सदस्य प्रवेश |
Happy New Year :)काय लिहायचय ? काही खास नाही , उगाचच काहितरी. मागे वळून बघितलं तर , जाणा-या वर्षानि आपल्याला बरंच काहि दिलेलं असतं. आपण बरंच काहि हरवलेलं असतं, पण हे जे हरवलेलं आहे त्यालाच कुरवाळत बसलो तर आपल्या आयुष्यात येणारं अजुन एक वर्ष आपण वाया घालवणार आहोत हे लक्षात घेउन ते तिथेच सोडून त्यातुन काय बोध घ्यायचा तो घेउन नव्या वर्षाला नव्या उमेदिनी नव्या उत्साहानी आणि काय काय मिळालय आपल्याला ह्यावर नजर टाकून केली तर बरं नाहि का? तर बदलत काहीच नसतं पण अश्या क्षणांनी अश्या प्रसंगांनी आपण होऊन काहितरी बदल घडवून आणायचे असतात. म्हणून मग असली निमित्त शोधायची स्वतःमधे बदल घडवून आणायसाठी. संकल्प वगैरे भानगडी खरोखर न पाळण्यासाठिच असतात. पण अगदि संकल्प असं न म्हणता स्वतःला दिलेलं वचन, स्वतःशीच प्रामाणिक राहायचा प्रयत्न? असं काहिसं म्हणता येइल? सध्या तरी एवढच म्हणायचय जे रोजही म्हणू शकतो आपण नव्या सुर्याबरोबर रोज नवि सुरवात करावि , कालचं चांगल लक्षात ठेवावं वाईट विसरुन जावं. आता हे काय नविन हाय का राव? |
|
संकल्प चांगला आहे!
स्वतःला दिलेलं वचन, स्वतःशीच प्रामाणिक राहायचा प्रयत्न>>>.
स्वतच स्वतला दिलेली वचने मोडीत कढत असतो आपण , कारण की आपल्याला आपलीच किम्मत नसते.. आणि म्हणुन् हा संकल्प great आहे.
म्हणल तर अवघड म्हणल तर काहिच विशेष नाहि.
रोज जे करतो तेच की