सदस्य प्रवेश |
मायबोलीवर मराठीमला मान्य आहे की आजकाल कुठल्याहि भाषेत इतर भाषा मिसळलेल्या असतात. त्याला काही इलाज नाही, व्यवहार आहे तो. पण इथे काही व्यवहार नाही. केवळ मराठी भाषा विसरू नये, मराठीतली मजा घ्यावी, म्हणून ही जागा निर्माण केली! उदाहरण म्हणजे वंदना गुप्ते. मराठी विश्व मधे बोलायचे याचे भान ठेवून अस्खलित मराठी भाषेत बोलल्या. त्याहि चित्रपट या विषयावरच बोलत होत्या. पुनः काही लोक म्हणतील, तुम्हाला एव्हढा अभिमान आहे तर तुम्ही अमेरिकनांशी सुद्धा मराठी बोला! तुमच्या लिहिण्यात नाही का इंग्रजी शब्द येत? तुम्ही कोण आम्हाला सांगणारे वगैरे! अती स्वाभिमानी लोक हे! फक्त त्यांना स्वतःच्या भाषेचा, अभिमान तर नाहीच, पण इतर कुणि म्हंटले मराठीत बोला की त्यांना राग येतो. हटकेश्वर, हटकेश्वर!! |
|
झक्कि-तुम्हाला ईंग्रजी नविन वर्षाच्या मराठित शुभेच्छा. या वर्षात (आणि पुढेपणं) जर मराठी प्रतीशब्द उपलब्ध नसेल तर आणि तरच आंग्ल्भाषेतल्या शब्दांचा वापर या बा.फ. वर करीन असा संकल्प या निमित्ताने मी सोडतो.
अहो इथे भारतातही मराठी दुर्मीळ होत चालल्ये, मराठी शाळा बंद पदत आहेत. लोकांना मराठी बोलायला लाज वाटत आहे.
मायबोली सारख्यांच्या प्रयत्नांमुळे काही तरी आशा आहेत अजून.
नाही तर काही वर्षांतच संग्रहालयात पहायला मिळेल ही भाषा. तेवढी राहीली तर.
आता असच वाटतय की
मराठी असे आमुची मायबोली
पहा आम्ही तिची दशा काय केली
फुका मारतो बात स्वतंत्रतेची
गुलामी तरी आमुच्या मनीची न गेली
अगदी पटले झक्की तुमचे. माझे बाबाही आम्हांला खुप रागावत असतं इंग्रजी शब्द वापरले की. ते म्हणत," मराठी माणसाला मराठी प्रतिशब्द आठवु नये,यासारखे दुख नाही." खरंच आपण नाही बोलायचे तर कोणी बोलायचे शुद्ध मराठी? हाच नियम लिहिण्यासही लागु होतो.
म्हणुनच नोकरीनिमित्त महाराष्ट्राबाहेर राहुनही आम्ही आमच्या मुलीला कटाक्षाने मराठी बोलायला शिकवले. घरीही मराठीच बोलतो. चुकुन हिंदि बोलले तर लेक परत मराठी बोलायला लावते. आणि इतक्या वर्षांनी जेव्हा मायबोलीमुळे मराठी वाचा-लिहायची संधी आली ती मी नक्कीच चुकवणार नाही. जमेल तेवढे शुद्ध मराठी लिहिन......
आपल्याकडे 'मुलाना मराठी बोलायला कसे शिकवावे' ही चर्चा पण इंग्रजीत.... काय करणार?
आणि सांगितलं तर लोकाना राग येतो... हटकेश्वर हटकेश्वर....
विनय
'परदेसाई' विनय देसाई