळी,युनिक असतेच.या प्रेमाची महती सांगणारी,त्याचा अनुभव जिवंत करणारी प्रत्येकाची आवडती,खास अशी रोमँटीक गाणी,चित्रपट अनेक असतात.वयानुसार,अनुभवानुसार(!) ही आवड बदलतही जाते.टीनएजमधे पोटात गडबड झाल्यासारखी वाटायला लावणारे मुशीमुशी सिनेमे,पुढे केवळ हास्यास्पद नव्हे तर वैतागवाणे वाटायला लागतात(मैने प्यार किया चे उदाहरण लगेच आठवते!). काही गाणी मात्र मनात कायमचे स्थान मिळवतात कारण आपल्या प्रेमाचे त्यात प्रतिबिंब पडलेले असते.आपण त्या गाण्याशी समरस होतो,त्यातली भावना,अनुभव अगदी वैयक्तिक वाटतो,आणि हेच गाणे आपले,स्वत:चे प्रेमगीत होते.
असा विचार केला असता,आरडी-गुलझार जोडीचे ’आपकी आंखों मे कुछ महके हुए से राज है’ हे मला ’माझे’ प्रेमगीत वाटते.
पहिलीच ओळ,नव्हे पहिल्या शब्दावरच मी फ़िदा! ’तुम्हारी’ पे़क्षा 'आपकी' मधे एक ग्रेस,एक आब आहे.समोरच्या व्यक्तीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व,अस्तित्व आहे आणि त्याचा मला आदर आहे अशी अर्थछ्टा मला या ’आप’ मधे जाणवते.तिच्या डोळ्यामध्ये अजूनही न गवसलेले काही अव्यक्त,गूढ असे आहे ज्याचे त्याला अत्यंत अप्रुप आहे,हे नातं अजूनही बनचूके झालेले नाही. पुढच्या ओळीतले ’आपसे भी खुबसूरत आपके अंदाज है’ तर एकदम खास.शारिर सौंदर्याच्या पलिकडे जाऊन,तुझा जो ’अंदाज’ आहे तो मला जास्त प्रिय आहे म्हणणारा ’तो’ मला कायम भावतो.
कडव्यात शिरताच टिपीकल गुलजारी शब्दकळा समोर येते-"लब हिले तो मोगरे के फ़ूल खिलते है कहीं,
आपकी आंखों में क्या साहिल भी मिलते है कभी?’- तुझ्या शब्दांनादेखील सुगंध आहे आणि तुझे डोळे अथांग,किनाराच नसलेला सागर आहे.पण सर्वात सुंदर आहे ती शेवटची ओळ, ’आपकी खामोषीयां भी आपकी आवाज है’-या दोघांचे नाते अशा पातळीला पोचले आहे की तिथे शब्दांची गरजच नाही,न बोलताच सर्व काही समजते आहे.हा अनुभव तर अगदी माझा स्वत:चा आहे!
त्याचे हे कौतुक संपतेय तोवरच तिचे उत्तर सुरु होते,जणू त्याचा शब्द खालीच पडू देत नाही आहे (पहिल्या कडव्यानंतर इंटरल्यूड आणी मग पुढचे कडवे हा नेहमीचा प्रघात आरडीने मोडीत काढला आहे). ती सावधपणे,संशयाने विचारते,’आपकी बातोंमें फ़िर कोई शरारत तो नही?’ तिला माहिती आहे की ’बेवजह तारीफ़ करना आपकी आदत तो नही!’ पण ती त्याला एकदम ओळखून आहे आणि या सगळ्या प्रेमळ बोलण्याचे ती एकच कारण सांगते-’आपकी बदमाषीयोंके ये नए अंदाज है!’
याक्षणी मला ही रचना पूर्णपणे माझ्या प्रेमाचे प्रतिबिंब वाटते,थोडासा इमोशनल तरी खोडसाळ तो,आणि संवेदनशील तरीही प्रॅक्टीकल अशी ती,व्वा!
तुमचेही असेच कुठले प्रेमगीत आहे का?
http://www.raaga.com/play/?id=3243

गुलमोहर: 

आवडत्या गीताचं आणि त्याचं आयुष्यात असणारं महत्व छान विश्लेषित केलं आहेस. Happy
मला खूप आवडलं Happy

मलाही खुप आवडल Happy

एम्पीके विषयी / तत्सम त्यावेळी आवडलेल्या (मी तर पारायण केलेल्या) पिक्चर्स विषयी पण एकदम सही लिहीलय.

व्वा सत्त्या , फेवरेट गाणं माझही . मस्त लिहिलं आहेस. Happy
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

ह्म्म !! छान लिहीलय, आणि घर मधली सगळीच गाणी मस्तं आहेत. मला किशोर कुमारचं "फिर वो ही रात है, फिर वो ही , रात है ख्वाब की !! " हे गाण खूप आवडतं. पण प्रेम गीत कोणत म्हणाल तर दाग मधलं " हम और तुम , तुम और हम खुष है यु आज मिलके....." . ह्या गाण्याबद्दल मला 'आगाउ '( आयडी Happy ) सारख नाही लिहिता येणार, पण हे गाण ऐकलं कि दाट धुक्यात मस्त फिरतोय असं वाटतं (अर्थात दोघंच.) Wink
धनु.

चांगल लिहीले आहे.. Happy माझं प्रेमगीत मी नै सांगणार.. Proud
अर्थात अस लिहीता पण येणार नाहीच.

हम्म्म्म... पुष्कळ आहेत ना अशी गाणी जी मला जान से प्यारी आहेत. त्रिशूल मधलं,' आपकी मदभरी आंखों को कंवल कहते हैं".. सदाबहार रफीची,' तुमने किसी की जान को' , और कुछ देर ठहर्,और कुछ देर ना जा' , दिल बेकरार सा है,हमको खुमार सा है' ,दूर रहकर ना करो बात्,करीब आ जाओ', 'ना झटको जुल्फ से पानी, ये मोती टूट जायेंगे" लता दीदीची ,' बैरन ,नींद न आये' ,सपनो मे अगर मेरे तुम आओ तो खो जाऊं", जरा सी आहट होती है तो दिल कहता है ,कहीं ये ,वो तो नही', 'तुम्हे देखती हूं,तो लगता है ऐसे' , आगाऊ..खूप खूप आहेत आवडती प्रेमभरी गाणी..
जस्ट आऊटऑफ क्युरियॉसिटी.. आणीक माझ्या आगाऊ पणाचा राग न मानता सांगाल का ही आय डी घ्यायच्या मागचे कारण??:)

छान लिहिलय.. ते गाणं खूपच सही आहे.. तिचं कडव्याच्या मधलं हसणं पण खूप मस्त वाटतं.. !!
अजून थोडं विस्तारात लिहायला हवं होतं असं वाटलं..

टीनएजमधे पोटात गडबड झाल्यासारखी वाटायला लावणारे मुशीमुशी सिनेमे,पुढे केवळ हास्यास्पद नव्हे तर वैतागवाणे वाटायला लागतात(मैने प्यार किया चे उदाहरण लगेच आठवते!). >>>> अगदी १०० मोदक.. !!!

पु.ले.शू. Happy

>>’आपकी आंखों मे कुछ महके हुए से ख्वाब है’
ते ख्वाब नाही, 'राज है' आहे ना?

हो.... ते 'राज है' आहे. 'अंदाज है' चं यमक आहे ते...
लग्न झाल्यावर प्रेमगीतांचे शब्द विसरायला होतात का? Proud Light 1

हायला,चुकेशच की!! लालूबाई चूक दुरुस्त केली आहे धन्यवाद,आता बाकी लेखाबद्द्लही प्रतिक्रिया द्या Proud
आणि सचीन, कदाचीत प्रेमविवाह झाल्यानेच शब्द विसरायला होत असतील!! Proud
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

लग्न झाल्यावर प्रेमगीतांचे शब्द विसरायला होतात का?>>आता वर म्हटलय ना की आधी पोटात काहिसे करणारे सिनेमे नंतर रटाळ वाटू लागतात, त्यातलाच हाहि एक प्रकार Lol

तिच्या उत्तराचे कडवे भन्नाट आहे ...

मस्त लिहीले आहे. गाण्याचे विश्लेषण छान आहे.

आगाउ, खरच खुप सुंदर विश्लेषण केलं आहे... खुप फेवरेट गाणि आहेत... "किसी नजर को तेरा, जब कोइ बात बिगड जाए, चंदन सा बदन, चेहरा है या चांद खिला है, अणि अशी असंख्य आवडती गाणि आहेत...
********************
येरे येरे पावसा...
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा..
पाउस आला मोठा.....

आगाऊ सहीच रे! मस्त उतरलय. माझ्याही आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे.
तुमचेही असेच कुठले प्रेमगीत आहे का?>>>>> असं विचारलस म्हणुन बाकीचं लिहितेय. झब्बु नाही. Happy
माझं प्रेमगीत असं नाही पण तसच काहीसं
एन एस एस चा कॅम्प संपल्यावर सामान घेउन सगळे एका हॉलमधे बसलो होतो. बस यायला उशीर असल्यानी टीप्पी चालु होता. "अहों"ना सगळ्यांनी गाणं म्हणायला सागितलं तर त्यानी "झुकी झुकीसी नजर" सुरु केलं. खरं तर तोपर्यंत खास स्पेशल असं काही वाटलं नव्हतं. नंतर मात्र..... जाऊ दे. पण अजुनही ते गाणं ऐकतांना मन धडधड ऐवजी धाडधाड चालतयसं वाटतं. (लाजुन पळालेला स्मायली)

_______________________________
"शापादपि शरादपि"

अरे व्वा, मस्त रे........ मला अशी माझी वाटणारी गाणी म्हणजे....... बरीच आहेत, पण आत्ता आठवतायत ती सांगते,
१) ये साजिश है बुंदोकी, कोइ ख्वाहीश है चुपचुपसी.... देखो ना...... देखो ना...
२) मैने तुम्हे मांगा तुम्हे पाया है..........
३) छुकर मेरे मनको किया तुने क्या इशारा? ..........
४) धीरे जलना, धीरे जलना.......
५) जिया धडक धडक जाए....
६) तुम आए तो आया मुझे याद, गलीमे आज चांद निकला...
७) रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन.....
८) फिर छिडी रात बात फुलोकी......
९) मोरा सैय्या मोसे बोलेना......
१०) अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही.......
अजुन य आहेत, पण... थांबते. तुमची दया आली Happy

ही माझी मायबोली वरील पहिली पोस्ट.
अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही....... हे माझही आवडते गीत आहे ,पण माझे असे वाटणारे प्रेमगीत म्हणजे "कीसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया"

शुभांगी
पल्लीला अनुमोदन. अगदी माझ्या मनातली गाणी आहेत.

मस्त विषय काढलास रे! आणि तुझ्या गाण्याबद्दल लिहिलंसही छान. Happy

अनेक गाणी त्या त्या प्रसंगापुरती मनात घर करून जातात. नंतर मग, 'अरेच्चा, एवढं कसं आवडलं बुवा हे गाणं तेव्हा?' असा प्रश्न पडतो. (डर मधलं 'जादू तेरी नजर..' आणि आशिकीतलं 'मै दुनिया भुला दुंगा..' ही अशा प्रासंगिक गाण्यांची उदाहरणे. आता ही गाणी आवडत नाहीत, पण ऐकताना मात्र ते प्रसंग ताजे करून जातात.)

पण काही गाणी मात्र कायमची घर करून जातात, असेच घर करून जाणार्‍या काही घटना-प्रसंगांप्रमाणे.

तसं हे गाणं (माझं प्रेमगीत Happy ) - रिमझिम गिरे सावन.
लताचं- http://www.youtube.com/watch?v=K6LVukvxZLU&feature=PlayList&p=73F1FB1F7C...
अन किशोरचंही- http://www.youtube.com/watch?v=5VzUxxa0c2I&NR=1

शिवाय हेही. किशोरचं 'छोटीसी ये दुनिया..'
http://www.youtube.com/watch?v=DWyMuXxmJUo

आता या गाण्यांबद्दल, त्यांच्याशी असलेल्या जवळिकीबद्दल लिहायचं म्हटलं, या आगाऊच्या बीबीवर झब्बू दिल्यासारखं होईल, नाही का? Happy
त्यापेक्षा बाकीच्यांनीही लिहा, त्यांच्या प्रेमगीताबद्दल. Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात.........मला आवड्तं मधुबाला च्या तोंडी आहे ते आणि भारत भूषण्च्या पण....! मधुबालाच्या बोलक्या मुग्ध मधुर अभिनयामुळे ते संस्मरणीय झाले आहे

साल्या होतास कुठे, किशोरदांवरच्या त्या लेखानंतर आताच हे वाचायला मिळातेय...
या विषयावर प्रत्यक्षच भेटु तेव्हा बोलु. Wink लवकरच !
’आपकी आंखों मे कुछ .... मलाही खुप आवडतं, ऐकायला तर आवडतंच पण बघतानाही तेवढीच मजा येते. रेखाच्या चेहर्‍यावरचे ते नितांतसुंदर भाव एका वेगळ्याच दुनीयेत घेवुन जातात.

***********************************

नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट !
जड शिळा त्या सागरी, आत्माराम नामें तारी !
पुत्रभाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले !
नाममहिमा जनी जाणें, ध्याता विठ्ठलाचे होणे !

फार आवडला हा लेख आणि कल्पना! कित्येक गाणी अशी आपलिशी वाटतात! त्यावर लिहायचे मनात नव्हते आले कधी..
माझा नवरा बरा गाऊ शकतो.. त्यामुळे त्याने लग्नाआधी गायलेली सगळी गाणी डोक्यात बसली आहेत अगदी! (नंतर नाही ना गायला तो! Sad ) रातकली , रिमझिम गिरे सावन, जानेजा ढुंढता फिर रहा, मुझे रात दिन, कैसी ये रूत, ओ साथी रे, नंथिंग्स गॉना चेंज माय लाईफ, प्रेमगीत नसले तरी रिचर्ड मार्क्सचे हॅझार्ड अशी बरीच गाणी! Happy

www.bhagyashree.co.cc/

सुन्दर.
एक सुन्दर मराठी गाणे .... जिथे सागरा धरणी मिळते...

मस्त लिहीलंय आगाऊ !

माझी ही दोन गाणी फार जवळची आहेत... Happy

होशवालोंको खबर क्या.... जगजीत सिंग (सरफरोश)
http://www.youtube.com/watch?v=JAh4bqBUGkY

कुछ तुम सोचो...कुछ हम सोचें....सोनू निगम (दिवाना)
http://www.youtube.com/watch?v=3YCRLjhAwD4

मी माझी इंग्लीश आवडणारी सांगु का? सांगतेच. एक आहे ब्रायन अ‍ॅडाम्स चं ' स्टील फील्स लाइक, बेस्ट टाइम टूगेदर....' आणि दुसरं 'आय एम अलाइव्ह...' आणि तिसरं 'हॅव आय टोल्ड यु लेटली दॅट आय लव्ह यु?....'

एकसो सोला चांद्की राते एक तुम्हारे कांधे का तील
गिली मेहंदी की खुश्बु झुठ्मुठ के शिकवे कुछ
..... गुलजार

आगाऊ साहेब फोटो अल पसिनोचा पण आवडीत मात्र उल्लेख नाही.

माझं प्रेमगीत म्हणाल तर रफीने गायलेलं "तेरे मेरे सपने" हे गीत माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचं आहे. या गीतातून व्यक्त होणारी प्रेमभावना, समर्पण मला खूप भावतं!

तेरे मेरे सपने अब एक रंग हैं
जहा भी ले जाये राहें हम संग हैं

(आता आपण प्रेमाच्या अशा अतूट बंधनात बांधले गेलो आहोत की इथून पुढे आपली दोघांची स्वप्नंसुद्धा एकच असतील. आयुष्यात कोणत्याही वाटेवर चालावं लागलं तरी आपण कायम सोबतच असू!)

मेरे तेरे दिलका ऐसा इक दिन मिलना
जैसे बहार आने पर तय हैं फूल का खिलना
ओ मेरे जीवन साथी...

(आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. ज्याप्रमाणे वसंत ऋतूमधे फुलं फुलतातच त्याप्रमाणे आपलं एकमेकांना भेटणं आणि प्रेमात पडणं सुद्धा ठरलेलंच होतं!)

तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे
तेरे ये दो नैना चांद और सूरज मेरे
ओ मेरे जीवन साथी...

(यापुढे तुझी सर्व दु:खं माझी असतील आणि माझ्या प्रत्येक सुखात तुझाच वाटा असेल. माझं उरलेलं आयुष्य फक्त तुझ्याचसाठी असेल.)

लाख मना ले दुनिया साथ ना ये छूटेगा
आके तेरे हाथोमें हाथ ना ये छूटेगा
ओ मेरे जीवन साथी...

(कुणी काहीही बोललं, किंवा मला तुझ्यापासून दूर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते आता शक्य नाही. मी तुझा हात हातात घेतलाय तो तुझी आयुष्यभर सोबत करण्यासाठीच!)

_________________________________________________

मंडळी, माझं आवडतं प्रेमगीत हे असलं तरी आयुष्य हे प्रेमगीताप्रमाणे साधंसोपं सरळ नसतं. आपण एखाद्यावर अगदी मनापासून, जीव तोडून प्रेम केलं तरी त्याची परतफेड तशाच उत्कट प्रेमाने होईलच असं नाही. दुर्दैवाने माझ्या आयुष्याचं गीत आता हे असं आहे---

मेरी किस्मत में तू नहीं शायद
मैं तेरा इंतजार करता हूं
मैं तुझे कल भी प्यार करता था
मैं तुझे अब भी प्यार करता हूं

य.

मस्त लिहिलय आगावा...... Happy

माझेही प्रचंड फेव्हरेट गाणं.

जुने दिवस आठवले. बायकोने प्रपोज केलं होतं आणि हे जेंव्हा ती, मी, माझा जिवलग मित्र आणि तिची खास मैत्रीण यांनाच माहित होतं. मी होकार द्यायचा बाकी होता... आणि नेमकं दुसर्‍याच दिवशी ऑफ पिरियडला कॉलेजमध्ये मला "दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके" म्हणायला लावलं होतं माझ्या फेव्हरेट प्रोफेसरने...... Happy

अतिशय जवळचं गाणं ... आणि गाणं म्हणताना आम्हाला चार जणांनाच फक्त काय ते कळत होतं.... एकमेकांकडे बघून हसणं चालू होतं...... त्यामुळे ते गाणं आणि तो प्रसंग कायमचा लक्षात राहिलाय.
मी सांगायच्या आधीच तिला माझा होकार पोचला होता..... Wink

दो दिल मिल रहे है मगर चूपके चूपके
सबको हो रही है खबर चूपके चूपके Happy

Pages