चुकले का हो ?

(इलाही जमादारांच्या 'चुकले का हो ? ' ह्या अत्यंत सुंदर गझलेचे एक असुंदर विडंबन)

श्वसुराला, त्रास म्हणालो,
श्वसुराला, त्रास म्हणालो, चुकले का हो?

मेहुणीस, 'लै खास' म्हणालो, चुकले का हो?
(उरली) चिरंजीव वेदना, मस्तकी, हळहळणारी (कसली बर ? फिदीफिदी)

भाचरांस (तिच्या) , बकवास म्हणालो, चुकले का हो?
बुडत्याला, तरण्यासाठी, काय लागते?

जेवणावळीं, आता बास म्हणालो, चुकले का हो?
खाण्याआधी, नाव सांग त्या, पदार्थाचे
उल्हासात, फाल्गुनमास म्हणालो, चुकले का हो?
निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो

सासुचे, वय साठ म्हणालो, चुकले का हो?
(मेहुण्यास, ग्रहण खग्रास म्हणालो चुकले का हो ? )
पाहील्या कविता, देखील्या ग़ज़रा, गीतेस पाहीले (ह्या सगळ्या तिच्या मैतरणी बर)
पत्नीला मी, फास म्हणालो, चुकले का हो?

चौदा वर्ष, काढली विवाहा, उरली वंचना
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

वात आप्त, आघाता टगे, अपघात मेहुणे
साड्यांना तिच्या , आरास म्हणालो, चुकले का हो?

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
रचनेस माझ्या, जरा हास म्हणालो, चुकले का हो?

(चु भू द्या घ्या )

Submit to kanokani.com

केदार,

मूळ कविता वाचली नाही अजून पण या विडंबनाने नक्कीच करमणूक केली! स्मित

----------
टेक्सास ए.वे.ए.ठि. वृत्तांत : http://www.maayboli.com/node/7575
अव्यक्त : http://avipune.blogspot.com

>>>.चौदा वर्ष, काढली विवाहा, उरली वंचना
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?<<<

हाहा

केदार,

मी पण मुळ रचना वाचली नाही आहे पण तु जे लिहिलेय ते एकदम झकास्...मजा आली.

केदार, मला पण विडंबन खुपच आवडले. मी सुद्दा मुळ कविता वाचलेली नाही.

मूळ गझल http://www.marathimati.com/Ghazal/Aakashala_Bhas_Mhanalo.asp या ठिकाणी मिळू शकते... आणि गझलकार आहेत इलाही जमादार ('इनामदार' नाही..)

केदार! लई खास!!

धन्यवाद सर्वांचे स्मित मूळ गझलेची लींक द्यायला हवी होती स्मित

कूल : तुझे विशेष आभार स्मित
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

हसून हसून गडबडा लोळण जबरी.

धन्यवाद स्मित
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

स्मित

तिकडं म्हणू नकोस हा असली विडंबनं आत्तापासून... हाहा

अनघा फिदीफिदी

जाई स्मित
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

चौदा वर्ष, काढली विवाहा, उरली वंचना
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो? >>> केदार आधी पासूनच मनाची तयारी करून ठेवली आहेस... स्मित

अ सुंदर विडंबन हाहा

इन्द्रा फिदीफिदी
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

सही आहे हे विडंबन... rofl.gif

हाहा

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
~ प्रकाश ~ GET CONNECTED

जबरदस्त हाहा

>>सासुचे, वय साठ म्हणालो, चुकले का हो? << हाहा
केड्या तुझे होवू घातलेलं सासू इलंय बग बाह्येर हातात लाकूडाचो फोक घेवान... फिदीफिदी

कविता आवडली... लईच भारी.. हसून हसून गडबडा लोळण

धन्यवाद सगळ्यांचे स्मित

दक्स हाहा
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

छान आहे ! स्मित

स्मित
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

मस्तच. हाहा

धन्स स्मित
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

रचनेस या, जरा खास म्हणालो, चुकले का हो?

सही जा रे ला है भिडू ,
अजाबात चुकला न्हाईस . फिदीफिदी

रचना सुंदरच आहे. विशेषतः 'विवंचनेचा' शे'र आवडला.

याच रचनेचं मीसुद्धा विडंबन केलं होतं:

बायकोस मी ताप म्हणालो, चुकले का हो?
अन् पोराला बाप म्हणालो, चुकले का हो?

हा मत्ला होता.

शरद