"यार कसले छान बॉस आहेत सर्व तुझे. आणि ते जावेद सर किती हँडसम.." माझी बंगाली रूममेट देबोलिना ऑफिसमधून आल्यानंतर मला जवळ जवळ चार ते पाच वेळा म्हणाली असेल.
अर्थात आमचे ऑफिस हे ऑफिस नसून एखाद्या कॉलेजच्या कँटीन इतकं मजेदार असतं हे तिचं सर्वात जास्त आवडणारं कारण. स्वतःचे ऑफिस सुटले की ही बया आमच्या ऑफिसमधे येऊन बसायची.
माझे बॉस चार.. आता तीनच. पर्सी दुबाश... पारसी आणि फूटबॉलसारखा राऊंड. एकदम क्युट आणि स्वीट. पट्टाभी सर जव़ळ जवळ साठीचे आहेत. आयुष्य त्यानी पत्रकारितेमधे काढलं. जितेंद्र झा उर्फ जेजे मला मोठ्या भावासारखा. मी जॉइन झाले तेव्हा माझ्या टिममधे फक्त हे तीन जण होते. मी चौथी. सर्वात ज्युनिअर. मागच्या वर्षी आयपीएलचा जोर वाढत चालला तेव्हा आम्हाला जॉईन केलं जावेद सरानी.
जावेद अख्तर सिद्दिकी. वय वर्षे साठ. मिडडे, आफ्टरनून यासारख्या वर्तमानपत्रातून त्यानी स्पोर्ट्स जर्नालिस्ट म्हणून काम केलं होतं. आणी जवळ जवळ अठरा वर्षे ते गल्फ न्युजमधे स्पोर्ट्स एडिटर होते. सहा फुटाची उंची. गोरापान रंग. आणि बदामी डोळे. थोडेसे पांढरे थोडेसे काळे केस. आणी चेहर्यावर असणारं कायम एक छान सं हसू. बघितल्यावर एकदम "आजोबा" असं ओरडावंसं वाटलेलं मला. अर्थात मी त्याना पहिल्यादा पाह्ल्यावर. त्यानी मला आयपीएल खेळाडूच्या लिलावामधे दिडशे ते दोनशेचा मिडिया कंट्रोल करताना पाहिलं होतं. त्याच्या मते मी मस्तीखोर मुलाचा॑ वर्ग सांभाळणारी टीचर होते. आणी त्या मस्तीखोर मुलामधे ते पण एक होतेच.
त्या लिलावानंतर एक आठवड्याभरातच त्यानी आमची टीम जॉइन केली. आणि आयपीएल एकदम इंटरेस्टिंग्बनून गेलं. सकाळी नऊच्या ऑफिसला ते बरोब्बर सव्वा आठला ऑफिसमधे हजर असायचे. आणी सर्व वर्तमानपत्र वाचून माझ्यासाठी रीपोर्ट तयार ठेवायचे. मला सुरुवातीला काहीही समजायचं नाही.. छंद किंवा आवड म्हणून क्रिकेट बघणं वेगळं. आणि काम म्हणून ते समजून घेणं वेगळं. ते अगदी शांतपणे मला फिल्डींग पोझीशन्सपासून सर्व समजून सांगायचे. ते पण क्रिकेटची लाईव्ह मॅच चालू असताना. मी आणि जावेद सर बाँड्रीलाईनला जाऊन उभे रहायचो आणि ते मला माहिती देत असायचे.
"अभी हरभजन जहापे खडा है.. उसे मिड विकेट है.. वहा पे देखो सनथ खडा है.. "
एकदा असेच आम्ही बोलत असताना त्यानी अचानक माझा दंड घरला आणि मला खाली ओढलं दुसर्याच क्षणाला एक बॉल जोरात आमच्या दिशेने आला.. बॅट्समन ने बॉल मारल्याबरोबर त्याना समजलं होतं की बॉल कुठे येइल!!!
त्याचा जन्म आझमगढचा. वयाच्या नवव्या वर्षी ते मुंबईला आले ते पण एकटेच. त्यानंतरचं शिक्षण. नोकरी सर्व त्यानी आपणहून केलं. कमवा आणि शिका पद्धतीने. एकटं राहूनसुद्धा कसलीही वाईट सवय त्याना नव्हती.
कुठल्याही प्रकारचा खेळ हे जावेद सरांसाठी एक पॅशन होतं. एक बास्केटबॉलपटू म्हणून ते नॅशनल टीममधून खेळले होते. .
"नंदिनीजी, कुछभी प्रॉब्लेम हो. मुझसे जरूर पूछना." त्यांचा जीटॉकवरचा हा स्टेटस मेसेज. ते माझ्याशी बोलताना अस्खलित उर्दूमधून बोलणार आणी माझ्या अफाट हिंदीमधे मी उत्तर देणार. ऑफिसमधल्या लोकासाठी करमणूकीचा कार्यक्रम.
"सर, वो प्रेस रीलीज निकाल देंगे तो बताना मै सारी मीडिया को फोने करेगी.. और फिर तुमको.. आयमीन आपको बता देगी.." हे वाक्य संपपर्यंत जेजे खुदुखुदु हसायचा. आणि "कोइ बात नही नंदिनीजी. आप कोइ फिकर मत किजिये" असं जावेदसराचे उत्तर आल्यावर
"फिकर कैसे ना करू. मीडीया तो अपनेको ही पिटेगी.. साले हरामखोर.. " एव्हाना जेजे चा गब्बर झालेला असायचा. आणी पर्सी पण त्याला सामिल असायचा.
पण माझ्या टपोरी हिंदीमधे आणि त्याच्या उर्दूमधे पण आमचा संवाद चालायचा. कुठल्याही आजोबासारखं त्याचं कॉम्प्युटरमधे ज्ञान कमी. मग "नंदिनीजी, ये यहापे अलाईनमेंट नही हो रहा है. " असा पुकारा झाल्यावर मी त्याच्या डेस्कवर जाऊन व्यवस्थित करणार. अगदी लहान मुलासारखं मी कय करतेय ते नीट बघायचे. आणी "अरे ये तो ईझी है. नेक्स्ट टाईम मै ही कर दूगा.." हसत हसत म्हणायचे. परत पाच मिनिटानी "नंदिनीजी," असा आवाज यायचाच.
जावेद सर ऑफिसमधे असल्यावर एक चैतन्य असायचं. त्याना हसायला हसवायला खूप आवडायचं. ते एकेकाळी पाकिस्तानचे मीडीया मॅनेजर होते. त्यावेळच्या पाकिस्तान तीमच्या सर्व गमती जमती अगदी रंगवून सांगायचे. मागच्या वर्षी पट्टाभीसर हैद्राबादच्या मॅचेस सांभाळत होते. जावेद् सरानी त्याना सांगितलं. की, शाहिद आफ्रिदीला सांगा "जावेद सिद्दीकीने याद किया था.." एवढासाच निरोप होता, पण त्याने ऐकल्याबरोबर दुसर्या दिवशी पट्टाभिसराना पाकिस्तान टीमची जर्सी पॅक करून दिली आणी सांगितलं... "पागल हू क्या मै.. के इतनी बडी बात भूल जाऊंगा.."
नक्की काय बात होती ते जावेद सरानी कधीच सांगितलं नाही. डोळे मिचकावून एवढंच म्हणाले "बादमे बतादूंगा.." तो नंतर कधी आलाच नाही.
मी लग्नासाठी सुट्टीवर निघाले तेव्हा चॅम्पियन्स लीग जोरात चालू होती. माझ्,न लेग्न ३ डिसेंबरला आणी नेमकी त्याच दिवशी पहिली मॅच होती. त्यामुळे अख्खी टीम येणार नव्हती. मला जावेद सर म्हणाले. "तुम वापस आओगी तो तुम्हे अच्छासा बडासा तोहफा देंगे"
मी म्हटलं. "सर तोहफा नही. आप आ आते शादीमे.. तो वो सबसे बडा तोहफा होता.."
मी जानेवारीमधे परत आले तेव्हा जावेद सर सुट्टीवर होते. मला जेजे म्हणाला की गावाला गेले आहेत.
एका दुपारी जेजेला फोन आला. पोटाच्या कॅन्सरने जावेद सराना फार लांब नेलं होतं. इतके दिवस ते आमच्यासोबत होते तेव्हा त्याना असा दुर्धर आजार असेल असं वाटलं सुद्ध नव्हतं. हॉस्पिटलमधे त्यानी अवघे पंधरा दिवस काढले. काहीही त्रास न होता नेहमी सारखं स्मित हास्य ओठावर ठेवून ते गेले.
आजही ऑफिसमधे असं वाटतं. ते आमच्यासोबत कुठेतरी आहेत. हळूच माझ्या खुर्चीपाठी उभे राहून म्हणतायत "क्यु नंदिनीजी.. घर नही जाना आपको....."



छान लिहिलं आहेस गं नंदू..
मस्त.. सहीच तुझे जावेद सर..
--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!
चांगले लिहील आहेस नंदिनी, आवडले.
वा ! आवडलं.
तू त्यांच्यापेक्षा वयाने (व अनुभवाने) लहान असूनही तुला नन्दिनीजी म्हणत ते खरंच की गंमतीने ?
***
Real stupidity beats artificial intelligence.
तू त्यांच्यापेक्षा वयाने (व अनुभवाने) लहान असूनही तुला नन्दिनीजी म्हणत ते खरंच की गंमतीने ?
तसं झालं की सर्व हसायचे आणि जावेद सर म्हणाय्चे "ठिक है.. हर किसीकी बात करने की खासियत होती है :)"
>>> त्याच्या नऊ वर्षाच्या नातीला सुद्धा ते अहो जाहो करीत. 'मला वाटतं उर्दूमधे तुम वगैरे संबोधने नाहीच आहेत. मी कधीकधी "जावेद सर मै तुमको बोल रही हू.." इत्यादि सिक्सर मारायचे.
--------------
नंदिनी
--------------
अतिशय सुन्दर आणि हृद्य लिहिले आहेस्.माझ्या ही व्यावसायीक आयुष्यात अशीच एक व्यक्ति आली होती.ती हिमाचली होती व तितकीच सर्वाना आपुलकीने वागवणारी होती.विशेष म्हणजे सर्वांनाच अहो ने सम्बोधत असे.आपल्या कलाकारात ही सुरेश वाड्कर सर्वाना असेच सम्बोधतात.
नंदिनी ,तुमची लिहिण्याची शैली पु लं ची आठवण करून देते.
माझ्या डोळ्यासमोर जावेद साहेब तू हुबेहुब उभे केलेस.
त्यांना श्रधांजली
मस्त लिहिलं आहेस. एक सांग हे आझमगढ यूपीचं का? फेब. मधे एक वर्साटाईल पर्सनालिटीवाल्या आजी भेटल्या होत्या त्यांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटतंय हे नाव.
छानच लिहीलंत नंदीनी'जी'!
असेच एक एक हिरे आपलं अनुभवविश्व समृद्ध करत जातात. आपण फक्त डोळे उघडे ठेऊन पहायचं असतं. तुम्ही ते तेज भरभरुन पाहिलंत आणि शब्दातही उतरवलंत या बद्दल तुमचेही अभिनंदन.
नंदु.मस्त लिहिलयस गं.
अशी काही व्यक्तिमत्वं आपल्या आयुष्यात भेटतात जी कायमची आपल्या आयुष्यावर त्यांचा ठसा उमटवुन जातात आणि हक्काने आपल्या मनात कायमचं घर करतात.. तुझे जावेद सरही त्यातलेच एक ..
हो गं सायोनारा जावेद सर युपीचेच आझमगढचे होते. मधे कुठल्यातरी वर्तमानपत्रामधे आझमगढ हा अतिरेक्यचा अड्डा असल्याचे छापून आले होते. जावेद सरानी फोन करून संपादकाला झापले होते.
--------------
नंदिनी
--------------
तुमचे जावेद सर आवडले. छान लिहीलय
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
मागे तू कुठेतरी सलीम खान यांच्या बद्दल लिहिलं होतंस का? त्यामुळे लेखाचं नाव वाचून मला तू त्या जावेद अख्तर बद्दल लिहिलं आहेस असं वाटलं होत.
एखादा कलीग कायमचा हरवणे व ऑफिसमधे त्याची कमतरता जाणवणे हे काही दिवस खूप त्रासदायक होतं. तुझ्या एका काश्मिरी कलीगच्या अकाली मृत्यूबद्दल पण तू लिहिलं होतंस ते अजून मी विसरले नाहिये.
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |
जिवंत व्यक्तीचित्र नंदिनी, आवडलं..
बरं, रेहानचं लिहिणार आहात का हो आता? कधी ?(भीत भीत विचारणारी बाहुली )
छान लिहिलंयस नंदिनी..
चटका लावून जातात काही माणसं..
नंदिनी : खुप छान लिहिलयस गं ..............
~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे
छान लिहिलय गं. आवडले तुझे जावेदसर..
वा! आवडले जावेद सर.. लक्षात राहतील.
~~~~~~~~~
छान लिहीलंय नंदिनी!
फार सुरेख, नंदू. (तुझ्या हिंदीसकट सगळं आवडलं
)
आयला.. असलं हिंदी असलेल्यांन्ना मिडीया मॅनेजर बनवतात? कुठली ही महान कंपनी ?
मस्त लिहिलंयस आवडलं
नंदिनी, छान लिहीलंयस...
मस्त लिहीले आहेस गं नंदिनी...
आपण खुपदा बोललो आहोत गं पण तू इतके छान लिहीतेस ते माहित नव्हते तेव्हा..
मेधा.......