आलु टमाटर

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मध्यम आकाराचे कांदे किसुन, चार टोमॅटो किसुन,चार -पाच बटाटे मध्यम आकारचे मोठ्या फोडी करुन एक इंच आलं किसुन, २-४ लसणाच्या पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, धणे पावडर २ चमचे, जिरे पुड १ चमचा, २ चमचे गरम मसाला, १ चमचा देगी मिर्च पावडर, १ चमचा हळद, १ चमचा बडीशेप अर्धवट कुटुन, थोडेसे अख्खे धणे, जिरे, मेथ्या, मीठ

क्रमवार पाककृती: 

एका प्रेशर पॅनमध्ये किंवा कुकर मध्ये थोडेसे तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात धणे, जिरे व मेथ्या हातावर चोळुन फोडणीत टाकाव्यात. नंतर त्यात लसुण, आले व हिरवी मिरची घालुन परतावे. लसुण थोडासा लालसर झाला व मिरच्या परतल्या गेल्या कि त्यात किसलेला कांदा घालुन नीट परतावे. २-३ मिनिटं झाकण ठेवुन कांदा शिजु द्यावा. परत थोडावेळ मंद गॅसवर परतावा. आता त्यात टॉमॅटो , हळद, तिखट व इतर मसाला टाकावा. पाच मिनिटं परतावे. नंतर यात बटाट्याच्या फोडी व थोडेसे पाणी अन मीठ घालावे. कुकरचे किंवा पॅनचे झाकण लावावे. एखाद्-दुसर्‍या शिट्टीत भाजी शिजते.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जण
अधिक टिपा: 

टॉमॅटोमुळे भाजी किंचित आंबट व चटपटीत लागते. जर आंबुसपणा जास्त हवा असेल तर यात अर्धा चमचा आमचुर पावडर घालता येते. ही भाजी कचोड्यांबरोबर (बिहार्-युपी मध्ये कचोर्‍या किंवा कचोड्या म्हणतात पुर्‍यांना) खातात. सोबत मुळ्याची चाट मसाला व लिंबु पिळलेली कोशिंबीर अन पकोड्या (म्हणजे दही-बुंदी) असा बेत असतो.
याच भाजीत मटर घालुन आलु मटर करता येते..

माहितीचा स्रोत: 
नवरा, सासुबाई
Submit to kanokani.com

सहीच. स्मित
अल्पना अनेक धन्यवाद लगेच पा.कृ. टाकल्याबद्दल.
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

हाय अल्पना,
किसलेल्या टॉमॅटो ऐवजी टॉमॅटो पेस्ट/प्युरी चालेल का???

धन्यवाद अल्पना.

मला पु-यांना कचोड्या म्हणतात ते माहित नव्हतं.. स्मित

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

हो चालेल की..अगदी बारिक चिरुन घातले तरी चालेल.. किसलेले असले किंवा प्युरी असली तर लवकर शिजतो मसाला अन भाजी मस्त मिळुन येते..