युद्ध. विराम.

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लमाल, २० जुन २००९, युद्ध
(आशिष महाबळ)
युद्ध. विराम.

इतक्यातच चाणक्य पाहुन झाले. जवळजवळ ४० तास एका आठवड्यात. इतिहासाच्या त्या उजळणीबरोबरच माझ्या युद्धावरील मतांची देखिल चाचपणी सुरु होती. खरंतर युद्ध कुणीच कुणाशी करु नये. युद्ध हा केवळ अधोगतीचाच मार्ग आहे. असे असुनही युद्धातील शौर्याच्या कथा ऐकल्या की, विपरीत परिस्थितीत विरुद्ध रचलेल्या सोंगट्यांना फसवीत लढलेले किल्ले पाहिले की मी भारावुन जातो. माझ्यात खोलवर असलेले सुप्त असे काहितरी जागृत होऊ पहातं. कारण मनुष्यस्वभावामुळे, मनुष्याच्या अहंकारामुळे, महत्वाकांक्षेमुळे, थोडक्यात ज्या कारणांमुळे मनुष्याने खाद्यशिडी (फुडचेन) पदाक्रांत केली आहे त्या कारणांमुळे अनेकदा युद्ध अपरिहार्य होतं.

मध्यंतरी अनेक सिनेमे पाहिले: झी, व्ही फौर व्हेनडेट्टा, मोटरसायकल डायरीज, भगतसिंग ई. भगतसिंगांचा तर मी अनेक वर्षांपासुन भक्त आहे, पण हे इतर चित्रपट पहातांना देखिल भान हरपायला होते. काय आहे असे त्यात? एक समान धागा म्हणजे त्यांची तत्वनिष्ठता. काहिही झाले तरी बेहत्तर, पण ध्येयापासुन ढळायचे नाही. या एका जिद्दीमुळेच अलौकीक असे मानसीक बळ अशा लोकांना सिद्ध असतं. अर्थात अलौकीक ऐवजी हेच बळ अमानवी बनलं की काय होतं हे देखील हिटलर, मुसोलिनी आदिंच्या बाबत आपण पाहिलेच आहे.

चाणक्य एक शिक्षक असल्याने, आणि शिक्षणाला, व त्याही पेक्षा गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याने त्यांचा देशाला जागवायचा मार्ग किंचीत निष्कंटंक झाला. शिक्षकाचे ते स्थान तर गेले आहेच, पण आपल्यापैकी अनेकांना लढा म्हणजे काय याबद्दल मुळिसुद्धा माहीत नाही. जर काही पाहिले असेल तर ते दुरुन, एखाद्या व्हिडिओ गेम प्रमाणे व्हर्चुअल, केवळ बॅकग्राऊंड मधिल काहीतरी. थोडक्यात काय तर आपली संवेदनशीलता नष्ट झाली आहे.

आपण जर तसेच राहु शकलो तर आनंदच आहे. सगळेच जर तसे राहु शकले तर उत्तमच. पण तसे होणार नाही. शांतता ही केवळ दोन युद्धांमधिल क्षणिकता असते. या ना त्या प्रकारच्या झमेल्यात आपल्यातील प्रत्येकजण पुढे मागे अडकणारच. (किंवा डोळे झाकुन् फिरलो नाही तर् लक्षात येतं की आत्ताही आपण कोणत्यातरी कलहात आहोतच). मग आपल्याला ठरवावे लागेल की आपण कोणत्या बाजुला आहोत. सत्याग्रह धरु शकु का? नाहीतरी या विश्वातुन जिवंत सुटका नाही. मग मनाला जे योग्य वाटते ते का करु नये? खोट्या धनाकरता, उथळ नात्यांकरता लढण्यात काय अर्थ आहे? सत्य कुणाच्या बाजुला आहे? काय केल्याने जास्त लोकांचे जीवन सुकर होणार आहे?

युद्धात पडायला घाबरण्याचे काही कारण नाही. का लढायचे, कसे लढायचे याची अनेक पारायणे झाली आहेत. फक्त अवजारं बदलताहेत. स्थिरता ही नेहमीच अस्थिर असते. वर्चस्व एंट्रोपीचेच असते. या सर्व बॆकग्राऊंडवर आपल्याला शोधायची असतात काही प्रश्नांची उत्तरे: भाडोत्री म्हणजे काय? परोपकारी मृत्यु म्हणजे काय? राष्ट्रीयता म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे काय? मुक्ति म्हणजे काय? ती कशापासुन मिळवायची? का? ज्या लोकांपासुन सावध राहायला आपल्याला आपल्या पालकांनी सांगीतले होते तेच आपण बनलो आहोत हे लक्षात आले की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे जाते.

विषय: 
प्रकार: 

स्वधर्म म्हणजे काय? मुक्ति म्हणजे काय? ती कशापासुन मिळवायची? का? >>>
स्थिरता ही नेहमीच अस्थिर असते >> अनुमोदन.

ज्या लोकांपासुन सावध राहायला आपल्याला आपल्या पालकांनी सांगीतले होते तेच आपण बनलो आहोत हे लक्षात आले की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे जाते >>>> Happy
परागकण

मला कथा म्हणून बरी वाटली पण 'हकिकत' म्हणून नाही. मी युद्धाच्या बाजूने आहे असेही नाही. युद्ध म्हणजे नाशच हे मात्र मान्य नाही.

आजकाल खूपसारे लोकं, देश म्हणजे काय? बॉन्ड्र्या ठेवायच्या कश्याला असे म्हणताना वा टाळ्या घेताना पाहिले आहेत. मला वाटतं ते फक्त कल्पनेत जगतात.

"समाजात जगायचे असेल तर तुमच्या दुर्दैवाने का होईना, कुठलीतरी बाजू घ्यावी लागतेच."

ही बाजू घेताना मग जी स्वतःच्या विचाराला पटेल ती घेउ शकता. उदा. पाकिस्थानचे लाड अमेरिकेने थांबवावेत ही माझी बाजू, तर पाकला पैसे देउन लादेनला मिळवू ही भाबडी आशा दुसर्‍या कुणाची. मग इथे बरोबर कोण, चुक कोण?

उद्याजर देशही संकल्पना काढून टाकली तर ही माणसे म्हणून घेणारे प्राणि सुखी होतील का? सर्व युद्ध बंद होतील का? मग भारत पारत्र्यांत असताना कुणा भगतसिंगाला फासावर चढायचे प्रयोजण काय? की तो ही फक्त 'स्थल - म्हणजे आमचा देश' ह्या भानगडीत अडकला? का ह्यापाठीमागे कुठला तरी स्वार्थच होता? 'अन्याय' कदाचित 'स्वार्थाच्या' पुढचा असतो. त्यामुळे 'स्थल्'च्या पुढे असणारी 'अस्मीता' हे घडवतं असते. हे आमचं आहे, ते तसे पुढेही राहवं म्हणून युद्ध होतात.

विश्वाच्या सर्वच नागरिकांना एकाच मापात कसे तोलता येईल? त्याने असाधारण असमतोल निर्माण नाही का होणार? साधी एक कंपनी चालवायची म्हणलं तर वेगवेगळे प्रॉफिट सेंटर आपण निर्माण करतो व ह्या कॉस्ट सेंटरचा खर्च त्यात गेला तर तो बोंबलतो. विश्वाचेही तसेच काहीसे नाही का?

असो. तू विचार मध्ये मांडलेस म्हणून हे उपप्रश्न.

टिपण्णींबद्दल धन्यवाद.

केदार, वरील प्रकार कथा नाही. या प्रकाराला मी अस्फुट म्हणतो. कथा टाकीन लवकरच.

माझे पण मत आहे की कृत्रीम भौगोलीक वेस ही आपल्या मनालादेखिल वेसण घालते. पण इथे मी सर्व प्रकारच्या लढ्यांबद्दल बोलतो आहे. दैनंदीन लढे देखिल. तिथेच तुम्हाला ठरवायचे असते की काय महत्वाचे आहे.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

अरे लमालला तुम्ही कथेतून काहीतरी सांगन्याच्या प्रयत्न करताना म्हणून कथा लिहीले. 'कथा' नाहीये हे माहीतिये. विचार बरा वाटला असे म्हण वाटल्यास.

आशिष, शेवटचा परिच्छेद >>> अनुमोदन. छान लिहिले आहेस.
केदार, तुझे काही मुद्दे विचार करायला लावणारे आहेत.
Crimson Tide मधील कॅप्टन आणि हंटर यांच्यातील युद्धासंबंधीचा संवाद ऐकण्यासारखा आहे -
Capt. Ramsey: At the Naval War College it was metallurgy and nulear reactors, not 19th-century philosophy.
[Stifled laugh]
Capt. Ramsey: "War is a continuation of politics by other means." Von Clausewitz.
Hunter: I think, sir, that what he was actually trying to say was a little more...
Capt. Ramsey: Complicated?
[Men Laughing]
Hunter: Yes the purpose of war is to serve a political end but the true nature of war is to serve itself.
Capt. Ramsey: [laughing] I'm very impressed. In other words, the sailor most likely to win the war is the one most willing to part company with the politicians and ignore everything except the destruction of the enemy. You'd agree with that.
Hunter: I'd agree that, um, that's what Clausewitz was trying to say.
Capt. Ramsey: But you wouldn't agree with it?
Hunter: No, sir, I do not. No, I just think that in the nuclear world the true enemy can't be destroyed.
Capt. Ramsey: [chuckling, tapping glass] Attention on deck. Von Clausewitz will now tell us exactly who the real enemy is.
[laughing]
Capt. Ramsey: Von?
[Men Laughing]
Hunter: In my humble opinion, in the nuclear world, the true enemy is war itself.

कुब्रिकचा युद्धखोरीवर (काय शब्द आहे !) अत्यंत मार्मिक आणि नेमके भाष्य करणारा 'Dr. Strangelove or: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb' अवश्य बघावा.

    ***
    I get mail, therefore I am.

    A sentence in "Dr. Strangelove, ...":
    Gentlemen, you can't fight in here! This is the War Room.

    होय, या सर्व प्रकारांबद्दल लिहिण्याबोलण्यासारखे, तसेच करण्यासारखे बरेच काही आहे, ...

    --------------------------------------------------------------
    ... वेद यदि वा न वेद

    चाणक्याने त्याच्या आयुष्यभर फक्त राजकारण आणि अप्रत्यक्ष युद्धंच केले असले तरी तो कधीही युद्धखोर वाटत नाही. फक्त आणि फक्त सत्तेचाच ध्यास बाळगूनही त्याने जमेल तिथे समरप्रसंगाला स्वतः पर्याय निर्माण केले. अलक्षेंद्रच्या (Alexander) आक्रमणाच्या वेळी मात्र युद्ध हाच एकमेव पर्याय समजून त्याने पुरूसारख्यांकडे सैन्य उभारणीची भीक मागितली.

    या दोन्ही उदाहरणातंच नव्हे तर आजवर घडलेल्या प्रत्येक हातघाईच्या आणि घनघोर युद्धांस केवळ अन्याय न साहण्याची एक आणि पराकोटीची महत्त्वाकांक्षी (अमानवी बळ हा केवळ या महत्त्वाकांक्षेचा परिणाम) दुसरी, ह्या दोनच मानवी प्रवृत्ती अनुक्रमे प्रतिकार आणि आक्रमण बनून कारणीभूत ठरल्या. यातल्या कुठल्याही एका प्रवृत्तीच्या अभावात युद्ध केवळ अशक्य आणि युद्ध नसण्याच्या काळात या दोहोंपैकी एका प्रवृत्तीचा र्‍हास आणि दुसरीचा उदय चालूच राहणार.
    एखाद्या व्यक्तीची किंवा समाजाची दुसर्‍याशी प्रांतिक, वैचारिक किंवा भौतिक इच्छा आणि महत्त्वाकांक्षेच्या बाबतीत समानता असणे कदापि अशक्य! सृष्टी आणि निसर्गनियमही त्यास अनुकूल नाहीत.
    त्यामुळे कुठल्याही काळात युद्ध ही एक अटळ गोष्ट असणारंच.
    शांतता ही केवळ दोन युद्धांमधिल क्षणिकता असते > हेच सत्य. ह्या क्षणिक शांततेची सावली जेवढा काळ आपल्या आयुष्यावर आहे फक्त तेवढेच आपण "जास्तीतजास्त मनसोक्त" जगू शकू..
    पर्यायांच्या अभावात युद्ध ही जरूर आणि गरज होऊन बसते आणि ही वेळ एक पर्याय शोधल्यानंतरही आज ना उद्या येणारंच. यात चांगले किंवा वाईट असे काहीच नाही. जे आहे ते केवळ अपरिहार्य.

    मग मनाला जे योग्य वाटते ते का करु नये? >> असा विचार करताच तुम्ही तुमच्यासाठी एक नवा युद्धप्रसंग जन्माला घातलात. Happy

    बाकी अस्फुटास अनुमोदन.