शब्द आले होते ओठी गेले सांगायचे राहुन भाव मनातले माझ्या गेले द्यायचे राहुन.....
आला श्रावण, वसंत गेले उमलायचे राहुन नभ आले या नभात गेले बरसायचे राहुन
भोवताली सुख किती गेले हसायचे राहुन आले मरण दारात गेले जगायचे राहुन