समस्त मायबोलीकर बंधूभगिनींनो, आपणा सर्वांस विक्रमचा ब्राझिल मधून सप्रेम नम्स्कार.
ब्राझिल मध्ये सध्या तरी आम्ही फक्त ३-४ मराठी कुटुंबीय आहोत. त्यामुळे आमच्या गप्पा येथे फारशा होणार नाहीत. पण आपल्याला या माध्यमा तर्फे आमच्याशी संपर्क साधता येइल.
या देशात भारताब्द्दल फार उत्सुकता असते. सध्या येथे tv वर एक मालिका चालू आहे. अगदी नम्रता कपूरच्या मालिके सारखी. तितकीच लोकप्रिय. प्राइम टाइम वर. Caminhoes das Indias. त्यातला निम्मा भाग भारतातला. थोड्क्यात cross cultural नात्यातील अनेक गुंते. त्यामुळे तुम्ही येथे आलात तर तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातील आपल्या बाबत. कारण जे दाखवतात ते यांना सर्व अद्भूत.
आपलीही अशीच जिज्ञासा असेल, तर विचारा. उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
झिंगर
इथला कार्निव्हल म्हणजे आपल्या गणपती उत्सवा सारखा. (सोरी गणराया, हे जरा अतिच होतय.) म्हणजे काय की प्रत्येक गावात मिरवणुक असते. रीओची जास्ती जगप्रसिद्ध. (जशी पुण्यची गणपती मिरवणूक.- आता या माझ्या वाक्यावर खूप आक्षेप असतील. अर्थात पुण्यातून आणि बाहेरून देखिल असो). आणि बहुतेक ब्राझिलीयन लोक TV वर बघतात. (साम्य येवढेच, बर का गणराया).
पुढ्च्या वर्षी नक्की जाइन आणि फोटो पाठविन.
बघा, पुढच्या वर्षी लवकर या! असं कोणी तरी म्हणलं वाटतं.
पण पहिली उत्सुक comment कार्निव्हल बद्दल. मला आश्चर्य नाही वाटलं.
इथं सुद्धा तसच, आमची ही भारतात गेली, शेजार्यांना भारतातून काय घेउन येऊ अस विचारलं, तर उत्तर - एक जिवंत हत्ती ! आणि जमलं तर कोब्रा.
मनात आलं , आम्च्याकडे (माझा मुलगा मराठीच्या वहीत असच लिहायचा, त्याची आठ्वण आली,) दोन कोब्रा असतात, कुठ्ला आणू. दोन्ही अवघड. (म्हण़जे, हत्ती आणि कोब्रा, दोन्ही अवघड, बर का! गैरसमजूत नसावी.)
मनिष,
ब्राझिल मध्ये फूट्बॉल प्रेम. काय वर्णावे.
सध्या ``रोनाल्डो`` येथे धमाल करतोय. अफलातून गोल्स. Corinthians कडुन खेळतो. त्याला इथे फिनॉमिना म्हणतात.
फार एण्ड,
Caminhoes Das Inidias चा अर्थ - ways of India.
पण येथे थोडा शब्द खेळ पण आहे.
पोर्तुगीज लोकांनी जेंव्हा भारत शोधयचा प्रयत्न केला तेंव्हापासून हा एक वाक्प्रचार आहे.
नमस्कार विक्रम, ब्राझिलमधली ही फेमस सिरिअल म्हणालात त्यात ओम शांती ओम वगैरे म्हणतात कां? नवरयाची एक मैत्रीण आहे ब्राझिलमधली, ती मला सांगत होती. आणि काही शब्दांचा अर्थही विचारत होती.
मंडळी, नमस्कार...
Redmond (WA, US) मधे कोणी मा.बो. कर आहेत का?
***********************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"
आउट डोअर्स मॅडम,
नमस्कार,
त्या सिरीयलचे नाव Caminhoes das Indias असे आहे. (तुमच्या नवर्याची मैत्रीण तुम्हाला थापा मारते असं दिसतय. . काही काही आपले शब्द वापरतात. आरे बाबा, ठिक है, शुक्रिया, वगैरे.
गोदेया,
काय करणार,
आलिया भोगासी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान.
तुमचं नाशिक काय म्हणतंय. उन्हाळा संपला का? या वर्षी द्राक्षांचं पीक उत्तम आलं होतं म्हणे.
विक्रम
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
समस्त मायबोलीकर बंधूभगिनींनो, आपणा सर्वांस विक्रमचा ब्राझिल मधून सप्रेम नम्स्कार.
ब्राझिल मध्ये सध्या तरी आम्ही फक्त ३-४ मराठी कुटुंबीय आहोत. त्यामुळे आमच्या गप्पा येथे फारशा होणार नाहीत. पण आपल्याला या माध्यमा तर्फे आमच्याशी संपर्क साधता येइल.
या देशात भारताब्द्दल फार उत्सुकता असते. सध्या येथे tv वर एक मालिका चालू आहे. अगदी नम्रता कपूरच्या मालिके सारखी. तितकीच लोकप्रिय. प्राइम टाइम वर. Caminhoes das Indias. त्यातला निम्मा भाग भारतातला. थोड्क्यात cross cultural नात्यातील अनेक गुंते. त्यामुळे तुम्ही येथे आलात तर तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातील आपल्या बाबत. कारण जे दाखवतात ते यांना सर्व अद्भूत.
आपलीही अशीच जिज्ञासा असेल, तर विचारा. उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
कळावे,
लोभ असावा.
विक्रम
नम्रता ???? की एकता?
विक्रम मायबोलीवर हार्दिक स्वागत..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
माधवी,
sorry, sorry. एकता.
कार्निवलला गेलात की नाही? जा आणि फोटो टाक नक्की.
कार्निवलचे फोटो इथे कशाला? आम्हाला जळवायला?
झिंगर
इथला कार्निव्हल म्हणजे आपल्या गणपती उत्सवा सारखा. (सोरी गणराया, हे जरा अतिच होतय.) म्हणजे काय की प्रत्येक गावात मिरवणुक असते. रीओची जास्ती जगप्रसिद्ध. (जशी पुण्यची गणपती मिरवणूक.- आता या माझ्या वाक्यावर खूप आक्षेप असतील. अर्थात पुण्यातून आणि बाहेरून देखिल असो). आणि बहुतेक ब्राझिलीयन लोक TV वर बघतात. (साम्य येवढेच, बर का गणराया).
पुढ्च्या वर्षी नक्की जाइन आणि फोटो पाठविन.
बघा, पुढच्या वर्षी लवकर या! असं कोणी तरी म्हणलं वाटतं.
पण पहिली उत्सुक comment कार्निव्हल बद्दल. मला आश्चर्य नाही वाटलं.
इथं सुद्धा तसच, आमची ही भारतात गेली, शेजार्यांना भारतातून काय घेउन येऊ अस विचारलं, तर उत्तर - एक जिवंत हत्ती ! आणि जमलं तर कोब्रा.
मनात आलं , आम्च्याकडे (माझा मुलगा मराठीच्या वहीत असच लिहायचा, त्याची आठ्वण आली,) दोन कोब्रा असतात, कुठ्ला आणू. दोन्ही अवघड. (म्हण़जे, हत्ती आणि कोब्रा, दोन्ही अवघड, बर का! गैरसमजूत नसावी.)
कळावे, लोभ असावा, (दोन्ही येथे आवश्यकच्)
विक्रम
Himscool,
धन्यवाद.
ब्राझिल गप्पांमधे आपले स्वागत.
अरे वा ब्राझीलमध्येपण मराठी माणूस...
कार्निव्हलबरोबरच तिथल्या फुटबॉलप्रेमा बद्दलपण सांगा...
Caminhoes das Indias >> बापरे अनेक भाषांतून डेडली शब्द आहे हा
पण खरा अर्थ काय 'भारताकडे जायचे रस्ते' वगैरे असा काही आहे का?
मनिष,
ब्राझिल मध्ये फूट्बॉल प्रेम. काय वर्णावे.
सध्या ``रोनाल्डो`` येथे धमाल करतोय. अफलातून गोल्स. Corinthians कडुन खेळतो. त्याला इथे फिनॉमिना म्हणतात.
फार एण्ड,
Caminhoes Das Inidias चा अर्थ - ways of India.
पण येथे थोडा शब्द खेळ पण आहे.
पोर्तुगीज लोकांनी जेंव्हा भारत शोधयचा प्रयत्न केला तेंव्हापासून हा एक वाक्प्रचार आहे.
येतय का कुणी ब्राझिलला
मनिश
हे रोनाल्डोचे दोन गोल बघा. साओ पावलो राज्य स्पर्धेची अंतिम फेरी.
पेले या मॅचला हजर होते. त्यांना त्यांच्या खेळाची आठवण आली.
पहिल्या गोल - बॉल कंट्रोल तर दुसर्यामधे डॉजिंग आणि अचुकता.
http://www.youtube.com/watch?v=yMZH5sE6B9Y&feature=related
http://www.youtube.com/watch?v=-1PSsgpFwyU
नमस्कार विक्रम, ब्राझिलमधली ही फेमस सिरिअल म्हणालात त्यात ओम शांती ओम वगैरे म्हणतात कां? नवरयाची एक मैत्रीण आहे ब्राझिलमधली, ती मला सांगत होती. आणि काही शब्दांचा अर्थही विचारत होती.
मंडळी, नमस्कार...
Redmond (WA, US) मधे कोणी मा.बो. कर आहेत का?
***********************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"
(सौजन्य : माननीय मिपाकर श्रीयुत केशवसुमार)
आउट डोअर्स मॅडम,
. काही काही आपले शब्द वापरतात. आरे बाबा, ठिक है, शुक्रिया, वगैरे.
नमस्कार,
त्या सिरीयलचे नाव Caminhoes das Indias असे आहे. (तुमच्या नवर्याची मैत्रीण तुम्हाला थापा मारते असं दिसतय.
हा बराच मोठा देश आहे आणि ३/४ मराठी कसे भागते राव तुमचे !
गोदेय
गोदेया,
काय करणार,
आलिया भोगासी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान.
तुमचं नाशिक काय म्हणतंय. उन्हाळा संपला का? या वर्षी द्राक्षांचं पीक उत्तम आलं होतं म्हणे.
विक्रम
ते विमानाचे नक्की काय झाले हो?
अजून पत्ता नाही. इलेक्ट्रिकल वादळ म्हणतात.
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
नमस्कआर मअन्दलि, मि सध्या ब्रझिल मधिल चुरितिबा मध्ये आहे. . कोनि आहे क तिथे मरआथि ?
माहिति हवइ आहे.
नमस्कार श्रियश,
मी आहे ब्राझिल मध्ये.
मला इ मेल पाठवा मायबोलीच्या माध्यमातून. किवा फोन करा. ०१५ ९७५९ २८११.
नमस्कार मायबोलीकरांनो!