चीज चे २ पदार्थ....तेच तेच पण नवीन (सेम सेम बट डिफरन्ट)!

Submitted by लाजो on 12 April, 2009 - 02:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चीज - रिकोटा, टेस्टी,
भाज्या - पालक/गाजर/बटाटा/झुकिनी
पास्ता ट्युब्ज,
अन्डी,
मीठ, मीरेपूड

क्रमवार पाककृती: 

प्रकार १: पालक नळ्या

रिकोटा चीज + क्रीम + शिजलेला पालक आणि मीठ-मीरेपूड/जायफळ पूड मिक्स करून (कॅनेलोनी मिक्श्चर) उकडलेल्या छोट्या पास्ता ट्युब्स मधे भरणे. आवडत असल्यास टॉमॅटो पास्ता सॉस घालुन वरून किसलेले चीज घालुन जरा ग्रिल करणे.

प्रकार २: भाजी ऑमलेट

बारीक किसलेले गाजर + किसलेली झुकिनी + उकडलेला बटाटा किसून +किसलेले चीज (आवडत असेल ते) + १-२ अन्डी आणि चवीप्रमाणे मीठ, मीरेपूड किन्वा मी कधी धणे-जीरे पूड / इटालियन हर्बज (पिझ्झा/पास्ता टॉपर) घालते. हे सगळे नीट मिक्स करून खोलगट नॉनस्टिक पॅन ला बटर/ऑइल स्प्रे मारून त्यात ओतायचे. मन्द आचेवर खालची बाजू होऊ द्यायची आणि मग उलटवून वरची बाजू नीट भाजायची. मस्त स्पॅनिश ऑमलेट चे भारतीय्/इटालियन वर्जन तयार होते. नुसते, सॉस बरोबर, सॅलड बरोबर किन्वा सॅन्डविच करून खाणे....मस्त स्नॅक, हेवी ब्रेकफास्ट नाहीतर लाइट लन्च :),

याच मिश्रणाची छोटी छोटी धिरडी किन्वा एग रिन्ग्ज मधे ओतून चकत्या पण करता येतात.

हेच मिश्रण छोट्या मफिन पॅन्स मधे पेपर कप्स ठेवून त्यात ओतायचे आणि बेक करायचे. अगदी शेवटी वरतून किसलेले चीज घालुन परत जरा ग्रिल करायचे. मस्त मफिन्स तयार होतात. फक्त हे ताजे ताजेच खायला लागतात कारण थोड्या वेळाने खाली बसतात..........:(

वाढणी/प्रमाण: 
खाल त्या प्रमाणे...
अधिक टिपा: 

या भाजी ऑमलेट मध्ये आपल्या आवडीच्या भाज्या जसे पालक, भोपळा, ढब्बू मिरची - किसून/ उकडुन, उकडलेल्या चिकन चे तुकडे, हॅम्/सलामी स्लाइसचे तुकडे घालता येतिल. ताजी कोथिम्बीर, पुदिना, बेसिल किन्वा इतर हर्ब्ज पण ट्राय करता येतिल....एकदम व्हर्सटाइल रेसिपी आहे...आपापल्या आवडीप्रमाणे बदल करता येतिल..

माहितीचा स्रोत: 
काही स्वतःचे प्रयोग, काही इथे-तिथे वाचुन - लेकीला भाज्या/अन्ड खायला घालण्यासाठी केकेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृती लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा चु. भु. माफ करा...

पाककृती लिहीलीस म्हणून माफ करु का ? Happy